दात हा आपल्या मानवी शरीराचा अत्यावश्यक भाग आहे. ते आपल्याला अन्न चघळण्यास, चावण्यास, स्पष्टपणे बोलण्यास आणि आपल्या चेहऱ्याची ठेवण चांगली राखण्यास मदत करतात. दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास दातांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उदभवू शकतात. उदाहरणार्थ- दात किडणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होणे, दात दुखणे व तोंडाला दुर्गंधी येणे यांसारख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. अनेकांना दातांच्या समस्या असतात. दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. असं जर केलं, तर त्यामुळे अनेक आजार होतात, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रश करताना आपल्याकडून अनेक चुका होतात. अनेकांना काही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर दात घासण्याची सवय असते. काही जण कॉफी प्यायल्यानंतर दात घासतात; पण असं करणं योग्य आहे का, याच विषयावर द्वारका येथील वरिष्ठ सल्लागार ऑर्थोडॉन्टिस्ट व अलाइन डेंटल क्लिनिकच्या संस्थापक डॉ. प्रेरणा पाहुजा यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण ती सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉ. प्रेरणा पाहुजा म्हणतात, “कॉफी हे एक लोकप्रिय पेय आहे. या पेयाचा आपल्यापैकी बरेच जण दररोज आनंद घेतात; परंतु त्याचा आपल्या दातांवर काही आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो. बहुतेक जण कॉफी पितात, नाश्ता करतात आणि नंतर थेट जाऊन दात घासतात. ही सवय चुकीची आहे. कारण- तुम्ही जेवल्यानंतर तुमचे तोंड आम्लयुक्त अवस्थेत असते, जे ३० मिनिटे ते एक तास टिकते. त्या वेळेत तुम्ही दात घासल्यास, तोंडात तयार झालेले आम्ल नष्ट होते. दुसरीकडे सकाळी पहिल्यांदा ब्रश केल्याने कोणतेही वाईट जीवाणू नष्ट होतील. कारण- दिवसाच्या तुलनेत रात्री सर्वांत कमी लाळ उत्पादन होत असल्यामुळे रात्रभरात असे वाईट जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढतात.”

कॉफी अनेकांसाठी प्रिय आहे; परंतु दातांच्या आरोग्यासाठी त्याचे काही तोटे आहेत. कॉफीमुळे कायमस्वरूपी मुलामा चढवणे आणि दात किडणे या गोष्टींची शक्यता असते; विशेषतः जेव्हा साखरेचे सेवन केले जाते. कॉफीमधील आम्लता तात्पुरत्या दातांवर चढविलेला मुलामा कमकुवत करते आणि त्यामुळे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. कॉफी प्यायल्यानंतर लगेच ब्रश केल्याने हे नुकसान वाढू शकते.

कॉफी प्यायल्यानंतर दात घासायचे असल्यास किमान ३० मिनिटे थांबणे चांगले आहे. डॉ. पाहुजा म्हणतात, “या प्रतीक्षा कालावधीमुळे तुमच्या लाळेला आम्ल निष्प्रभ करू देण्यास पुरेसा वेळ मिळतो. या काळात आपले तोंड पाण्याने स्वच्छ धुतल्यास कॉफीचे अवशेष काढून टाकणे आणि आम्लता कमी करणे यांसाठी मदत मिळू शकते. दात घासण्याआधी प्रतीक्षा केल्याने तुमच्या दातांवर चढविलेला मुलामा मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते आणि दीर्घकालीन मौखिक आरोग्यास समर्थन मिळते.

(हे ही वाचा: रोजच्या आहारात कोथिंबीर वापरल्याने तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? जाणून घ्या डॉक्टरांकडून… )

मौखिक स्वच्छता राखण्यासाठी पुढील पद्धती वापरा

डॉ. पाहुजा यांच्या मते, कॉफी पिऊनही आपले दात मजबूत आणि निरोगी आहेत याची खात्री करण्यासाठी कोणीही या स्वच्छता पद्धतींचे पालन करू शकते.

  • पिण्याचे पाणी तुम्हाला हायड्रेट करण्यास मदत करते आणि कॉफीच्या सेवनानंतर जमा होणारे अन्नकण आणि अतिरिक्त जीवाणू काढून टाकते.
  • स्ट्रॉ वापरा. कारण- स्ट्रॉमधून कॉफी प्यायल्याने तुमच्या दातांशी होणारा संपर्क कमी होतो. त्यामुळे डाग पडणे आणि आम्लामुळे होणारे नुकसान यासंबंधीचा धोका कमी होतो.
  • कॉफी प्यायल्यानंतर तुमचे तोंड पाण्याने स्वच्छ धुवा.
  • सफरचंद, गाजर व सेलेरी यांसारखे उच्च फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने लाळेचा प्रवाह वाढतो आणि नैसर्गिकरीत्या दात स्वच्छ होतात.