Tips to avoid tooth decay : दात मजबूत आणि सुरक्षित राहण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेक लोक दातांना हानी पोहोचेल अशा पदार्थांचे सेवन करतात. अधिक प्रमाणात साखर असलेले पदार्थ, कृत्रिम गोड पदार्थ आणि जास्त अम्लयुक्त पदार्थ दातांचे इनॅमल खराब करू शकतात. इनॅमल दातांसाठी सुरक्षा कवचासारखे असते आणि ते दाताला किड लागण्यापासून बचावते. दात आणि हिरड्या मजबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काय कारावे? याबाबत आज आपण उपाय जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) दातांच्या सुरक्षेसाठी काही पथ्ये नियमित पाळा

दात आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. दात अन्नाचे तुकडे करते आणि आणि तुकडे केलेले पदार्थ पोटात गेल्यानंतर त्यांचे पचन सजह होते. तसेच, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायसाठी देखील दात मदत करतात. हसताना देखील दात दिसतात, त्यामुळे दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. दातांना किड लागू नये यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश आणि फ्लॉसिंग केले पाहिजे. ब्रश दातांमध्ये अडकलेले छोटे अन्न पदार्थ काढते. यामुळे किड लागणे किंवा इनॅमलला नुकसान होण्याचे टाळता येऊ शकते.

(कमी वयात दाढी पांढरी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या उपाय)

२) चांगला टुथब्रश वापरा

दात स्वच्छ करण्यासाठी चांगल्या टुथब्रशचा वापर केला पाहिजे. दर दोन किंवा तीन महिन्यांनी ब्रश बदलला पाहिजे, तसेच कोणत्याही विषाणूजन्य संसर्गातून बरे झाल्यानंतर आपला ब्रश बदलला पाहिजे.

३) हायड्रेटेड राहा

शरीरात आवश्यक प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे. त्यामुळे, खाण्यापूर्वी आणि नंतर आवश्यक तेवढे पाणी प्यावे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

(चहा प्यायल्यानंतर थंड पाणी पिता? होऊ शकतात ‘हे’ ४ नुकसान)

४) दातांचा वापर केवळ चर्वणासाठीच करा

दात हे अन्न पदार्थ चावून खाण्यासाठी असताता. मात्र, अनेक लोक त्याने बाटली उघडतात किंवा नुकसान होईल असे काम करतात. त्यामुळे, दातांचा वापर अन्न पदार्थ चावून खाण्यासाठीच करा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do proper brushing to avoid tooth pain and gum problems ssb