Egg Yellow Part: शरीराला प्रोटीन्सच्या पुरवठ्यासाठी अंड्याचं सेवन करणं हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. अनेकदा विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना त्यापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स अंड्याचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अंडे पौष्टिक आहे. पण यातील पिवळ्या भागात ‘कोलेस्ट्रोल’चं प्रमाण खूप जास्त असतं. शरीरातील वाढलेलं ‘कॉलेस्ट्रोल’ हृदयरोगासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे अंड्यातील पिवळा भाग खावा का नाही? बलक खाणं चांगलं का वाईट? का फक्त पांढरा भाग खावा? असे प्रश्न अनेकांना पडतात. याचं उत्तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?
‘हार्वर्ड हेल्थ’नुसार, अंड्याच्या पांढऱ्या भागासोबतच पिवळा भागही लोकांनी खाल्लाच पाहिजे. अंड्याच्या पिवळ्या भागात ‘कोलेस्ट्रोल’चं प्रमाण खूप जास्त आहे. शरीरात वाढणाऱ्या ‘कोलेस्ट्रोल’चा थेट संबंध हृदयविकाराशी आहे. त्यामुळे आवडीने अंड्यावर ताव मारणारे लोक, आरोग्यावर विपरीत परिणाम होईल या भीतीने अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळतात. पण “अंड्यातील पिवळ्या बलकाचं ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही.” अंड्यात चांगल्या ‘कोलेस्ट्रोल’चं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अंड्यातील पिवळा बलक पूर्णत: हानीकारक नाही..
अंड्यातील कॉलेस्ट्रोलमुळे हृदयविकाराचा धोका?
अंड्यातील कोलेस्ट्रोल आणि हृदयविकार यांचा काही संबंध आहे का? तर याचं उत्तर असं की, अंड्यातील पिवळा बलक अतिजास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो. पिवळ्या भागाचं ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही. त्यामुळे रोज एक अंडे खाण्यास हरकत नाही. रोज एक अंडे खाल्ल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते. अनेक संशोधनात हे स्पष्ट झालंय की रोजच्या आहारात अंड्याचा समावेश केल्यामुळे हृदय आणि पचनक्रियेला फायदा होतो.
हेही वाचा – हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? मग हे सोपे व्यायाम नियमित करा!
अंड्यात चांगल्या ‘कोलेस्ट्रोल’चं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अंड्यातील पिवळा बलक पूर्णत: हानीकारक नाही.