– डॉ. विजय कदम

बऱ्याचदा दातांविषयी आपण बोलतो, त्यामध्ये खूप वेळा दातांबद्दलची माहिती किंवा दातांबद्दलच्या उपचारांची माहिती दिली जाते. गेल्या २५ वर्षांत, एक लाखांहून अधिक रुग्ण तपासल्यानंतर, त्यांच्यावरील उपचारानंतर वाटतं की, आपण रुग्ण आणि दंतवैद्यक यांच्याविषयीही काही माहिती देणे आवश्यक आहे. कारण काही वेळेस, अशा काही गोष्टी कळतात की ज्या दंतवैद्यकाला (डेंटिस् ला) अपेक्षित नसतात आणि काही वेळा डेंटिस्टकडून काही गोष्टी अशा घडत जातात, ज्यामुळे रुग्णाला अनपेक्षित धक्का बसतो.

चला तर मग, आज आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलूया आणि त्यातील गमतीजमतींचाही आनंद घेऊ या. फक्त आनंद घेणे हा त्यातील उद्देश नसून त्यातून दोघांनाही आपले चांगले-वाईट मुद्दे समजले तर त्याचा रुग्ण व डेंटिस्ट या दोघांनाही लाभ होईल. यापूर्वी चिं. वि. जोशींसारख्या महान प्रतिभावान विनोदी लेखकाने त्यांच्या लेखनात डेंटिस्टबद्दलच्या गोष्टी सांगून आपल्याला पोटभरून हसवलं आहेच. पण या हसवण्यातून काही गैरसमज डेंटिस्टबद्दल पसरायला, चुकून हातभारही लागला आहे. व्यंगकाराचे लक्ष जेव्हा एखाद्या व्यवसायावर, व्यक्ती, सामाजिक परंपरांवर जाते तेव्हा ते एका अर्थाने त्या व्यक्तीने, संघटनेने त्या क्षेत्रातील चांगलं किंवा वाईट त्यातही वाईटच जास्त गोष्टीवर केलेले विपरीत परिणाम होऊन तो व्यंगकार किंवा विनोदी लेखक प्रहसन, वात्रटिका यांचं लक्ष किंवा भक्ष्य होतो. बघू या, आपण आज जो वेगळा विषय घेऊन चर्चा करत आहोत, त्याने डेंटिस्टमध्ये काही सकारात्मक बदल होतो का ? आणि त्याचबरोबर रुग्णांना ट्रीटमेंटची माहिती देताना त्यांच्याकडूनही डेंटिस्टला काय अपेक्षा असतात त्याही…

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा – अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? खरंच वाढतो हृदयविकाराचा धोका? जाणून घ्या

मला कॉलेजमध्ये इंटर्नशिप दरम्यानचा एक प्रसंग खास आठवतो. प्रवरा विद्यापीठाचे आमचे डेंटेल कॉलेज म्हणजे तसा मराठी ग्रामीण भाग. जवळपास सर्वच ग्रामीण मराठी बोलणारे. आमचे बरेचसे कॉलेजमेट मात्र संपूर्ण भारतातून शिकण्यासाठी लोणी, अहमदनगर येथे येत. काही तर बाहेरच्या देशातील विद्यार्थी असत. उत्तर भारतीय हिंदी, पंजाबी बोलणाऱ्यांचे प्रमाण त्यात जास्त होते. एकदा फेटे घातलेले वयोवृद्ध आजोबा दात काढण्यासाठी डेंटल चेअरवर बसलेले होते. एक पंजाबची मुलगी त्यांचा दात काढत असताना त्यांना सूचना करीत होती. ‘बाबा टंग उपर करो’ म्हणजे जीभ वर करा. बाबांना हिंदी जास्त समजत नव्हते. त्यामुळे त्यांना ती काय म्हणते हे व्यवस्थित समजत नव्हते. बाबांना ऐकू येत नाही म्हणून मोठ्या आवाजात ‘बाबा टंग उपर करो’ असे जोरात ती म्हणाली. बाबा गोंधळून टांग उपर करत होते. मुलीला मराठी येत नव्हते. तिला हे कळत नव्हते ‘बाबा पाय वर का करत आहे? हे तीन-चार वेळा झाल्यानंतर रेसिडेंट डॉक्टरांच्या हा प्रकार लक्षात आला व ते धावत येऊन त्यांनी बाबांना समजावून सांगितले. ”’बाबा टांग नाही तर टंग’, म्हणजे जीभ वर करायची आहे. जेणेकरून डॉक्टरांना तुमचा दात व्यवस्थित दिसेल.” रेसिडेंट डॉक्टरांनी वेळीच येऊन झालेल्या प्रसंगातून योग्य मार्ग काढला. नाही तर भलताच गोंधळ झाला असता.

