पल्लवी सावंत पटवर्धन

दिवाळीचा फराळ आणि भाजणी यांचं अतूट नातं आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये डाळी आणि भाजणीच्या डाळीपासून केल्या जाणाऱ्या पदार्थाना विशेष महत्व आहे. अनेक डाळी भाजून त्यापासून विविध पार्थ तयार केले जातात. यात सर्वाधिक महत्वाची आणि सर्वाधिक वापरली जाणारी डाळ म्हणजे चणाडाळ. केवळ चव आणि पदार्थ तयार करण्यासाठीच नव्हे तर चांडाळीमध्ये पोषक तत्त्वे देखील भरपूर आहेत.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati temple
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि १ लाख २५ हजार दिव्यांची आरास, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका

पचायला सोपी, तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांनी भरपूर अशी चणाडाळ आहार शास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाची आहे. भाजलेल्या कहाण्यांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण देखील मुबलक असते. तंतुमय पदार्थ , योग्य प्रथिने आणि मुबलक ऊर्जा असणारे चणे- ज्याला फुटाणे असेदेखील म्हटले जाते बुकेच्या संप्रेरकांचे योग्य नियोजन करतात.

लहान मुलांसाठी मेंदूला उत्तम खुराक म्हणून चणे आणि त्यासोबत खाल्ले जाणारा गूळ बुद्धिवर्धक मानला जातो. त्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यासाठी चणे खाणे अत्यंत आवश्यक आणि उपयोगाचे मानले जाते. गरोदर स्त्रियांमध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण वाढवण्यासाठी फुटाणांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे फुटाणांमध्ये असणारे जीवनसत्व अ, ब .,कॅल्शियम ,फॉस्फरस, मॅंगनीज झिंक आणि लोह फुटाण्यांना कडधान्यांमधील सर्वोत्तम दर्जाचे ठरवितात.

आणखी वाचा-Health Special : चिडचिड होणं हे पित्तप्रकोपाचं लक्षण आहे?

चण्यांप्रमाणंच काही प्रमाणेच मुगडाळ देखील प्रथिने आणि तंतुमय पदार्थांनी युक्त आहे मात्र त्यासोबत मूग डाळीमध्ये जीवनसत्व अ आणि क यांचे मुबलक प्रमाण आहे. तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम प्रमाण मुगाच्या डाळीत आढळते. भाजलेली मूग डाळ साडे सात ते आठ ग्रॅम इतके प्रथिने देते. ज्यांना रक्तदाब आहे ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी मुगडाळ अत्यंत उपयुक्त आहेत.

हृदयाचे विकार असणाऱ्यांसाठी आहारात नियमितपणे मुगडाळ वापरणे अत्यंत उपयुक्त आहे. मुगडाळीमुळे शरीरातील गॅसेसचे प्रमाण देखील कमी होते. मुगडाळीतील लोह रक्तातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहेत.

उडीद डाळ काळे उडीद आणि पांढरा अशा दोन पद्धतीने उडदाची डाळ उपलब्ध आहे. पोटॅशियम कॅल्शियम प्रथिन विटामिन जीवनसत्व अ जीवनसत्व ब लोह यांनी भरपूर असणारी उडदाची डाळ केवळ भाजून किंवा भिजवून किंवा रात्रभर भिजवून आंबवून वापरल्यास जास्त उपयुक्त असते. हाडांची घनता वाढवणे शरीरातील लोह आणि ब जीवनसत्वाचे प्रमाण वाढवणे किडनीचे आरोग्य वाढवणे यासाठी उडदाची डाळ उपयुक्त आहे. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी उडदाची डाळ अत्यंत उपयुक्त आहे शिवाय ज्यांना कोणत्याही प्रकारचा मज्जातंतूंचे विकार आहेत त्यांच्यासाठी उडीद डाळ अत्यंत उपयुक्त मानली जाते. मधुमेह मधुमेहापासून मधुमेहापासून दूर राहण्यासाठी उडीद डाळ अत्यंत उपयुक्त आहे कारण शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी उडीद डाळ अत्यंत उपयुक्त आहे म्हणूनच मधुमेहांच्या अनेक रुग्णांना डाळी पासून बनवलेले डोसे किंवा डाळी पासून बनवलेले पदार्थ उडीद डाळी पासून बनवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खायला सांगितले जातात.

आणखी वाचा-Health Special: दिवाळीचा फराळ कोणत्या तेलात करावा?

मसूर डाळ लाल मसूर किंवा अख्खी मसूर म्हणजेच काळे मसूर भारतीय आहारामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत विशेषतः यापासून तयार केले जाणारे सूप आणि सॅलड मध्ये त्याचा होणारा वापर हा अत्यंत प्रसिद्ध आहे या पद्धतीने मसूर डाळ आहारात वापरताना ती भाजून घेणे किंवा ती भिजवून त्यानंतर वापरणे मसूर डाळीतील प्रथिनांचे शरीरातील प्रथिने शोषणाचे प्रमाण उपयुक्त ठरवतात मसूर डाळीमध्ये पंधरा ग्रॅम फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ असतात तर १७ ग्रॅम प्रोटीन असतात या मसूर डाळीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसूर डाळीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात स्निग्धांश आढळतात त्यामुळे केवळ तांदळापासून एखादा पदार्थ बनवण्यापेक्षा मसूर डाळीचे डोसे अत्यंत उपयुक्त असतात आणि ते तुमच्या भुकेच्या संप्रेरकांवर देखील योग्य संतुलन राखतात शिवाय त्यात खनिजांचा मुबलक साठा असतो.

दिवाळीचे कोणतेही पदार्थ तयार करताना डाळी भाजून त्यापासून पदार्थ तयार करण्यावर नेहमी भर दिला जातो. यामुळे तीन मुद्दे साध्य होतात एक म्हणजे डाळीतील प्रथिने उत्तम प्रकारात शरीरात शोषली जातात दोन डाळी पचायला हलक्या होतात आणि तीन शरीराला प्रथिने आणि स्निग्धांश याचा योग्य प्रमाणात साठा मिळू शकतो.

भाजणीचे पीठ आणि त्यापासून बनविले जाणारे पदार्थ हिवाळ्यात शरीराला पोषक आणि आवश्यक असतात. कमी प्रमाणात उत्तम पोषकतत्त्वे आणि मुबलक ऊर्जा देणारे भाजणीचे फराळी पदार्थ खाताना त्यातील पोषणमूल्यांचा विचार होणेदेखील महत्वाचे आहे.