Health Specials: आपण जेव्हा ‘मसल मेमरी’ हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर स्नायूंची हालचाल उभी राहते. चेंडूने खेळणे, वाद्य वाजवणे अशा शारीरिक क्रिया तुम्हाला आठवतात. परंतु, केवळ शारीरिक हालचाल किंवा विशिष्ट गतीने होणारी शारीरिक हालचाल म्हणजे ‘मसल मेमरी’ नाही. यामुळे शारीरिक क्रियांसाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ‘मसल मेमरी’ आवश्यक का असते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

‘मसल मेमरी’ म्हणजे काय ?

‘मसल मेमरी’ म्हणजे स्नायूंची स्मरणशक्ती होय. आपल्या शरीराचे अवयव विशिष्ट शारीरिक क्रिया लक्षात ठेवतात. एखादी गोष्ट, कृती शरीराने पूर्वी केली असेल तर ती त्या अवयवांच्या लक्षात राहणे, याला ‘मसल मेमरी’ असे म्हणतात. विज्ञानाच्या मते, स्मरणशक्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे न्यूरॉलॉजिकल. शिकलेल्या क्रियाकलाप लक्षात राहणे. दुसरा प्रकार हा शारीरिक आहे. यामध्ये स्नायूंच्या स्मरणशक्तीचा समावेश होतो. ‘मसल मेमरी’चे न्यूरॉलॉजिकल स्वरूप बहुतांशी लोकांना ज्ञात असते. ते एखाद्या घटनेशी निगडित असते. लहानपणी शिकलेली एखादी कला, कृती आपल्याला मोठेपणीदेखील लक्षात राहते. लहानपणी सायकल चालवायला शिकलेली व्यक्ती मोठेपणीदेखील सायकल चालवू शकते. लहानपणी तबला शिकलेली व्यक्ती मोठेपणी तबला वाजवू शकते. यामध्ये मेंदूच्या स्मरणशक्तीमध्ये ‘मसल मेमरी’चा समावेश असतो.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

मेंदू आणि पाठीचा कणा यांच्या मध्यावर्ती असणाऱ्या मज्जासंस्थेमध्ये हालचालींची स्मरणशक्ती असते. म्हणजेच विशिष्ट शारीरिक हालचाली, क्रिया या पुन्हा पुन्हा , विशिष्ट क्रमाने केल्या जातात. किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा जरी केल्या तरी त्या लक्षात ठेवल्या जातात. या विशिष्ट क्रियांमुळे शरीराचे सर्व भाग हे सक्रिय राहतात.

‘मसल मेमरी’चे कार्य

शिकागो येथील स्विच्डऑन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सीइओ ब्रेट जॉन्सन यांनी न्यूरोसायन्समध्ये संशोधन केलेले आहे. त्यांनी ‘मसल मेमरी’बद्दल त्यांची काही मते मांडली आहेत. हालचालींची सुरुवात असते, तेव्हा मेंदू या हालचाली शिकत असतो. नवीन कौशल्ये मेंदूमध्ये साठवली जात असतात. कालांतराने मेंदूने विशिष्ट कृती साठवून ठेवल्याचे लक्षात येते. परंतु, मेंदू त्यामध्ये ‘अपग्रेडेशन’ करत असल्याचे समजते. आपल्या हालचाली अधिक अचूक, सुसंगत आणि तरल होण्यासाठी मेंदू प्रयत्नरत असतो. यानंतर एक स्वायत्त अवस्था येते, ज्यामध्ये तुम्ही स्वयंचलितरित्या कार्य करत आहेत असे लक्षात येते. कधीकधी आपले लक्षही नसते, तरीही आपण ड्रायव्हिंग करत असतो, सायकल चालवत असतो, किंवा कृती करत असतो. या अवस्थेला स्वायत्त अवस्था म्हणतात. जॉन्सन यांनी असे नमूद केले की, काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, प्रत्येक हालचालीसाठी नेहमीच एक योग्य तंत्र नसते. कारण, लोक थोडे वेगळे तंत्र वापरतात किंवा उंची, वजन आणि फिटनेस पातळी यासारख्या वैयक्तिक मर्यादांवर आधारित काही हालचाली बदलत असतात.

हेही वाचा : विश्लेषण : प्राचीन काळी पृथ्वीवर १९ तासांचा दिवस होता ? काय सांगते नवीन संशोधन

शारीरिक ‘मसल मेमरी’

काही कारणांनी आपले शरीर कमकुवत होते. कधीकधी शारीरिक व्याधींमुळे शरीराची हालचाल अनियमित होते. अशा वेळी पुन्हा आपले स्नायू, शरीराची बळकटी पुन्हा मिळवायची असेल तर व्यायामशाळेत तासनतास व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. आपले शरीर स्वतःहून ‘रिकव्हर’ होत असते. नैसर्गिकरित्या बरे होतात. जर स्नायू, शरीराचे अवयव त्यांचे कार्य विसरलेले नसतील तर शरीर लवकर तंदुरुस्त होते. कारण, स्नायूंमध्ये सातत्याने नवीन पेशी तयार होण्याचे काम चालू असते. विज्ञानानुसार ‘मसल मेमरी’चा आणखी एक प्रकार वास्तविक स्नायूंच्या ऊतींच्या वाढीशी संबंधित आहे.स्नायू तयार होण्यास जेवढा अवधी लागतो, त्याच्यापेक्षा कमी काळ ‘मसल मेमरी’मुळे स्नायू बळकट होण्यास लागतो. ‘मसल मेमरी’ स्नायूंच्या बळकटीस अधिक कारण ठरते.

हेही वाचा : विश्लेषण : उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेले ‘गारदी’ नक्की आहेत तरी कोण? काय आहे गारदींचा इतिहास

नियमित व्यायाम आणि स्नायूंचे कार्य

तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, तर तुमचे शरीर अधिक तंदुरुस्त राहते. स्नायूंच्या हालचाली नियमित स्थितीत असतात. न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटी येथील प्राध्यापक डॉ. जगदीश खुबचंदानी यांनी यासंदर्भात संशोधन मांडले आहे. त्यांनी या संशोधनात व्यायामामुळे ‘मसल मेमरी’मध्ये वाढ होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे होते की, आपले शरीर नियमित क्रियाकलापांपासून दूर जाणार नाही ना, हे पाहायला हवे. उदा. सायकल किंवा मोटारसायकल चालवण्यापासून एवढेही दूर जाऊ नका की, तुम्ही कशी चालवायची हे विसराल. तुम्ही या क्रियाकलापांपासून जेवढे दूर जाता तेवढे तुमच्या मेंदूला पुन्हा ते अधिग्रहित करायला वेळ लागतो.

याचेच तात्पर्य म्हणजे ‘मसल मेमरी’ परत येऊ शकते. ती तुम्हाला तंदुरुस्तही ठेवू शकते. परंतु, त्यासाठी तुम्हालाही व्यायाम आणि नियमित शारीरिक हालचाल करणे आवश्यक

Story img Loader