“ तुम्ही चुकून डाएट मध्ये खोबऱ्याची चटणी लिहिलेय”
स्वातीचा काळजीयुक्त स्वरात फोन आला .
“ चुकून नाही -तू खाऊ शकतेस “
“ हो पण खोबऱ्याने फॅट्स वाढतात ना?”
“ हम्म , खोबरं खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर प्रॉब्लेम आहे . जेवणात एवढं खोबरं त्रासदायक नाहीये”
“ मला खोबरं आवडतं खरं तर पण भीती वाटायची – उगाचच फॅट्स नकोत खायला “\
“ फॅट्स खाणं तब्येतीला चांगलं असतं स्वाती !”
“ ओके “

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारळ आणि कोलेस्ट्रॉल याबद्दलचे प्रवाद अनेक वर्ष सुरु आहेत. त्यामुळे नारळ आणि त्याबाबतीतले गैरसमज देखील त्याच वेगाने पसरलेले आहेत. भारतीय आहारात नारळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मग कोशिंबीर असो किंवा पालेभाज्या . सणासुदीला नारळाचे दूध, ओलं खोबरं सढळ हस्ते वापरलं जातं . अनेक घरात सुंदर केस आणि तंदुरुस्त शरीरयष्टी असणाऱ्या कुटुंबांमध्ये आहारात नारळाचा सर्रास वापर केला जातो.

आणखी वाचा: Health Special: कोकोनट शुगर, मधुमेहींसाठी वरदान

आहार शास्त्रात देखील नारळ आणि नारळाच्या पदार्थांचे महत्व तितकंच आहे. अगदी नारळ पाणी ते नारळाचं तेल यासारख्या नारळाच्या विविध रूपांचा आहारामध्ये समावेश केला जातो. मधल्या काही काळामध्ये नारळावर एक सरसकट बंदी आली होती. जिथे नारळ खाणे किंवा खोबरं खाणेच किती अपायकारक आहे याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जात असत. मात्र आयुर्वेद आणि आहार शास्त्रानुसार नारळ हा अत्यंत औषधी गुणकारी आणि आरोग्यवर्धक आहे. नारळाचं पाणी थंड गुणाचे आहे . शरीरातील अतिरिक्त चरबीला आला घालण्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त आहे . किंबहुना सातत्याने स्पर्धात्मक व्यायाम करणाऱ्यांसाठी देखील नारळपाणी अत्यंत गुणकारी आहे.

शरीरातील क्षारांचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी आणि आर्द्रता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी नारळपाणी उपयुक्त आहे. नारळ पाण्यामध्ये ग्लुकोज प्रथिन पोटॅशियम सोडियम क्लोराइड ही सगळी पोषणमूल्य नारळाच्या पाण्याचे महत्त्व वाढवतात. नारळाच्या पाण्यामध्ये जीवनसत्व अ तसंच जीवनसत्व ब याचे प्रमाण उत्तम असते. त्याचप्रमाणे ओल्या खोबऱ्याचा विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये उत्तम प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात तसेच चवीला ते हलके गोड असते. ओल्या खोबऱ्याचे दूध मोठ्या प्रमाणावर पाश्चात्त्य देशांमध्ये आणि भारतात देखील वापरले जाते वेगवेगळ्या प्रकारच्या विशेषतः गोड पदार्थ तयार करण्यासाठी ओल्या खोबऱ्याच्या दुधासारखे उत्तम द्रव्य नाही.

आणखी वाचा: Health Special: साखरेला मध पर्याय ठरु शकतो?

अनेक नारळाच्या प्रजातींपासून कोकोनट शुगर किंवा गूळ तयार केला जातो आणि नारळाच्या खोबऱ्यापासून जवळपास ६०% तेल निघते. आयुर्वेदाप्रमाणे वजन वाढवण्यासाठी तसेच शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि पित्त प्रकृती कमी करण्यासाठी नारळाचे खोबरे हे अत्यंत उपकार्य आहे ज्या लोकांमध्ये कॉफी किंवा दारू किंवा सिगरेट या व्यसनांमुळे शरीराचे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी नारळाचे पाणी आणि खोबऱ्याचा नियमित वापर भुकेचे संतुलन राखण्यास मदत करते. इडली डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ खाताना सांबर सोबत झालेली चटणी कर्बोदकांमुळे होणार ग्लायसेलीन लोड कमी करण्याचे काम करते .

सगळ्या वयोगटात गटाच्या स्त्रियांमध्ये केस गळती किंवा की अकाली केस तिकडे यासारखे विकार असल्यास नारळासारखे औषध नाही नारळाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यास सुद्धा आणि डोक्यावर लावण्यात सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना झोप नीट लागत नाही किंवा डोळ्यांची आग होते किंवा तळपाय यांची आग होते त्यांच्यासाठी केवळ खोबरेल तेल वरून वापर केल्याने देखील अत्यंत उपयोग होतो.

