World Heart Day 2023 : डिजेच्या कर्कश आणि जोरदार दणदणाटामुळे सांगलीमध्ये दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तासगाव येथे गणेशविसर्जनाची मिरवणूक पाहायला गेलेल्या तरुणाचा डिजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. शेखर सुखदेव पावशे असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याला हृदय विकारचं निदान झालं होतं. अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया नुकतीच त्याच्यावर झाली होती. गावात सुरू असलेली गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तो गेला होता. यावेळी डीजे लावण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत वेदना होत असल्याचे त्याने सांगितल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तर दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली. ३५ वर्षीय प्रवीण शिरतोडेचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला.या दोन घटनांमुळे डीजे किंवा डॉल्बीच्या तीव्र आवाजाचा हृदयावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.

याबाबत मुंबईतील जसलोक हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. हेमंत पाठारे यांनी लोकसत्ताला माहिती देताना सांगितले की जोरदार काणठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढत असतात. हृदयाची गती वाढते. परिणामी त्याने रक्तदाब वाढतो आणि अशा समारंभातील प्रचंड गर्दीमुळे श्वास घेण्याची समस्या निर्माण होते. या सगळ्या कारणांमुळे ज्यांचे हृदय नाजूक आहे, त्यांना खूप त्रास होतो. परिणामी रक्तवाहिनी (आर्टरी) फाटते, क्लॉट निर्माण होतो आणि मग अशा प्रकारे मृत्यू होण्याच्या घटना घडतात.. तसंच चुकीची जीवनशैली, आपल्या हृदयाबाबतची नाजूक स्थिती जी कदाचित रुग्णाला आधी माहित नसते, तणावपूर्ण आयुष्य, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, स्मोकिंग, तंबाखू, दारूचं व्यसन अशी इतर कारणंही अशा पद्धतीच्या हृदयाचा झटका येण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.

chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना
Pandurang Ulape Kolhapur
“..आणि मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले”, कोल्हापुरात घडली अविश्वसनीय घटना
Image of a well
पत्नीशी वाद झाला म्हणून तरुणाने दुचाकीसह मारली विहिरीत उडी, वाचवायला गेलेल्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू

ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम –

पुढे मोठ्या आवाजावर व्यक्त होताना डॉक्टर पाठारे म्हणतात, की ७० डेसिबल या मर्यादेपर्यंतचा आवाज आपले कान सहन करू शकतात. १०० डेसिबलच्या वरील मर्यादेचा आवाज सतत कानावर पडल राहिल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. परिणामी कानाचा पडदा फाटू शकतो. बहिरेपणा येऊ शकतो. या आवाजामुळे कानाची जी नस आपल्या हृदयाला जोडलेली असते ती स्टिम्युलेट होते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.


हेही वाचा – Binge Drinking : महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

यासाठी कारणीभूत घटक कोणते ?

तणावपूर्ण आयुष्य
चुकीची जीवनशैली
खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा
उशिरापर्यंत संगणकावर काम
स्मोकिंग, तंबाखू, दारूचं व्यसन
ध्वनी प्रदूषण
हवेचे प्रदूषण

आवाजामुळे हृदयावर कसा परिणाम होतो?

रक्तदाब वाढणे
हार्ट रेट वाढणे
स्ट्रेस होरमोनची संख्या वाढणे
थरथरी भरणे
घाबरल्यासारखे होणे

हेही वाचा : Health Special: हृदयविकाराचे प्रकार

सरकारने त्वरित कारवाई करणे महत्त्वाचे –

तसेच गेली २० वर्षे सर्वोच्च न्यायालयात आवाजाविरोधात लढा उठविणाऱ्या सुमायरा अब्दुला यांनीदेखील अती आवाजामुळे हृदयावर होणाऱ्या त्रासाबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे. त्या म्हणतात की आवाजाची मर्यादा न्यायालयाने ठरवलेली आहे. जेणेकरून मनुष्याच्या जीवाला त्रास होणार नाही. यावर सगळे कायदे आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत. माझ्या वीस वर्षाच्या अनुभवाद्वारे सांगायचं झालं तर आधीपेक्षा आवाजाच्या या समस्येचे सध्या प्रमाण कमी झालेले आहे. सणसमारंभात मात्र याचा अजूनही अतिरेक झालेला दिसून येतोच. यासाठी लोकांमध्ये या अती आवाजामुळे शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचे जे भयंकर स्वरूपात त्रास होतात, याबाबत भान येणं महत्त्वाचं आहे. याविषयी आणखीन लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच जिथे गरजेचं आहे तिथे सरकारने त्वरित कारवाई करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं त्या नमूद करतात.

Story img Loader