Benefits Of Egg Whites:  दररोज अंड्याचं सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते, असे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एका टीव्ही जाहिरातीतूनही ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ असा संदेश देण्यात आला होता. यातून अंडी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात ते दिसून येते. जगातील बहुतांश लोक ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरमध्ये रोज एक तरी अंडं खातात. यातही अनेकांना अंड्यातील पिवळा भाग तर काहींना पांढरा भाग खायला आवडतो. पण, अंड्यातील पांढऱ्या भागात भरपूर प्रथिने असतात असे सांगितले जाते. विशेषत: फिटनेसबाबत जागरुक असणाऱ्या लोकांनी अंड्याचा पांढरा भाग खाणे अधिक फायदेशीर असते. परंतु, एका व्यक्तीने अंड्यातील पांढरा भाग दिवसातून किती प्रमाणात खाणे सुरक्षित आहे? याविषयी फंक्शनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. विजय ठक्कर यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ….

सर्वप्रथम अंड्यातील पांढऱ्या भागात किती प्रमाणात पोषक घटक असतात समजून घेऊ. अंड्यातील पांढऱ्या भागात जवळजवळ शुद्ध प्रथिने असतात. एका अंड्याच्या पांढऱ्या भागात सुमारे ३.६ ग्रॅम प्रथिने आणि फक्त १७ कॅलरीज असतात. कॅलरीच्या सेवनावर लक्षणीय परिणाम न करता प्रथिनांचे सेवन वाढवू पाहणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. शिवाय, अंड्याचा पांढरा भाग फॅटची संख्या कमी आणि कोलेस्ट्रॉलमुक्त असतो, ज्यामुळे हायपरकोलेस्ट्रोलेमिया आणि हाय ट्रायग्लिसराइड्स असणाऱ्या लोकांच्या हृदयासाठीदेखील हे चांगले मानले जाते.

Viral Video: Engineer Turned Garbage Collector Goes Viral
एकेकाळी दुबईत इंजिनिअर असलेल्या व्यक्तीवर आज ‘ही’ वेळ; VIDEO पाहून तुम्हीच सांगा त्याचं काय चुकलं?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
EY Pune employee death
अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?
Mahendra Singh Dhoni Health news
…म्हणून धोनी महिनाभर शाकाहारी झाला; मांसाहारी व्यक्तीने आहारात बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो
Monstrous bodybuilder dies of heart attack
बॉडीबिल्डर इलिया गोलेमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; दिवसातून 7 वेळा करायचा जेवण; पण असं खाणं कितपत योग्य? वाचा डॉक्टरांचे मत
Ghee tea benefits
खरंच तूपयुक्त कॉफीप्रमाणे तूपयुक्त चहा आहे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या, तुपाच्या चहाचे फायदे

एखाद्याने अंड्याच्या पांढऱ्या भागाचे किती सेवन करावे हे ठरवताना व्यक्तीच्या शारीरिक स्थितीची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. हे एखाद्याची रोज प्रथिने सेवनाची गरज त्याचे शरीराचे वजन, शरीररचना, क्रियाकलाप पातळी आणि फिटनेस लक्ष्यांसह विविध घटकांवर अवलंबून असतात.

बैठी जीवनशैली जगणाऱ्या लोकांच्या आहारात (RDA)शारीरिक वजनाच्या प्रति किलोग्राम (किलो) मागे ०.८ ग्रॅम (ग्रॅम) प्रथिने असे आवश्यक आहे. नव्या संशोधनानुसार, आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या शरीराची ताकद आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी ही उपभोग पातळी पुरेशी नसू शकते, यावेळी ती शारीरिक वजनाच्या १.२ ग्रॅम/किलोपर्यंत वाढवणे आवश्यक असू शकते. या मार्गदर्शक तत्त्वानुसार, संतुलित आहाराचा भाग म्हणून दररोज ८ -१० अंड्यांचा पांढरा भाग खाल्ल्यास इतर कशाचे सेवन न करता तुमच्या शरीराच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करू शकता.

पण, अशावेळी इतर कोणताही प्रथिनेयुक्त पदार्थ किंवा आहार घ्यायचा नाही. जर घेणार असाल तर तुम्ही सहा अंड्यांचा पांढरा भाग खाणे सुरक्षित असू शकते.

नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीने अंड्यांचा पांढरा भाग दिवसाला किती प्रमाणात खावा याचे प्रमाण वेगळे आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन (ISSN) नुसार, अशा व्यक्तींसाठी दुप्पट प्रथिनांची आवश्यकता असते. म्हणजे शारीरिक वजनाच्या प्रति किलोमागे २.४ ग्रॅमची गरज असते. ६८ किलो वजनाच्या व्यक्तीसाठी (अंदाजे १५० पौंड), हे दररोज सुमारे १६३ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. याची गरज पूर्ण करण्यासाठी, एखादी व्यक्ती स्नायूंच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी दररोज १८-२० अंड्यांचा पांढरा भाग सुरक्षितपणे सेवन करू शकते.

पण, सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिडचे सर्वसमावेशक सेवन सुनिश्चित करण्यासाठी विविध पदार्थ्यांच्या सेवनातून प्रथिने मिळवणे आवश्यक आहे.

यात फक्त अंड्याच्या पांढऱ्या भागावर लक्ष केंद्रित करून पिवळ्या बलकाच्या सेवनाकडे दुर्लक्ष करणे चूक ठरू शकते. अंड्यातील पिवळ्या बलकात कोलेस्ट्रॉल असते हे खरे असले, तरी संशोधन असे सूचित करते की, बहुतेक लोकांच्या आहारातील कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर कमीत कमी प्रभाव पडतो. अंड्यातील पिवळा बलकदेखील पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यात जीवनसत्त्वे A, D, E आणि K व कोलीनसह अनेक पोषक घटक आहेत, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

शिवाय आहारातील विविधतेवर जोर देणे आवश्यक आहे. अंड्याच्या पांढऱ्यावर जास्त अवलंबून राहिल्याने पौष्टिक असंतुलन होऊ शकते. मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थ, शेंगा आणि अंडी यांसारख्या प्रथिनांच्या स्रोतांचा समावेश असलेला आहार केवळ फिटनेसची उद्दिष्टेच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.

परंतु, विविध पदार्थांमधील पोषक घटकांचे फायदे व्यक्तिपरत्वे बदलणारे आहेत. एखादा पोषक घटक एखाद्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरतोय तर तो दुसऱ्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरलेच असे नाही. त्यामुळे आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे किंवा फायदेशीर आहे हे तुम्ही तुमचं ओळखा.