उन्हाळा सुरू झाला की, अनेक हंगामी फळं बाजारात उपलब्ध होतात. विशेषत: आंबा, फणस यांबरोबर अनेक परदेशी फळांनाही मोठी मागणी असते. त्यात क्रॅनबेरी हे फळ उन्हाळ्यात अनेक जण आवडीने खातात. शरीरासाठी पोषक असलेल्या फळाचे खूप फायदे आहेत. पण, तुम्ही क्रॅनब्रेरीप्रमाणेच दिसणारी काळ्या रंगाची करवंदे कधी खाल्ली आहेत का? खेड्यापाड्यांत मोठ्या प्रमाणात मिळणारी ही रानटी करवंदे चवीला तर भारीच; पण पौष्टिक मूल्यांच्या बाबतीतही गुणकारी आहेत. त्यामुळे क्रॅनबेरीला रानातील करवंदेहा चांगला पर्याय असू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यात त्यांनी क्रॅनबेरी की करवंद यापैकी आपल्या शरीरासाठी कोणते फळ उपयुक्त ठरू शकते हे सांगितले आहे.

करवंद

करवंद ज्याला काळे मनुके, असेही म्हटले जाते. भारतातातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात उगवणारे हे फळ आहे. या फळापासून लोणचे, जाम, डिप्स आणि इतर अनेक गोड, आंबट पदार्थ बनवले जातात. पण, चवीपलीकडे त्यात अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत; जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

१) क जीवनसत्त्व

करवदांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मदत होते.

२) आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

करवंदामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आतड्यांची हालचाल नियंत्रित करता येते आणि एकूणच आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते.

३) अँटिऑक्सिडंट घटक

अँथोसायनिन्स फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध करवंद ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करते. त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवते. तसेच हृदयरोग आणि टाईप-२ मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करते.

४) अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे

करवंदामध्ये जीवनसत्त्व अ, ब, कॅल्शियम, फॉस्फरस व लोहाचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे डोळे आणि हाडांचे आरोग्य सुधारते. त्याशिवाय चयापचय आणि शारीरिक क्रिया सुधारण्यास मदत होते.

करवंद की क्रॅनबेरी, यात आरोग्यासाठी कोणते फळ चांगले?

क्रॅनबेरी आणि करवंद या दोन्ही फळांचा रंग वेगवेगळा असला तरी ही दोन्ही फळे आकार आणि चव या बाबतीत काही प्रमाणात एकसारखीच आहेत. त्यामुळे त्यांची वारंवार परस्परांशी तुलना केली जाते. याच गोष्टीवर आहारतज्ज्ञ प्रेमानी यांनी काही प्रमुख फरक सांगितले आहेत.

पापड किंवा इतर पदार्थ तळल्यानंतर उरणाऱ्या तेलाचे काय करायचे? ICMR ने दिल्या महत्त्वाच्या टिप्स

१) पौष्टिक घटक

करवंद आणि क्रॅनबेरी या दोन्हीमध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. पण, करवंदांमध्ये याचे प्रमाण थोडे जास्त असते. क्रॅनबेरीमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.

२) चव

करवंदे काही वेळा गोड आणि काही वेळा तितकीच आंबट असतात; पण क्रॅनबेरी खूप आंबट असतात.

३) किंमत आणि उपलब्धता

भारतात करवंद हे स्थानिक आणि हंगामी फळ आहे. त्यामुळे ते आयात केलेल्या क्रॅनबेरीपेक्षा स्वस्त असते.

करवंदे खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितेयत का?

आहारतज्ज्ञ प्रेमानी यांनी करवंदांचा आहारात समावेश करण्याच्या फायद्याविषयी सांगितले आहे.

१) अधिक पौष्टिक

परदेशातून आयात होऊन येणाऱ्या फळांच्या तुलनेत स्थानिक हंगामी फळांमध्ये अधिक पौष्टिक घटक असतात.

२) पीक, फ्लेवर आणि पोषण

स्थानिक पातळीवर उगवलेली फळे चांगल्या प्रकारे परिपक्व झाल्यावर काढली जातात. त्यामुळे त्यांची चव आणि त्यातील पौष्टिक मूल्ये जास्तीत जास्त वाढतात.

३) स्थानिक अर्थव्यवस्थेला सहायक

स्थानिक फळांची निवड केल्यास स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि वाहतुकीशी संबंधित कार्बन फूटप्रिंट कमी होतो.

४) आतड्यांच्या आरोग्याला चालना

करवंदांसारख्या ताज्या, कमीत कमी प्रक्रिया केलेल्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे तुमच्या आतड्यांच्या मायक्रोबायोममध्ये विविधता आणण्यास मदत होते. अशाने तुमची पचनसंस्था मजबूत होते.

करवंद आणि क्रॅनबेरी या दोन्ही फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. पण आहारतज्ज्ञ प्रेमानी यांच्या मते, कोणत्याही फळाची निवड ही तुमच्या वैयक्तिक प्राधान्य आणि आहाराच्या गरजांवर अवलंबून असते. तुम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध, किफायतशीर व क जीवनसत्त्वयुक्त आंबट असलेले फळ शोधत असाल, तर करवंद तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण जर तुम्ही अधिक आंबट चव पसंत करीत असाल आणि त्याची किंमत अधिक असली तरी त्याबद्दल काही हरकत नसेल, तर क्रॅनबेरी अजूनही एक निरोगी पर्याय असू शकतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा- आपल्या आहारात विविध फळांचा समावेश करणे हे जास्तीत जास्त फायदे मिळवणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy healthy fruits cranberries vs karonda which is healthier cranberries and karonda health benefits sjr
First published on: 06-06-2024 at 01:12 IST