Healthy Hair Tips Hacks : प्रत्येकाला निरोगी, चमकदार, लांबसडक केस हवे असतात; पण आजकालच्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक खराब केसांमुळे त्रस्त आहेत. विशेषत: हिवाळ्यात केस अधिक कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. त्यात केसांमध्ये फाटे फाटण्याची समस्याही वाढते. अशा वेळी केस विंचरताना त्रास होतो. त्याशिवाय केसांची वाढ खुंटते. त्यामुळे बहुतेक जण अशा वेळी केस कापणे पसंत असतात.
जर तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील, तर केस कापण्यापूर्वी ही माहिती एकदा वाचा. कारण- आम्ही तुम्हाला कोरडे आणि फाटे फुटणाऱ्य़ा केसांपासून सुटका मिळविण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
फाटे फुटणाऱ्या केसांपासून सुटका कशी मिळवायची?
एक प्रसिद्ध युट्यूबर ब्लोआउट प्रोफेसर हिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता; ज्यात तिने तीन उपाय करून आठवडाभरात केसांमधील कोरडेपणा, फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका मिळवता येते, असा दावा केला.
त्या यूट्यूबरने पहिला उपाय सांगितला की, केसांना तेल आणि सीरम वापरणे, दुसरा उपाय हीट प्रोटेक्शन प्रॉडक्ट्सचा वापर करणे आणि तिसऱ्या शेवटच्या उपायात चांगल्या दर्जाचा ग्रेड शॅम्पू, कंडिशनर व मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यावर ब्लोआउट प्रोफेसरने स्पष्ट केले की, हे उपाय केवळ एक आठवड्यासाठी केल्यास तुम्ही खराब झालेले केस पुन्हा निरोगी आणि मऊ ठेवू शकता.
यावर तज्ज्ञांचे काय मत आहे?
यूट्यूबर ब्लोआउट प्रोफेसरच्या या व्हिडीओवर दी इंडियन एक्स्प्रेसने एनव्ही सलूनचे हेअर एक्स्पर्ट नमिका कांत यांचे मत जाणून घेतले, ज्यात एक्स्पर्ट कांत म्हणाले की, हेअर ऑइल, सीरम, हीट प्रोटेक्शन, प्रोफेशनल ग्रेड शॅम्पू, कंडिशनर व मास्क अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून खराब झालेले केस पुन्हा निरोगी करता येऊ शकतात.
जसे की,
१) हेअर ऑईल
नमिका कांत यांच्या मते, हेअर ऑईल आणि सीरम केसांना खोलवर हायड्रेट करतात आणि केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवतात. कारण- खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी ओलावा खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत हेअर ऑइल आणि सीरमच्या वापराने केसांना फुटणारे फाटे कमी करण्यास मदत होऊ शकते.
२) हीट प्रोटेक्शन प्रॉडक्ट्स
हीट प्रोटेक्शन प्रॉडक्ट्स तुमच्या केसांवर एक थर तयार करतात. त्यामुळे उन्हात केसांचे होणारे नुकसान रोखता येते; ज्यामुळे खराब झालेले केसही बरे होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमचे केस स्टाईल करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर करत असाल, तर तुम्ही केसांसाठी हीट प्रोटेक्शन प्रॉडक्ट्स वापरणे आवश्यक आहे. कारण- हीट प्रोटेक्शन प्रॉडक्ट्स स्टायलिंग टूल्समुळे केसांचे होणारे नुकसान कमी करतात आणि केसांचे संरक्षण करते.
३) प्रोफेशनल ग्रेड शॅम्पू, कंडिशनर व मास्क
प्रोफेशनल ग्रेड शॅम्पू, कंडिशनर व मास्क यांच्या मदतीने तुम्ही खराब झालेले केस पुन्हा मऊ, मुलायम करू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला केसांवर हेअर केअर प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागेल. कारण- या प्रॉडक्टसमुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. केस मजबूत होतात, तसेच स्कॅल्प हेल्थदेखील सुधारते; ज्यामुळे केसांमधील कोरडेपणा किंवा फाटे फुटण्याची समस्या कमी करता येते.
एका आठवड्यात निकाल खरोखर दिसू शकतो का?
या प्रश्नाबाबत नमिका कांत सांगतात, केसांची निगा राखण्यासाठीच्या या तीन स्टेप्स नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. जर तुमचे केस खूपच खराब झाले असतील, तर ते पुन्हा निरोगी दिसण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला आहारातदेखील बदल करावे लागतील. कारण- खाण्याच्या सवयींचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यासाठी तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. त्याशिवाय केस नियमित धुवा.
निरोगी केसांसाठी सोपे उपाय
१) डीप नॅरिशिंग ट्रीटमेंट : हेअर स्पा आणि हेअर ऑयलिंगमुळे केसांना खोलवर पोषक घटक पोहोचवता येतात. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. कोरडेपणा कमी होत, केस पुन्हा चमकदार दिसू लागतात.
२) स्कॅल्प डिटॉक्स : स्कॅल्प डिटॉक्समुळे केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. त्यात केसांना हलक्या हाताने मालिश केले जाते; ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि टाळूवरील डेड स्कीन सेल्स कमी होतात. त्यामुळे कोंडा आणि कोरडेपणापासूनही आराम मिळतो.
हेही वाचा – आठवड्यातून एक दिवस मद्यप्राशन करणाऱ्यांचे यकृत आतून कसे दिसते? पाहा फोटो , डॉक्टर म्हणाले…
३) प्रोटीन ट्रीटमेंट : सलून-ग्रेड प्रोटीन ट्रीटमेंटमुळे खराब झालेले पुन्हा केस दुरुस्त करता येतात. केस पुन्हा मजबूत आणि घनदाट होतात; ज्यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होते.
४) हीट प्रोटेक्शन स्प्रे : तुम्ही हेअर स्टायलिंग करताना जर कोणत्या हॉट टूल्सचा वापर करणार असाल, तर त्यापूर्वी हीट प्रोटेक्शन स्प्रे वापरा. त्या हीटमुळे केसांचे होणारे नुकसान टाळता येते आणि केसांची मजबुती टिकवता येते.
५) हेअर वॉश रुटीन : केसांमधील नैसर्गिक तेल टिकविण्यासाठी केस जास्त धुणे टाळा. हायड्रेशन राखण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी प्रोफेशनल ग्रेड शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.
मजबूत आणि चमकदार केस मिळविण्यासाठी इन-सलून उपचारांबरोबर केसांची घरच्या घरी काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे यावर कांत यांनी भर दिला. केसांच्या पोषणासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा वापर करणेही तितकेच गरजेचे आहे.
© IE Online Media Services (P) Ltd