“ पल्लवी, मसाल्याचे पदार्थ एक्स्पायरी डेट पर्यंत वापरले तर चालतात का ? “
मागून आवाज आला – “ त्यापण हेच सांगतील – रियूझ , रिसायकल “
माझा आणि विनीलचा व्हिडीओ कॉल सुरु होता आणि विनीलच्या आईचा आवाज आला .
माझं कुतूहल आणखी वाढलं .
मी म्हटलं “पण इतका वेळ मसाले वापरलेच गेले नाहीयेत का ?”
त्यावर विनील हसून म्हणाला – “ मी माझ्यासाठी वेगेवेगळे मसाले आणत असतो . ग्रेव्ही तयार करायला फार मदत होते . रोज कोण ताजे मसाले करणार ?”
मी म्हटलं “ बरोबर आहे . तयार मसाले सोयीचे आहेत पण ते योग्य वेळी वापरणं देखील तितकाच महत्वाचं आहे .एकदा पाकीट उघडलं कि ते जास्तीत जास्त १ महिन्याभरात वापरलं जाणं अपेक्षित असतं “
हे झालं कोरड्या मसाल्याचं पण मॉइश्चर बेस्ड मसाले (आर्द्रता असणारे ) जास्तीत जास्त ३ दिवसात वापरायला हवेत “
यावर विनील ने समजावून मान डोलावली आणि आमच्या कॉल नंतर मला एक फोटो आला ज्यात मसाल्यांची पाकिटं योग्य वेळी काढून टाकल्यामुळे फडताळ आणि फ्रिज दोन्ही ताजेतवाने दिसतायत अशी तळटीप होती ?
या संवाद दरम्यान मला आहार साक्षरता हा मुद्दा कायम नव्याने पोहोचायला हवा हे अधोरेखित झालं.
दरवेळी आहार साक्षरता म्हटलं की कोणत्या प्रकारचा डायट असतं त्याबद्दलची माहिती असा एक सांगत असतो मात्र आहार साक्षरता म्हणजे आपण ज्या प्रकारचं खाणं वापरतो ज्या प्रकारचे पदार्थ बाजारातून खरेदी करतो या सगळ्या पद्धतीची माहिती देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण कोणत्याही पद्धतीचं पद्धतीचं रेडीमेड किंवा साठवणीचे खाणं खरेदी करतो तेव्हा त्यावरील अन्न घटक, पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं जिन्नस याबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली असणे नियमाधारित आहे.
आणखी वाचा: डाएट जीआय म्हणजे काय कमी जीआय असलेले पदार्थ कोणते?
अन्न आणि पदार्थ संस्थेच्या नियमानुसार जे पदार्थ पाकीट बंद आहे त्या सगळ्या पदार्थांवर त्यातील पोषण घटकांचे योग्य प्रमाण, त्यातील पोषण घटकांची नावे ,पोषणमूल्ये यांची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. अनेकदा विविध दुकानांमध्ये साठवणीच्या पदार्थांवर त्यातील अन्न घटकांची नावेच लिहिली नसतात.
हेल्दी लाडू असणाऱ्या पाकिटावर – गव्हापासून तयार केले गेलेले पौष्टिक लाडू इतकंच लिहिलेलं असतं. सजग ग्राहक म्हणून ही माहिती जाणून घेणं आणि त्यानुसार आहारात एखादा पदार्थ समाविष्ट करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. अनेक पदार्थांवर प्रोटीन रीच किंवा प्रथिनेयुक्त पदार्थ असे म्हणून त्यामध्ये प्रथिने असणारा कोणताही ऐवज नसतो त्यामुळे ग्राहक म्हणून आहार साक्षरता हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
आहार साक्षरता सुरू होते ती म्हणजे आपण ज्या प्रकारचं खाणं खातो ज्या ऋतूमध्ये आपण एखादा पदार्थ खातो त्या ऋतुमानानुसार त्या ऋतूंमध्ये अवेलेबल असणारे म्हणजे त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्या आणि फळं आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ जेव्हा आपण एखाद्या पदार्थ विकत घेतो त्यावेळेला नेहमी आपल्याला हे सांगितले जाते की हा पदार्थ ताजा आहे का? भाज्यांचा पोत गंध रंग ह्याच्यावरून आपण आपल्याला त्या भाजीच्या ताजेपणाची एक कल्पना येऊ शकते. अलीकडे भाज्या आणि फळे घरपोच पोहोचविण्याची सोय असताना निवडून गोष्टी विकत घेणे ही संकल्पना लोप पावते आहे. अशावेळी सोयीने आलेल्या जिन्नसावर त्याचे वर्णन आणि पूर्ण माहिती असणे महत्वाचे ठरते.
आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा
ज्यावेळी आपण साठवणीच्या पदार्थांबद्दल बोलतो त्यावेळी ३ मुद्दे लक्षात घेणे खूप आवश्यक आहे.
१. हा पदार्थ कधी तयार झाला आहे (manufactuting date )
२. हा पदार्थ कधी पाकिटबंद केला गेला आहे ( packaging date )
३. हा पदार्थ कधीपर्यंत साठवून ठेवला जाऊ शकतो ( expiry date )
या तारखांनुसार पदार्थातील पोषणमूल्यांवर देखील होणार परिणाम लक्षात घ्यायला हवा. अनेकदा गॅसेस किंवा पोटाचे विकार असणाऱ्यांमध्ये निकष दर्जाचे अन्नघटक कारणीभूत असतात. माझ्या ओळखीत असणाऱ्या एका महिलेने मला असे सांगितले होते की मसाल्याचे पदार्थांची एक्सपायरी डेट झाली की मी ते पुन्हा भाजून घेते म्हणजे त्यातील पोषणमूल्यांचा ऱ्हास होत नाही – एखाद्या पदार्थाची एक्स्पायरी डेट त्यातील पोषणमूल्यांचा जास्तीत जास्त ऱ्हास झाल्याचे प्रमाण सांगण्याचा देखील निकष आहे हे लक्षात घ्यायला हवे.
आपण ज्या वातावरणात एखादा पदार्थ साठवून ठेवतो त्यावर देखील पोषण मूल्यांचे प्रमाण अवलंबून असते. पदार्थ वापरायला सुरुवात करणे, हवेचा संपर्क, पाण्याचा संपर्क या सगळ्या घटकाचा साठवणीच्या पदार्थांबद्दल खास विचार व्हायलाच हवा.
बाजारातील सोयीस्कर पदार्थ म्हणजे खारी, बटर ,टोस बिस्किट सॉस चटण्या आपण नेहमीच बाजारातून आणत असतो. आत्ताची पिढी याला जास्त सरावलेली आहे हे सगळं लक्षात घेता ज्या वेळेला तुम्ही कोणती गोष्ट विकत घेतात त्यावेळेला ती गोष्ट एक महिना जुनी तर नाही ना याचं भान असणं फार आवश्यक आहे. चटणी किंवा सॉस विकत घेताना ती तीन ते सात दिवसाच्या आत वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल अरे बापरे सॉस सात दिवसाच्या आत कसा वापरायचा पण सॉस किमान एक महिन्याच्या आत तरी वापरायला पाहिजे. पेढे लाडू यांसारखे पदार्थ विकत घेताना त्यातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण आपल्या शरीराला शरीराला हानीकारक ठरणार नाही ना याचे भान राखणे आवश्यक आहे.
झाला आहार साक्षरतेचा एक मुद्दा पुढील भागात पाहूया आहार साक्षरते मध्ये आणखी काय काय जाणून घेता येईल.