Ayurvedic Hair Oils To Reduce Hairfall And Help Hair Growth : केस निरोगी आणि चमकदार असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, बदलत्या वातावरणामुळे अनेकांना केसांसंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागतेय. त्यातही बहुतांश लोक केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. किती शॅम्पू बदलून, तेल वापरूनही फरक पडत नसल्याने आता केसांची काळजी घ्यायची तरी कशी, असा प्रश्न अनेकांना सतावतोय. रोज होणाऱ्या केसगळतीमुळे अनेक महिला डोक्यावर फक्त शेपटीएवढेच केस शिल्लक राहिल्याचे सांगताना दिसतात. तर, काहींच्या केसांची वाढ खुंटली आहे. अशा परिस्थितीत केसांना निरोगी ठेवणे कठीण होऊन जाते. दरम्यान, निरोगी केसांसाठी बदाम तेल, मोहरीचे तेल, कढीपत्ता, मेथीचे दाणे यांच्यापासून घरच्या घरी तयार केलेले एक नैसर्गिक तेल फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

आहारतज्ज्ञ लीमा महाजन यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून हे नैसर्गिक तेल केसांच्या उत्तम असल्याचे सांगितले आहे. पण, खरेच हे नैसर्गिक तेल केसांच्या वाढीस उपयुक्त ठरू शकते का, यावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील भाटिया रुग्णालयाचे त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ व केस प्रत्यारोपण सर्जन डॉ. सौरभ शाह यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Taddev, fish market toilet problem Taddev,
मुंबई : मोर्चाचा इशारा देताच पालिकेकडून तात्पुरत्या शौचालयाची उभारणी
Viral Video Shows How To Pack Rasgulla
पॅकबंद डब्यातील रसगुल्ले खाताय? मग ‘हा’ VIRAL VIDEO अगदी शेवटपर्यंत बघा, अंगावर येईल काटा
How to store green chili for a long time
फ्रिजशिवाय हिरवी मिरची दीर्घकाळ कशी साठवायची? फॉलो करा ‘या’ तीन सोप्या टिप्स…

रोज १०० ग्रॅम ओट्स खाल्ल्याने काय फायदे होतात? डॉक्टर म्हणाले…

‘या’ नैसर्गिक तेलासंदर्भात आहारतज्ज्ञ लिमा महाजन काय म्हणाल्या?

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, रोझमेरी तेल केसांसाठी उत्तम काम करते. या तेलाचा रोज वापर केल्यास तीन ते सहा महिन्यांत परिणाम दिसू लागतात. मेथीचे दाणे केसांच्या मुळांचे पोषण करून आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढतात. तसेच केसांच्या वाढीस मदत करतात.

मेथीच्या दाण्यांमध्ये असलेली प्रथिने केसांची मुळे मजबूत करून, केसगळती कमी करतात आणि निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेत कढीपत्त्यात असलेली प्रथिने आणि बीटा कॅरोटीनमुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञ महाजन म्हणाल्या.

केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक तेल कसे बनवायचे?

साहित्य

मोहरीचे तेल
कढीपत्ता
रोझमेरीची पाने
मेथीचे दाणे
बदाम
तेल
एरंडेल तेल

तेल बनवण्याची कृती

एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा. त्यात रोझमेरीची पाने, कढीपत्ता व मेथीचे दाणे घाला. तेलाचा थोडा रंग बदलला आणि सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स झाल्याचे दिसले की, गॅस बंद करा. आता हे तेल थंड होऊ द्या. त्यानंतर एका काचेच्या बरणीत किंवा बाटलीमध्ये ते ठेवा.
हे तेल बनवताना त्यात बदाम आणि एरंडेल तेलाचे प्रमाण एकसमान घ्या.

डॉ. सौरभ शाह काय म्हणाले?

केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे. मोहरीचे तेल कोरड्या आणि निर्जीव केसांना पोषण देण्याचे काम करते. त्यात अल्फा फॅटी ॲसिड असते; जे केसांना ओलावा पुरवतात. तसेच केसांना ते नॅचरल कंडिशनिंग इफेक्ट देतात. मोहरीच्या तेलाने केसांना, तसेच टाळूला मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि तुटत नाहीत. मोहरीच्या तेलातील लिनोलेनिक ते ओलिक अॅसिडचे प्रमाण केस हायड्रेटेड आणि निरोगी ठेवतात, असे डॉ. शाह म्हणाले.

मेथीचे दाणे निरोगी केसांसाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड (व्हिटॅमिन बी) केसांना आतून पोषण देण्यास मदत करतात. त्यामुळे केस गळणे आणि कोंड्याची समस्या दूर होते, असे डॉ. शाह म्हणाले.

बदामाचे तेल आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. हलके आणि जलद शोषणाऱ्या तेलाच्या वापराने केसांची लांबी लवकर वाढते. केस दाट आणि काळेभोर होतात. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ७, व्हिटॅमिन ई, एसपीएफ ५, बायोटिन, अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात; जे केसांना खोलवर कंडिशनिंग देत चमकदार, मजबूत व घनदाट बनवतात.

त्यातील ओमेगा ६ व ९ फॅटी अॅसिडसह मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे घटक केसांचा कोरडेपणा दूर करतात. त्यांना फाटे फुटण्याच्या समस्येपासून वाचवतात, तसेच केसांच्या इतर समस्याही कमी करतात, असेही डॉ. शाह म्हणाले.

डॉ. शाह यांच्या मते, हे नैसर्गिक तेल केसांच्या सामान्य समस्यांबरोबरच इतर गंभीर समस्यांवर उपचार करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. त्यात कोरड्या केसांची समस्या, टक्कल पडणे, केस पातळ होणे, अकाली केस पांढरे होणे अशा अनेक समस्यांना नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

तरीही केसांवर कोणत्याही प्रकारचे तेल, मास्क लावण्यापूर्वी तुम्ही योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण- प्रत्येकाच्या केसांची पोत, रचना वेगवेगळी असते. त्यामुळे केसांवर कोणतेही उपाय करण्यापूर्वी योग्य अशा तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या.

Story img Loader