मागच्या दोन भागात आपण सेंट्रल सेंसीटायझेशन सविस्तर समजून घेतलं, आता आपण फायब्रोमायल्जिया या प्रामुख्याने वेदनेशी संबंधित असलेल्या आजारबद्दल समजून घेऊया. फायब्रोमायल्जिया हा एक आजार नसून सिंड्रोम आहे, ज्यामधे वेदना आणि वेदनेशी संबंधित अनेक लक्षणं दिसून येतात. फायब्रोमायल्जिया सिंड्रोम (एफएमएस) ही जैवरासायनिक, न्यूरोएंडोक्राइन आणि फिजिओलॉजिकल समस्या आहे, ज्यामुळे वेदनेचं प्रोसेसिंग आणि आकलन म्हणजेच इंटरप्रिटेशन व्यवस्थित होत नाही. (अॅलोडायनिया, हायपरल्जेसिया याबद्दल आपण सेंट्रल सेंसीटायझेशन मध्ये शिकलो आहोत ) याशिवाय सतत आणि तीव्र वेदना, मानसिक आणि शारीरिक थकवा ही आणि यासारखी अनेक लक्षणं यात एकत्र दिसून येतात.
फायब्रोमायल्जिया सिंड्रोम (एफएमएस) ची कारणं
आणखी वाचा: Health Special: वेदना आपल्या संरक्षणासाठी असते, म्हणजे काय?
ऑटोनोमिक नर्वस सिस्टम Autonomic Nervous System
१.आपल्या शरीरात औटोनोमिक नर्वस सिस्टम दोन प्रकारे काम करते, sympathetic (सीमपथेटिक) म्हणजेच फाइट-फ्लाइट-फ्राइट रेसपोन्स आणि parasympathetic (पॅरा सीमपथेटिक) म्हणजेच रेस्ट अँड डायजेस्ट रेस्पोंस. शारीरिक किंवा मानसिक तणावाच्या परिस्थित दिला जाणारा प्रतिसाद
फाइट (संकटाचा सामना करणे),-फ्लाइट (संकटापासून पळ काढणे)-फ्राइट (घाबरून थिजून जाणे) यापैकी एका प्रकारचा असतो. शारीरिक किंवा मानसिक पातळीवर आनंदित करणार्या गोष्टींना दिला जाणारा प्रतिसाद हा रेस्ट अँड डायजेस्ट या प्रकारचा असतो. फायब्रोमायल्जियामध्ये सतत प्रत्येक लहान मोठ्या परिस्थितीत sympathetic (सीमपथेटिक) म्हणजेच फाइट-फ्लाइट-फ्राइट रेसपोन्सच दिला जातो आणि parasympathetic (पॅरा सीमपथेटिक) म्हणजेच रेस्ट अँड डायजेस्ट रेस्पोन्स हा जवळ जवळ बंद होऊन जातो. सततच sympathetic (सीमपथेटिक) सिस्टम अॅक्टिवेट झाल्याने हृदयाची गती वाढणं, पोटात आणि आतडयात जास्त प्रमाणात पाचकद्रव्य स्रवणे, शरीरातील स्मूथ मसल्सचं सतत आणि अबनोर्मल आकुंचन होणं, उथळ आणि जलद श्वासोच्छवास या गोष्टी वारंवार होऊ लागतात. त्यामुळे न्यूरोएंडोक्राइन सिस्टम प्रभावित होते, पिटयूटरी ग्रंथीतून ग्रोथ हार्मोन पुरेशा प्रमाणात स्रवत नाही परिणामी शरीराची झीज भरून काढण्याची प्रक्रिया मंदावते त्यामुळे वेदना सतत आणि अति प्रमाणात जाणवण, सततचा थकवा, झोप न येण, आली तरी झोपेतून उठल्यावर ताजेतवाने न वाटण अशी लक्षणं दिसतात.
आणखी वाचा: Health Special: कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते आहे? मला काय झालंय?
२.इम्युन सिस्टम (Immune System)
कुठल्याही इन्फेकशन ला किंवा शारीरिक दुखापतीशी दोन हात करताना आपली रोगप्रतीकरक शक्ती सायटोकायइन्स (cytokines) नावाचा पदार्थ रीलीज करते. हे सायटोकायइन्स मेंदूला ग्लियल सेल नावाचा पदार्थ रीलीज करण्यास भाग पाडतात. या ग्लियल सेल्स तेवढ्यापुरती वेदना वाढवून यामुळे इन्फेकशन किंवा दुखापत बर होण्यासाठी मदत करतात. फायब्रोमायल्जिया मध्ये हा इम्यून रेस्पोन्स अवास्तव वाढलेला असतो आणि ग्लियल सेल अतिप्रमाणात रीलीज होतात, त्यामुळे पेन थ्रेशोल्ड कमी होतो आणि साहजिकच वेदना जास्त प्रमाणात जाणवते.
फायब्रोमायल्जिया सिंड्रोम (एफएमएस) चे रिस्क फॅक्टर्स
१.सततचा मानसिक, भावनिक, शारीरिक ताण- सगळ्यात महत्वाचा रिस्क फॅक्टर
२.आहार- अति तेलकट, मसालेदार, साखरयुक्त किंवा खारट पदार्थ शरीरातील इन्फलमेशन वाढवतात आणि
आणि झीज भरून काढण्यात अडथळे निर्माण करतात.
३.खूप काळापासून शरीरात असलेले सांध्याचे किंवा स्नायूंचे विकार- संधिवात, अंकायलोसिंग स्पोंडीलायटिस,
सिस्टेमिक लपस इरितमटोसिस, जुनाट कंबरदुखी, मानदुखी
४. नैराश्य, डिप्रेशन, पानिक (panic) डिसोर्डर, अॅनझायटी (anxiety) डिसोर्डर, पोस्ट ट्रौमटिक स्ट्रैस डिसोर्डर
५.काहीवेळा आजूबाजूच वातावरण लाइट, आवाज, लोक, हवामान यामुळे देखील लक्षणं वाढतात
फायब्रोमायल्जिया सिंड्रोम (एफएमएस)ची लक्षणं, निदान आणि उपचार पुढच्या भागात