वरील प्रसंगातून एक बोध सर्व डेंटिस्टने घ्यायला हवा की, आपण सूचना देतांना त्या व्यवस्थित द्यायला पाहिजेत. तसंच रुग्णाला जी भाषा येते, ती डॉक्टरांनीही थोडीफार शिकायला हवी. किंवा जिथे आपण प्रॅक्टिस करतो ती स्थानिक भाषा आपल्याला माहीत हवी. या बरोबरच रुग्णाला आपल्या सूचना कळत नसतील तर चेहऱ्याचे हावभाव किंवा हातवारे करून खुणा करूनही रुग्णाला आपण सांगायला हवं. तसंच खालच्या दातावर ट्रीटमेंट करताना खालच्या जबड्यावर इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळाने आपण रुग्णाला काही प्रश्न विचारावेत; जसं की जिभेला मुंग्या आल्यासारख्या वाटतात का ? ओठ जड झालेला वाटतो का ? गालाला सूज आल्यासारखी वाटते का? किंवा त्या बाजूचा भाग बधिर वाटतो का ? असे सूचक प्रश्न विचारल्यानंतर रुग्ण त्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो, परंतु एकदा असेच आमच्या हजरजबाबी मित्राने रुग्णाला सूचक प्रश्न न विचारता, जनरल प्रश्न विचारला. काका मुंग्या आल्यासारख्या वाटतात का ? रुग्णाने उत्तर दिले हो… त्यावर डेंटिस्ट मित्राने विचारले कुठे ? तर रुग्णाने हृदयावर हात ठेवून सांगितले, इथे (म्हणजे हृदयाला मुंग्या आल्यासारखं वाटतात !) आमचा मित्र जरा दचकून गेला परंतु सावरत म्हणाला, काका जिभेला, गालाला, ओठाला, मुंग्या आल्यासारख्या वाटतात का ? त्यावर रुग्ण म्हणाला हो, हो ! तेव्हा मित्र जरा सुखावला व सावरला परंतु जोपर्यंत त्याच्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या होत्या हेही खरे ! म्हणजेच आपण संवाद साधताना किती नेमके प्रश्न विचारायला हवेत, हे वरील मजेशीर प्रसंगातून डेंटिस्ट मंडळींनी शिकायला हवं.

हेही वाचा – खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यासाठी दिवसाला किती बदाम खावे? डॉक्टरांनी सांगितले, “प्रत्येक जेवणाआधी…”

मोबाइलने तर सध्या संपूर्ण जगात इतका धुमाकूळ घातला आहे की विचारता सोय नाही. त्याला डेंटिस्ट्रीसुद्धा अपवाद नाही आपण आपल्या ‘वेरी गालिस्ट’मध्ये किती मोबाइल सायलेंटवर ठेवा, स्विच ऑफ ठेवा अशा सूचना लिहा किंवा रिसिप्शनिस्टने कितीही विनंती केली तरी रुग्ण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येताना मोबाइल सायलेंट करीत नाहीत. काही हुशार रुग्ण तर डॉक्टरांच्या केबिनमध्ये आले आणि कॉल आला तर मोठ्या आवाजात बोलायलाही कचरत नाहीत. तर कधी अक्षरशः डेंटल ट्रीटमेंट चालू असतानाही यांच्या मोबाइलची रिंग मोठ्याने वाजते. त्यात चित्रविचित्र रिंगटोन असतात.

ट्रीटमेंट चालू असूनही काहीजण फोन घेतात व बोलायचा प्रयत्न करतात. तर काही थोर मंडळी ट्रीटमेंट चालू असताना बोलणे शक्य नाही तर लाऊड स्पीकरवर फोन सेट करतात. काही जण मेसेज चॅटिंग करतात. रुग्णासोबत आलेला महाभाग तर ट्रीटमेंट चालू असतानाही त्यांच्या तोंडाचा पट्टा मोबाइलवर चालू ठेवतात. खरं म्हणजे मोबाइलच्या या अतिवापरामुळे आपण डॉक्टरांना त्रास देतो, याची जाणीवच नसते. स्वतः रुग्णाला याचा त्रास होऊ शकतो. नको नको त्या रिंग टोन्सने ट्रीटमेंटदरम्यान वातावरण डिस्टर्ब होते. हे रुग्णाने व त्याच्या नातेवाईकाने समजून घ्यायला हवे. शक्यतो स्वतःहूनही आचारसंहिता पाळायला हवी. यात रुग्ण व डॉक्टर दोघांचेही हित सामावले आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. 

Story img Loader