Winter Dehydration : आपल्याला नेहमी वाटते की निर्जलीकरण (डिहायड्रेशन) हे फक्त उन्हाळ्यात म्हणजेच उष्ण वातावरणात जाणवते. जेव्हा हिवाळ्यात उष्णता नसते तेव्हा आपण गृहीत धरतो की, मुलांना उन्हाळ्याप्रमाणे जास्त पाणी पिण्याची आवश्यकता भासत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, आरोग्याच्या दृष्टीने मुलांना हिवाळ्यात भरपूर पाणी पिण्याची गरज असते. अशावेळी पालकांनी निर्जलीकरणाची लक्षणे जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. द इंडियन एक्स्प्रेसनी शालीमार बाग येथील मॅक्स सुपर स्पेशालिटीच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. परविंदर सिंह नारंग यांच्या हवाल्याने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लहान मुलांमध्ये निर्जलीकरणाची लक्षणे दिसणे खूप साधारण गोष्ट आहे. जेव्हा मुले त्यांच्या कामात व्यस्त असतात तेव्हा त्यांना पाणी पिण्याची आठवण येत नाही. जर त्यांच्या आजूबाजूला पाणी नसेल तर त्यांना अनेकदा तहान लागल्याचीसुद्धा जाणीव होत नाही आणि त्यांना अचानक निर्जलीकरण होते. जर तुम्ही मुलांबरोबर असाल तेव्हा नेहमी हातात पाण्याची बाटली ठेवा आणि त्यांना दर दोन तासांनी किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वारंवार पाणी देत राहा. हवा उन्हाळ्यात गरम असते, पण हिवाळ्यात कोरडी असते, त्यामुळे शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता भासते.”
निर्जलीकरणाची लक्षणे
१. डोळे खोल जाणे आणि डोळ्याचा खालचा भाग काळा दिसणे.
२. त्वचा कोरडी पडणे.
३. लघवी कमी होणे.
४. रक्त प्रवाह नीट न होणे.
५. लहान मुलांनी नेहमीपेक्षा कमी खेळणे आणि कोणत्याही गोष्टीत रस न दाखवणे.
६. बाळाच्या डोक्यावर काळपट डाग पडणे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि शरीरसुद्धा थंड असते, त्यामुळे निर्जलीकरणाची लक्षणे ओळखणे पालकांना कठीण जाते. निर्जलीकरणाचे मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यात पाणी पिण्याची मात्रा बदलणे होय. मुले हिवाळ्यात कमी पाणी पितात, पण त्यांच्या शरीराला पचनक्रियेसाठी, श्वास घेण्यासाठी आणि रक्ताभिसरणासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. पुरेसे पाणी पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
१ ते ३ वर्षांच्या बाळासाठी ४ कप पाणी आणि १.५ कप जेवण आवश्यक आहे.
९ ते १३ वर्षांच्या मुलांसाठी ५ कप पाणी आणि २ कप जेवण आवश्यक आहे.
१३ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी ८ कप पाणी आणि २.५ कप जेवण आवश्यक आहे.
हेही वाचा : तुमच्या मुलांना चारचौघात बोलताना, वावरताना बुजल्यासारखं वाटतं का? सोशल एन्ग्जायटी म्हणजे नेमकं काय?
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी मुले जाड कपडे घालतात, ज्यामुळे भरपूर घाम येतो. श्वास घेणे आणि पचनक्रियेमुळे चयापचय क्रियेवरही ताण पडतो, त्यामुळे खूप जास्त निर्जलीकरण होते. मुलांमध्ये निर्जलीकरण दिसण्याचा हा एक आणखी महत्त्वाचा घटक आहे. अशावेळी मुलांना जास्तीत जास्त पेय पदार्थ देणे आवश्यक आहे.
हिवाळ्यातील निर्जलीकरण आणि उन्हाळ्यातील निर्जलीकरणामध्ये खूप फरक आहे. उन्हाळ्यात तहान लागण्यापेक्षा डोकेदुखी, मळमळ आणि खूप जास्त चिडचिड जाणवते.
मळमळ वाटणे किंवा डोकेदुखी होत असेल तर मुले कमी पाणी पितात, ज्यामुळे निर्जलीकरण आणखी वाढते. निर्जलीकरणामुळे झोप, स्मरणशक्ती आणि शारीरिक प्रक्रियांवर परिणाम जाणवतो, ज्यामुळे मुलांच्या शैक्षणिक कामगिरीवरसुद्धा याचा खोलवर परिणाम होतो. अशावेळी आपण मुलांना हिवाळ्यातसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांना वारंवार लघवी येतेय का, याकडे लक्ष दिले पाहिजे. हिवाळ्यात निर्जलीकरण टाळण्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त पाणी पिणे आणि लघवीला जाणे आवश्यक आहे.
खरं तर हिवाळ्यात भरपूर पाणी प्यायला कुणालाही आवडत नाही, ज्यामुळे निर्जलीकरण होते. हे टाळण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता.
- मुलांना फळांचे ताजे रस, नारळाचे पाणी आणि भरपूर फळे देत राहा. यामुळे तुमच्या मुलांना फक्त भरपूर पाणी मिळत नाही, तर चांगला आहारसुद्धा मिळतो. सफरचंद, संत्री, अननस, गाजर, पपई असे अनेक फळे मुलांना द्या. यामुळे मुलांची रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा सुधारेल.
- हिवाळ्यात गरम सूप किंवा गरम दूध मुलांना द्यावे, यामुळेसुद्धा ते निर्जलीकरणापासून दूर राहतील. हिरवा भाजीपाला खा. दूध, संत्री, स्ट्रॉबेरी, ओट्स, दही अशा पाणीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय मुलांना केक, पास्ता, पेस्ट्री, ब्रेड, चिप्स असे पदार्थ देऊ नका. हे पदार्थ शरीरातील पाणी कमी करतात आणि मुलांना आणखी तहान लागते.
- हिवाळ्यात मुलांना घराबाहेर खेळू द्या. मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी घरात ठेवणे अधिक सुरक्षित वाटू शकते, पण दिवसभर घरात राहल्यामुळे त्यांना उष्णता जाणवू शकते. अशावेळी जर ते बाहेर पडले तर पुरेसा सूर्यप्रकाश आणि थंड वातावरणातील ओलावा नैसर्गिकरित्या त्यांच्या शरीरात येईल. जर त्यांनी उबदार कपडे घातले असतील तर हिवाळ्यातील थंड हवेमुळे त्यांना आणखी ताजेतवाने वाटेल.
- हिवाळा हा मुलांसाठी आनंददायी काळ असतो. ज्याप्रकारे वाहनाला चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे हिवाळ्यात मुलांना होणाऱ्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी त्यांना पोषक आहार आणि भरपूर पाणी पिण्याविषयी प्रोत्साहन देणे, ही आपली जबाबदारी आहे.