“माणसांचं जगणं सोपं व्हावं यासाठी तंत्रज्ञानाचा जन्म आणि विकास झालेला आहे. आम्ही माणसांना सक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञान निर्मित केलं आहे. ज्या गोष्टी कालपर्यंत करता येत नव्हत्या, त्या करता याव्यात; शिकता येत नव्हत्या, त्या शिकता याव्यात, ज्यांची निर्मिती अशक्य होती ते शक्य व्हावं यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. माणसांनी सतत आणि प्रचंड प्रमाणात फोन वापरावा यासाठी ते नाहीये.
आजची मुलं तंत्रज्ञानाबरोबर जन्माला येतात, वाढतात. ही मुलं डिजिटल जनरेशनची आहेत पण याचा अर्थ असा नाही की त्यांना सतत फोन द्यावा. मुलांच्या फोन वापरावर काही कडक नियम हवेत. कुणीही आमच्या फोनचा अतिवापर करावा असे आम्हाला वाटत नाही.”

ऍपलचे सीईओ टीम कूक यांनी एका मुलाखती दरम्यान हे स्पष्ट केलं आहे. मुलांचा मोबाईल वापर कसा असला पाहिजे याविषयी बोलणारे टीम कूक पहिलेच नाहीयेत. मार्क झुकेरबर्गपासून, बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स अनेकांनी त्यांची मुलं लहान असताना त्यांना जाणीवपूर्वक मोबाइलपासून दूर ठेवलेलं होतं. तर जेनिफर लोपेज आणि अँजेलिना जॉली सारख्या काही अभिनेत्रींनीं त्यांच्या मुलांना स्क्रीन टाईम शिस्त लावली आहे. दिवसभर किती स्क्रीन टाइम असला पाहिजे याबद्दल नियम लावले आहेत. हे सांगण्याचं कारण इतकंच की मुलांच्या हातात आपण फार सहजपणे फोन देतो. मुळात टीम कूक जे म्हणता आहेत तो मुद्दा प्रत्येकासाठी लागू होतो. मोबाईल आपलं जगणं सोपं करण्यासाठी आहेत त्यावर अवलंबून राहण्यासाठी आणि त्या अवलंबत्वातून विविध मनो सामाजिक आणि शारीरिक त्रास जडवून घेण्यासाठी नाही. टीम कूक यांच्या मुलाखतीत त्यांनी स्क्रीन टाइम बद्दल चर्चा केली आहे, तो काबूत ठेवण्यासाठी फोनमध्येच असलेली डिजिटल वेलबीइंग फीचर्स वापरण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांना ही फीचर्स कुठे असतात आणि ती कशी वापरायची हे लक्षात येत नाही. आजच्या लेखात त्याविषयी थोडी माहिती घेऊया.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

आणखी वाचा: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळे वाढतोय का?

मुळात हा सगळाच विषय डिजिटल विवेकाचा आहे. माझ्याकडे असलेला फोन मी किती, कशासाठी वापरते आहे, त्यावर माझे अवलंबत्व आहे का, असेल तर ते किती प्रमाणात आहे, प्रमाणाबाहेर असल्यास काय केले पाहिजे, इंटरनेटचे व्यसन का लागते, कसे लागते हे सगळे मुद्दे समजून घेणं, माध्यम शिक्षित होणं, सायबर क्राईमपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याची माहिती घेणं म्हणजे डिजिटल विवेक. याची सुरुवात निदान आपल्याच फोनमध्ये असलेल्या फीचर्सचा परिचय घेऊन करता येईल.

