Best Exercises To Lower Blood Sugar Fast : शरीराला जगण्यासाठी ग्लुकोजची (शरीरातील साखर) फार गरज असते. कारण त्यावर हृदयाची हालचाल, विचार करण्याची क्षमता आणि एकूणच शरीर अवलंबून असते. पण, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत चढ उतार झाले तर त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येऊ शकतो. यात मधुमेहासारखा आजार, ज्यात आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते. त्यामुळे ह्रदय, रक्तवाहिन्या, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणाम दिसून येतो. अशावेळी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण, या उपायांमध्ये व्यायाम हा एक जलद आणि प्रभावी उपाय मानला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण व्यायाम केल्याने आपल्या शरीराची हालचाल होते, परिणामी शरीरातील संपूर्ण पेशी स्नायूंना ग्लुकोज योग्यप्रकारे पोहोचते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांना आठवड्यातून किमान १५० मिनिटे, अनेक दिवसांच्या अंतराने व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योग्य श्वासोच्छ्वास व्यायामासह एकत्रित केल्याने अधिक फायदे होतात. पण, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमके कोणत्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत याबाबत आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना योग्य माहिती दिली आहे.

डॉ. मिकी मेहता यांच्या माहितीनुसार, अनेक प्रकारचे वर्कआउट्स रक्तातील साखरेची पातळी त्वरीत प्रभावीपणे कमी करू शकतात, त्यापैकी काही त्यांनी खालीलप्रमाणे सांगितले आहेत.

एरोबिक व्यायाम : सायकलिंगपेक्षा हा चांगला व्यायाम प्रकार आहे का?

वेगवान चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे, पोहणे, नृत्य करणे किंवा तुमच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या इतर कोणत्याही सतत हालचालींमुळे रक्तातील वाढलेली साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते. यासाठी कमीतकमी ३० मिनिटांनी मध्यम स्वरुपाचे एरोबिक व्यायाम प्रकार केले पाहिजेत. अभ्यासात असे दिसून आले आहे की, एक तास मध्यम गतीने सायकल चालवल्याने मधुमेह असलेल्या तसेच वजन जास्त असलेल्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी २४ तासांत निम्मी होऊ शकते. इतकेच नाही तर फक्त अर्धा तास वेगाने सायकल चालवल्याने संपूर्ण दिवसभरात वाढलेली साखरेची पातळी कमी होऊ शकते, शिवाय वजन कमी करण्यास मदत होते.

स्ट्रेंथ ट्रेनिंग : स्क्वॅट्स

मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग हा एक चांगला पर्याय आहे. कारण यामध्ये सर्व स्नायूंची हालचाल होते. यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न करण्यात, स्नायूंचे आरोग्य आणि चयापचय क्रिया सुधारण्यास, विशेषतः रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. स्क्वॅट्स तुम्ही फ्री वेट, मशीन किंवा तुमच्या शरीराच्या वजनाचा वापर करून करू शकता. मधुमेह असलेल्यांसाठी हे प्रभावी व्यायाम प्रकार आहेत. कारण यातून एकाच वेळी अनेक स्नायूंवर काम करता येते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

विविध प्रकारचे वजन उचलण्यासंबंधित व्यायाम प्रकार रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. ते इन्सुलिन संवेदनशीलता आणि स्नायूंचे आरोग्य सुधारतात, ज्यामुळे कालांतराने रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते.

High-Intensity Interval Training (HIIT) : पुशअप्स किंवा वेगवान चालणे

हाय-इंटेनसिटी इंटरवहल ट्रेनिंग (HIIT) मध्ये काही ठराविक वेळात विविध प्रकारचे व्यायामप्रकार केले जातात, यात कमी विश्रांतीसह काही ठराविक अंतराने व्यायाम केले जातात. या व्यायाम प्रकारामुळे इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते, तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते. यात स्प्रिटिंग आणि बॉडीवेटसारख्या व्यायाम प्रकारांचा समावेश आहे. यामुळे डायबिटीज आणि प्री-डायबिटीजचे व्यवस्थापन करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकते. यामुळे शरीराची क्षमता सुधारते. शिवाय, वर्कआउट संपल्यानंतरही HIIT वर्कआउट्स मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करू शकतात, यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते आणि ग्लायसेमिक नियंत्रणास मदत करते.

यात तुम्ही २० सेकंद डंबेल स्क्वॅट्स करा आणि १० सेकंद विश्रांती घ्या; जोपर्यंत तुम्ही हे करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही थकत नाही. यानंतर तुम्ही २० सेकंद बर्पीज (एक व्यायाम ज्यात तुम्ही स्क्वॅट्स करा, पुशअप मारा आणि नंतर हवेत उडी मारा) आणि ३० सेकंद विश्रांती घेऊ शकता, ज्याचे १० राउंड करा, यानंतर ३० सेकंद पुशअप मारा आणि १० सेकंद विश्रांती घ्या, ज्याचे सहा राउंड करा. यानंतर १२ मिनिटे ट्रेडमिलवर धावा; २० सेकंद नुसते धावा आणि ३० सेकंद विश्रांती घ्या.

याशिवाय तुम्ही विविध योगा प्रकार करून रक्ताभिसरण क्षमता वाढवू शकता. अशाप्रकारे रक्त प्रवाह वाढवून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. यात सूर्यनमस्कार करणे हा देखील एक चांगला योग प्रकार आहे.

हायपोग्लाइसेमियाची समस्या टाळण्यासाठी व्यायामापूर्वी आणि नंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा, विशेषत: जर तुम्ही इन्सुलिन किंवा इतर औषधे घेत असाल तर स्वतःला हायड्रेटेड ठेवा, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सकाळी वर्कआउट आणि स्ट्रेच व्यायाम किंवा संध्याकाळी चालणेदेखील उपयुक्त ठरू शकते.