Kidney Failure Signs On Skin: किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. किडनी शरीरातील टॉक्सिन तर काढून टाकतेच शिवाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात ठेवते. खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो किंवा किडनी निकामी होण्याचा धोका असतो. किडनी निकामी होण्याआधी त्वचेवर काही लक्षणे दिसतात जी वेळीच ओळखल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया किडनी खराब होण्याआधी त्वचेवर दिसणारी लक्षणे..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्वचा कोरडेपणा

किडनी निकामी झाल्यास, तुमची त्वचा खूप कोरडी होऊ शकते. जेव्हा किडनी खराब होऊ लागते तेव्हा ते फॉस्फरस आणि इतर काही खनिजे संतुलित करू शकत नाहीत, ज्यामुळे त्वचेवर खाज सुटू लागते.

त्वचेच्या रंगात बदल होणे

शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे त्वचेच्या रंगात बदल होऊ लागतो. पिवळा रंग किंवा गडद रंग अनेकदा दिसून येतो. यावेळी नखांच्या रंगातही बदल दिसून येतो.

( हे ही वाचा: ५ रुपयांचे जुने नाणे का बंद करण्यात आले? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

सूज येणे

जेव्हा किडनी निरोगी असते तेव्हा शरीरातील सर्व घाण बाहेर टाकण्याचे काम करते, परंतु संक्रमित झाल्यामुळे किडनी हे काम योग्यरित्या करू शकत नाही. ज्यामुळे पाय, हात आणि चेहऱ्यावर सूज येऊ शकते.

त्वचेवर पुरळ येणे

किडनी शरीरातील टॉक्सिन शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. जेव्हा किडनी हे काम योग्यरित्या करू शकत नाही तेव्हा त्वचेवर पुरळ येऊ लागते.

त्वचेवर फोड येतात

जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा काही वेळा किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींच्या हातावर, पायांवर आणि चेहऱ्यावर फोड येतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diseases conditions 5 signs of kidney failure on skin in marathi gps