World Heart Day 2023 : डिजेच्या कर्कश आणि जोरदार दणदणाटामुळे सांगलीमध्ये दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तासगाव येथे गणेशविसर्जनाची मिरवणूक पाहायला गेलेल्या तरुणाचा डिजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. शेखर सुखदेव पावशे असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याला हृदय विकारचं निदान झालं होतं. अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया नुकतीच त्याच्यावर झाली होती. गावात सुरू असलेली गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तो गेला होता. यावेळी डीजे लावण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत वेदना होत असल्याचे त्याने सांगितल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तर दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली. ३५ वर्षीय प्रवीण शिरतोडेचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला.या दोन घटनांमुळे डीजे किंवा डॉल्बीच्या तीव्र आवाजाचा हृदयावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.
Premium
डिजेच्या दणदणाटामुळे हृदयावर होतोय गंभीर परिणाम, दोन तरुणांचा मृत्यू; जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ…
डिजेच्या कर्कश आणि जोरदार दणदणाटामुळे सांगलीमध्ये दोन तरूणांचा मृत्यू घडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनांमुळे आवाजाचा हृदयावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. याबाबत हृदयविकारतज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या...
Written by हेल्थ न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-09-2023 at 21:48 IST
TOPICSमराठी बातम्याMarathi Newsलोकसत्ता प्रीमियमPremium Loksattaहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits
+ 2 More
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dj sound loud music causes serious heart attack two youths died recently find out what the experts say psh