Listening Music While Sleeping : अनेकांना काम करताना किंवा फावल्या वेळात इअरफोन लावून संगीत ऐकायला आवडतं. संगीत ही केवळ आवड असून ती एक थेरपी आहे. कारण अचानक आपला मूड बदलण्याची ताकद संगीतात आहे. आजकाल म्युझिक थेरपीच्या माध्यमातून रुग्णांना उपचार दिले जातात. काहीजण वेळ छान जावा यासाठी दिवसातून अनेकदा आवडती गाणी ऐकतात, काहीजणांना इअरफोनवर गाणी ऐकत झोपण्याची सवय असते. पण रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही देखील इअरफोन लावून गाणी ऐकत झोपत असाल तर ही सवय आजचं थांबवा. एका रिसर्चमधून इअरफोन लावून गाणी ऐकत झोपल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इअरफोन लावून झोपणं आरोग्यासाठी धोकादायक

एका रिसर्चनुसार, रात्री कानात इअरफोन लावून गाणी ऐकत झोपणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या रोजच्या सवयीमुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास अडचणी येऊ शकतात. संगीतामुळे शरीरास आरामदायी ऊर्जा मिळते ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत मिळते. परंतु रोजही ही सवयचं तुमची झोप हिरावून घेते. आपल्या शरीरात एक अंतर्गत घड्याळ असते ज्याला सरकॅडियन रिदम म्हणतात, त्याचे पालन करावे लागते. अशापरिस्थितीत रात्री गाणी ऐकत झोपण्याची सवय शरीरास हानिकारक आहे. या सवयीमुळे आपलं शरीर एका अर्टिफिशियल आवाजावर पूर्णपणे अवलंबून राहते ज्यामुळे चांगली झोप लागण्यास अडचणी येतात. यामुळे तुम्ही देखील रोज इअरफोनवर गाणी ऐकत झोपत असाल तर ही सवय आजचं सोडा.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे

लघवीद्वारे युरिक ऍसिड झपाट्याने काढू शकतो ‘हा’ मसाला; सेवन कसे आणि कधी करावे जाणून घ्या

मेंदूवर होतात विपरित परिणाम

गाणी ऐकणं छानं वाटतं. विशेषत: तरुणांना झोपताना नियमितपणे गाणी ऐकण्याची सवय असते. पण झोप लागल्यानंतरही संगीत आपल्या मेंदूत सुरु राहते. यामुळे झोपेवर विपरित परिणाम होतात. यात अनेक जण गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. अशा परिस्थितीत आराम करतानाही स्मार्टफोन दिवसभर आपल्यासोबत असतो. यामुळे विश्रांती घेतानाही मेंदू सक्रिय राहतो आणि पुरेशी विश्रांती मिळत नाही.

कानाला होऊ शकते गंभीर इजा

इअरफोन लावून झोपल्याने कानाला गंभीर इजा होण्याचा धोका असतो. कानाचे स्नायू हे खूप नाजूक असतात त्यामुळे मोठ्या आवाजात गाणी ऐकत झोपल्याने स्नायूंवर दबाव येतो. अशापरिस्थितीत जर तुम्ही झोपताना नेहमी मोठ्या आवाजात गाणी ऐकत असाल तर बहिरेपणा येऊ शकतो. याचे शरीरावरही गंभीर परिणाम होतात.

Story img Loader