Coriander Juice for Weight Loss : भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने मसाले वापरले जातात. विशेषत: कोथिंबीर आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. आहारतज्ज्ञ डॉक्टर चारू अरोरा सांगतात की, कोथिंबीर हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ असून, त्यामुळे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते.

कोथिंबिरीच्या पानांपासून बनविलेला कोथिंबिरीचा रस अनेक आरोग्यदायी फायदे देतो; पण अरोरा सांगतात की, कोथिंबिरीच्या रसाला आपण संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग बनविले पाहिजे. त्याचे काही फायदे खालीलप्रमाणे :

Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
chillies for gut health
मिरची देठासह खावी की देठाशिवाय? तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी कोणती पद्धत आहे योग्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Loksatta viva safarnama health Tourism Sleep tourism trend
सफरनामा: झोपेसाठी पर्यटन!
Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Health Benefits of Daily Hugs
तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?
World Hand Wash Day, wash hands,
हात धुता धुता…

१. कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

२. या रसामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात.

३. कोथिंबिरीच्या रसामध्ये दाहकविरोधी(anti-inflammatory) आणि जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म (antibacterial properties) असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात आणि त्वचा चमकदार होते.

हेही वाचा : बाई… हा काय चकलीचा प्रकार! दचकलीपासून बिचकलीपर्यंत चकलीचे ८ प्रकार चर्चेत, मजेशीर VIDEO एकदा पाहाच

४. कोथिंबिरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे शरीराला आजाराचा सामना करण्यास बळ मिळते.

५. या रसाच्या सेवनाने प्री-डायबेटीज आणि इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

६. तसेच, कोथिंबिरीच्या रसाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करता येतो. हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहते.

७. हा रस प्यायल्याने चयापचय क्रिया व पचनक्रिया सुधारते. जर कोथिंबिरीचा रस संतुलित आहाराचा भाग बनविल्यास वजन कमी करण्यासाठीही मदत करतो.

८. ज्या लोकांना निद्रानाश किंवा झोपेशी संबंधित समस्या असेल, त्या रसाच्या सेवनाने त्या लोकांची झोपेची गुणवत्ता सुधारते.

९. तसेच ज्या लोकांना संधिवात, स्नायूंच्या दुखण्याचा त्रास असणाऱ्यांना या रसामुळे आराम मिळतो.

अरोरा पुढे सांगतात की, नियमित कोथिंबिरीचा रस पिणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. त्यानुसार नियमित कोथिंबिरीचा रस पिण्यामुळे होणारे त्रास खालीलप्रमाणे :

अॅलर्जीची लक्षणे – कोथिंबीर रसाच्या नियमित सेवनाने त्वचेवर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोट खराब होणे यांसारखी अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात.

कमी रक्तदाब – या रसाच्या नियमित सेवनाने रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन – या रसाच्या नियमित सेवनाने अतिप्रमाणात डिटॉक्सिफिकेशन होऊ शकते. त्यामुळे विषाक्त घटकांसह शरीरास उपयुक्त असलेली काही आवश्यक खनिजे किंवा इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा कमी होऊ शकतात.

किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम – कोथिंबीर हा लघवीचे प्रमाण वाढविणारा पदार्थ आहे. कोथिंबिरीचा रस किडनीला अधिक पाणी आणि मीठ उत्सर्जित करण्यास उत्तेजित करतो. त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होऊ शकतात.

हेही वाचा : आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटलं तर या अपंग चिमुकलीची इच्छाशक्ती पाहा; Video पाहून कळेल जगणं म्हणजे काय

कोथिंबिरीचा रस कसा बनवावा?

साहित्य

एक कप ताजी कोथिंबिरीची पाने
एक कप अननसाचे तुकडे
एक चमचा लिंबाचा रस
१ इंच आल्याचा तुकडा
१ कप नारळ पाणी किंवा साधे पाणी
बर्फाचे तुकडे

कृती

  • कोथिंबिरीची पाने, अननस, आले व नारळाचे पाणी एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
    -त्यानंतर हा रस गाळून घ्या (आवश्यकता असेल तर).
  • त्यात लिंबाचा रस टाका आणि वरून बर्फाचे तुकडे टाका.
  • अशा प्रकारे तुम्ही कोथिंबिरीचा रस तयार करू शकाल.