जेवणात नारळाचे तेल वापरावे की वापरू नये असणाऱ्या गैरसमजांचा सुवर्णमध्य हा आहे की खोबरेल तेलाचा उष्मांक जास्त असल्यामुळे नारळाचे तेल जेवणासाठी वापरल्यास शरीराला फायदेशीर ठरू शकते. शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे ते शरीराला शरीराला बाधक ठरत नाही किंबहुना खोबरेल तेलातील उत्तम स्निग्ध पदार्थ शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी केले कमी करतात असे देखील आढळलेले आहेत. आणखी एका अभ्यासामध्ये नारळाच्या तेलाचे म्हणजेच खोबरेल तेलाचे विशेषतः रजोनिवृत्तीकडे झुकणाऱ्या स्त्रियांमध्ये अत्यंत आरोग्यवर्धक फायदे दिसून आलेले आहेत यामध्ये असे आढळून आलेले आहे की ऑलिव्ह ऑइल आणि नारळाचे तेल या दोघांपैकी नारळाचे तेल वापरणाऱ्या स्त्रियांमध्ये राजा निवृत्तीमुळे होणारे विकार – थकवा , मानसिक त्रास , कोलेस्ट्रॉलचे प्रमाण उत्तम प्रमाणात संतुलित राहिलेले आढळून आले आहे.

नारळाच्या साखरेबद्दल आपण गेल्या लेखांमध्ये तर वाचलं असेलच. मधुमेह असणाऱ्यांसाठी खोबऱ्याची साखर किंवा नारळाची साखर अत्यंत वरदान आहे आणि उपायकारक देखील आहे. ज्या वेळेला आहार आणि त्यासंबंधित शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जातो त्या वेळेला विशेषतः स्निग्ध पदार्थांकडे केले जाणारे लक्ष जास्तीचे आहे. नारळाचे तेल नियमितपणे आहारात वापरल्यास शरीरातील इन्सुलिनची मात्रा अत्यंत योग्य प्रमाणात राखली जाते आणि याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे म्हणजेच स्त्रियांनी किमान एक चमचा नारळाचे तेल रोज खाणे आवश्यक आहे त्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या स्निग्ध पदार्थांमुळे शरीरावर उत्तम परिणाम होतात तसेच कोणत्याही बाजारू स्निग्ध पदार्थांपेक्षा नारळाचे तेल अत्यंत गुणकारी आहे.

ज्यावेळेला नारळापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा आणि स्निग्ध पदार्थांचा विचार केला जातो त्याला अर्थातच मुख्यत्वे नारळापासून उत्तम प्रमाणात फॅट्स मिळतात मात्र ओल्या नारळात असणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते त्यामुळे नारळ खाताना त्याच्या मधले प्रोटीन त्यातील तंतुमय पदार्थ याचा देखील विचार करायला हवा. भारतीय आहार पद्धतीने नुसार आपण जर नारळाचे फायदे बघायला गेलो तर खोबरेल तेल असो किंवा नारळाचं दूध असो ह्याच्यामध्ये उत्तम फायदे आहेत.

अलीकडे विशेषतः स्त्रियांमध्ये लॅकटोज इंटॉलरन्स आढळून येतो त्यांच्यासाठी नारळाचे दूध हा अत्यंत सोपा आणि साहजिक पर्याय आहे. ज्यांना संप्रेरकांचे असंतुलन आढळून आलेले आहे किंवा ज्यांना पीसीओएस आहे त्यांच्यामध्ये नारळाचे पदार्थ खाल्ल्यामुळे खूप चांगले परिणाम दिसून येतात. म्हणजे काय तर एक भुकेचे नियमन करता येते. दोन गोड पदार्थांचे ग्रेव्ही म्हणजेच सारखे सारखे गोड खाण्याचे प्रमाण कमी होते. तीन भुकेचे संतुलन राखते. लेप्टीन आणि ग्रेलिन या दोन्ही संप्रेरकांवर उत्तम परिणाम होतो तसेच शरीराला योग्य प्रमाणात वंगण मिळाल्यामुळे शरीराची वाढ चांगली होते.

कोणत्याही प्रकारची साखरयुक्त कँडी खाण्यापेक्षा कोकोनट शुगरने बनलेली एखादी कॅन्डी किंवा खोबऱ्याचे चॉकलेट खाल्लेले कधीही उत्तम आहे नारळातील किटोन बॉडी ज्यांना एपिलेप्सी किंवा अल्झायमर सारखे विकार आहेत त्यांच्यासाठी वरदान आहेत नारातील लॉरीक ऍसिड अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया फंगस आणि वायरस पासून शरीराचे रक्षण करते. नारळातील आम्ल आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत तसेच तुम्हाला भुकेचा नेमका अंदाज यायचा असेल तर नारळाच्या पदार्थांसारखा औषध नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न नारळ आपल्या नेहमीच्या आहारात असायलाच हवेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know benefits of coconut for health hldc psp