आपल्या प्रत्येकाच्या स्मार्ट फोनच्या सेटिंगमध्ये डिजिटल वेलबीइंग अँड पेरंटल कंट्रोल हा ऑप्शन असतो. फोनच्या सेटिंगमध्ये गेल्यावर डिजिटल वेल बीइंग असा ऑप्शन तुम्हाला दिसेल. हे ओंड्रिड फोन बद्दल बोलतेय, पण आयफोनमध्येही अशी सेवा असतेच. ती वापरली पाहिजे. या डिजिटल वेल बीइंगच्या सेटिंगमध्ये वेगवेगळ्या ऍप्सवर आपण किती वेळ घालवतो याची माहिती मिळू शकते. म्हणजे व्हॉटसअँप, फेसबुक दिवसभरात किती वेळ वापरलं हे समजू शकतं. याशिवाय दिवसाचं आठवड्याचं, महिन्याचं, दोन आठवड्यांचं किंवा महिन्यांचं तुलनात्मक स्टॅटिस्टिक्स मिळू शकतं. ज्यामुळे काल माझा स्क्रीन टाइम किती होता आणि आज किती आहे, त्यात काही फरक पडलेला आहे का याचा तपशील मिळून तुम्ही आवश्यक ते बदल करू शकता.

आणखी वाचा: Mental Health Special: मुलांचा स्क्रीन टाईम किती हवा?

शिवाय या फीचरमध्ये तुम्ही तुमच्या स्क्रीन टाईमचं गोल सेटिंग करु शकता. म्हणजे दिवसभरात कितीवेळ मोबाईलवर घालवायचा हे ठरवू शकता. सेट गोल वर क्लिक केलं की किती तास आणि मिनिटं तुम्ही मोबाईल वापरणार आहात हे त्यात तुम्ही सेट करू शकता. तेवढा वेळ झाला फोनच तुम्हाला तुमचा आजचा स्क्रीन टाइम संपला हे सांगतो. यात अजून एक फिचर आहे ते म्हणजे ऍप टायमर. समजा तुम्ही ठरवलं आहे की एखादा गेम दिवसभरात फक्त अर्धा तास खेळायचा. व्हॉट्स अँपवर दिवसातून अर्धा तासच जायचं आहे. पण तो गेम तुम्ही दोन तास खेळता आहात, किंवा व्हॉट्स ऍपवर तुम्ही दिवसभरच आहात तर या फीचरमध्ये तुमच्या गेमसाठी किंवा कुठल्याही ऍप्ससाठी टायमर लावू शकता. म्हणजे वेळ सेट करु शकता. तुमची वेळ संपली की तसा अलर्ट तुमचा फोनच तुम्हाला देईल. याशिवाय डिजिटल वेलबीईंगमध्ये असतो फोकस मोड, मी टाइम ड्राइव्ह मोड, बेड टाइम मोड अशीही अनेक फीचर्स असतात.

ही झाली आपल्या फोनमधली फीचर्स, याखेरीज स्क्रीन टाइम मॅनेज करण्यासाठी अनेक ऍप्स आज उपलब्ध आहेत, तीही डाउनलोड करुन वापरू शकता. गुगलनेही आता यात पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या wellbeing.google या साईटवरून त्याविषयी अधिक माहिती मिळू शकते.
आपला स्क्रीन टाइम मर्यादित राहावा यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ऍप्सच्या जगात अनेक गोष्टी आहेत, यात सगळ्यात मोठा अडथळा मात्र आपण स्वतःच आहेत. ती फीचर्स योग्य पद्धतीने वापरण्याबाबत आपण अनेकदा उदासीन असतो कारण आपल्याला आपला फोन सोडवत नाही. गरज तर वाजतो पण अनेक जण तो बंद करून परत झोपतात, त्यातला हा प्रकार आहे. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत पण त्या न वापरता आपण जर झोपणार असू आणि मुलांनाही कळत नकळतपणे तेच शिकवणार असू तर स्क्रीन टाईमच्या विळख्यातून आणि फोनवरच्या अवलंबत्वातून आपली कुणीही सुटका करु शकत नाही.
आपली पहिली मदत आपणच करायची असते. करणार का मग स्वतःची मदत? घेणार का जबाबदारी?

Story img Loader