दिवाळी म्हटलं की फराळ हा ठरलेला असतो. कित्येकजण फराळ खाण्यासाठी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा हा ठरलेला असतो. याशिवाय विविध प्रकारच्या मिठाईदेखील या काळात आवडीने खाल्ल्या जातात. पण, उत्साहाने दिवाळी साजरी करताना तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? अनेकदा दिवाळीच्या उत्साही वातावरणात फराळ आणि मिठाई खाताना आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार करत नाही. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिवाळीचा फराळ आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का?
क्रीडा पोषणतज्ज्ञ व डायबिटीज एज्युकेटर पल्लवी पटवर्धन यांनी लोकसत्ताला माहिती देताना सांगितले की, “दिवाळीचा फराळ हा पारंपरिक दृष्टीने हिवाळा सुरू होत असताना तयार केला जातो. स्निग्ध पदार्थ म्हणजेच तेलामुळे शरीराला कमी प्रमाणातूनदेखील मुबलक ऊर्जा मिळू शकते. थंडीच्या दिवसात तयार केला जाणारा फराळ हा देखील बऱ्यापैकी तेलाचा वापर करून केला जात असल्यामुळे तो कमी प्रमाणात जरी खाल्ला तरीदेखील शरीराला पूरक ऊर्जा देतो आणि त्यात असणाऱ्या स्निग्धांशामुळे शरीरात योग्य प्रमाणात ऊब राखली जाते.
हेही वाचा – Diwali 2023 : दिवाळीला अभ्यंगस्नान का केले जाते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….
दिवाळीमध्ये इतके तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ले पाहिजे का?
पूर्वीच्या काळी श्रमजीवी व्यक्तींसाठी फराळामधून मिळणारी ऊर्जादेखील तितक्याच प्रमाणात खर्ची होत असे. मात्र, आता केवळ बैठी कामं करणाऱ्या किंवा शरीराची जास्त हालचाल न करणाऱ्या व्यक्तींना फराळ तितकासा पोषक म्हणता येणार नाही. शिवाय फराळासाठी वापरले जाणारे तेल किंवा जिन्नस हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. जर खूप जास्त प्रमाणात साखर किंवा तेल किंवा पुन्हा पुन्हा वापरले जाणारे तेल हे पदार्थ फराळाचा भाग असतील, तर फराळ तितकासा पोषक ठरत नाही.
दिवाळीचा फराळ किती प्रमाणात खाल्ला पाहिजे?
एकावेळी भरपूर फराळ करणे टाळावे. फराळ दिवसातून अनेक वेळा होत असल्यास जेवणाच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे. फराळातून मिळणाऱ्या कॅलरीज जास्त असतात, शिवाय तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते; त्यामुळे आहारात किमान एक वेळ ताज्या भाज्या, सलाड किंवा सूप स्वरूपात समाविष्ट कराव्यात; भरपूर पाणी प्यावे .
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फराळ करताना काय काळजी घ्यावी?
मधुमेह असणाऱ्यांनी फराळाचे सेवन कमीतकमी प्रमाणात करावे. तुमच्या मधुमेहाच्या तीव्रतेवर तुमच्या गोड फराळी पदार्थांचा समावेश अवलंबून आहे. लहान मुलांसाठी बेसन लाडू, मुगाचे लाडू, चकली, पोह्यांचा चिवडा हे पदार्थ नक्कीच पौष्टिक आहेत. कारण यात बऱ्यापैकी तेलबिया, सुकामेवा, डाळी यांचा समावेश केला जातो आणि त्वरित ऊर्जा मिळविण्यासाठी हे पदार्थ पोषक आहेत.
दिवाळीच्या फराळातील कोणते पदार्थ पौष्टिक आहेत, कोणते नाहीत? कसे करावे सेवन?
लाडू तयार करताना त्यात बेसन, मुगडाळ आणि सुकामेवा यांचे प्रमाण प्रथिने आणि स्निग्धांश यांचे संतुलन साधल्यास ते नक्कीच शरीरासाठी पोषक असतात. मात्र, त्यात पांढऱ्या साखरेचे प्रमाण वर्ज्य करणे उत्तम आहे.
भाजणीची चकली हा देखील प्रथिनांनी समृद्ध असा पदार्थ आहे, मात्र तळण्याची प्रक्रिया त्यातील अतिरिक्त तेलाचे प्रमाण वाढवते आणि ज्यांना कोलेस्ट्रॉल, अतिचरबीचे अतिरिक्त प्रमाण, लठ्ठपणा असे विकार आहेत, त्यांच्यासाठी चकली आदर्श खाद्यपदार्थ नक्कीच नाही.
पोह्याचा चिवडा जर कमीतकमी तेलात तयार केलेला असेल, तर फराळातील पौष्टिक पदार्थ मानला जाऊ शकतो .
शंकरपाळे, चिरोटे , करंजी यांमध्येदेखील कर्बोदकांचे अतिरिक्त प्रमाण असते; त्यामुळे एकावेळी सगळे पदार्थ खाताना ते प्रमाणात खावे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे .
फराळ तयार करताना काही टिप्स:
शक्यतो लोखंड, पितळ, तांबे या धातूंची भांडी वापरावीत.
डाळी, सुकामेवा यांचे प्रमाण संतुलित ठेवावे. पदार्थ तयार करताना ताज्या तेलाचा/ तुपाचा वापर करावा.
एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरू नये.
पांढऱ्या साखरेऐवजी गूळ, नारळी साखर, खांडसरी साखर (प्रक्रिया न केलेली सल्फरमुक्त साखर)याचा वापर करावा. साखरेचे प्रमाण किमान ठेवावे.
हेही वाचा – Diwali 2023 : दिवाळीत फराळ बनवताना फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स अन् बिनधास्त मारा ताव लाडू, चकली, चिवड्यावर!
दिवाळीच्या फराळातील आरोग्यदायी बदल
१. पांढऱ्या साखरेऐवजी खांडसरी साखर किंवा गुळाची पावडर किंवा खोबऱ्याची साखर.
२. डालड्याऐवजी गाईचे तूप वापरा.
३. मैद्याऐवजी गहू किंवा जव किंवा गहू यांचे मिश्र पीठ वापरा.
४. केवळ बेसन वापरण्याऐवजी वेगवेगळ्या डाळींचे मिश्रण वापरणे.
५. कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग न वापरणे.
६. तळण्यासाठी एकाच प्रकारचे तेल वापरण्याऐवजी किमान तीन प्रकारच्या विविध तेलांचे मिश्रण वापरणे.