Sanitary Pads : मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अशात मासिक पाळीदरम्यान महिला सॅनिटरी पॅड आवर्जून वापरतात आणि एका विशिष्ट वेळेनंतर हे पॅड बदलतात; पण पॅड्स घालण्याबाबत आणि ते बदलण्यात थोडी जरी चूक झाली तरी सॅनिटरी पॅडमुळे योनीच्या आजूबाजूला पुरळ येणे, खाज सुटणे, सूज येणे लालसरपणा जाणवणे इत्यादी विपरी परिणाम दिसून येतात. अशा वेळी महिलांनी काय करावे आणि मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

त्वचातज्ज्ञ तिशा सिंग सांगतात, “सॅनिटरी पॅड घातल्यामुळे अनेकदा काही महिलांना पुरळ येणे, खाज सुटणे, लालसरपणा जाणवणे अशी इत्यादी संक्रमणे दिसून येतात. अशात महिलांच्या योनीच्या भागात पुरळमध्ये घर्षण झाल्यामुळे, ओलावा निर्माण होऊन जीवाणू तयार होतात.”

Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Shocking video Woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching
आवडीने चिकन खाताय? अर्ध चिकन खाऊन झाल्यावर महिलेला आतमध्ये काय दिसलं पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
How Much Water Should Pregnant Women Drink? Heres What Expert Says know more details
गर्भवती महिलांनी रोज किती पाणी प्यावे? वाचा एकदा, तज्ज्ञांनी सांगितलेली माहिती…
Why You Should Avoid Reheating Rice - Expert's Warning Reheating rice cause food poisoning
महिलांनो रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? ‘हे’ गंभीर परिणाम ऐकून धक्का बसेल
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?
Does Eating Ghee Really Make You Fat
Eating Ghee Increases Obesity : तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

सॅनिटरी पॅड हे अनेक पदार्थांपासून बनवले जातात; जे त्वचेला हानिकारक असू शकतात. त्यामुळे पुरळ येण्याची दाट शक्यता असते. जेल, वूड सेल्युलोज व कापूस या घटकांशिवाय पॉलिओलेफिन्स पॅडमध्ये असतात; ज्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
डॉ. सिंग पुढे सांगतात, “पॅड्सची रक्त शोषण्याची क्षमता वाढवण्यासाठी रसायनांचा वापर करून ब्लिच केले जाते आणि या ब्लिचमध्ये डाय-ऑक्सिन असते. जेव्हा पॅड रक्ताच्या संपर्कात येतात तेव्हा हे ब्लिच डाय-ऑक्सिन व मिथेन वायू सोडतात आणि त्यामुळे महिलांना पुरळ आणि संक्रमण होते.

हेही वाचा : मासिक पाळीदरम्यान खरंच महिलांना विश्रांतीची आवश्यकता आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

हैदराबाद येथील सिटीझन्स स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार त्वचातज्ज्ञ डॉ. शालिनी पटोडिया द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “ए आयसोमिथिल आयनोन (α-isomethyl ionone), बेन्झिल सॅलिसिलेट (benzyl salicylate), हेक्सिल सिनॅमलडेहाडइ (hexyl cinnamaldehyde) व हेलिओट्रोपिन (heliotropine) ही चार त्वचेशी संबंधित रसायने आहेत; जी सुगंध येण्यासाठी वापरली जातात. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्स, तसेच टॅम्पून्समध्ये असणाऱ्या रसायनांमुळे महिलांना नकळत अॅलर्जी होऊ शकते.”

डॉ. शालिनी पटोडिया पुढे सांगतात, “खरं तर मुळात पॅड पांढरा दिसण्यासाठी ब्लिचचा वापर
केला जातो. त्याशिवाय पॅडमध्ये रक्त शोषून घेण्यासाठी अ‍ॅक्रिलेटचा वापर केला जातो. जेव्हा अनेक रसायंनाबरोबर अ‍ॅक्रिलेटचा वापर होतो तेव्हा काहीही परिणाम होत नाही; पण जेव्हा काही ब्रॅण्डमध्ये अ‍ॅक्रिलेटचा वापर कमी रसायनांबरोबर केला जातो तेव्हा अ‍ॅलर्जी होऊ शकते.”

त्वचातज्ज्ञ सिंग यांनी मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर सांगितले आहे.
नियमितपणे कॉटनचे अंतर्वस्त्र घालावे. कॉटनचे कापड घाम शोषून घेते; ज्यामुळे पुरळ होत नाही आणि दुसरे म्हणजे सैल कपडे परिधान करा. कॉटनचे अंतर्वस्त्र घातल्यामुळे त्वचेला मोकळी हवा मिळते; ज्यामुळे घाम किंवा पुरळ येत नाही.

हेही वाचा : Winter Dehydration : हिवाळ्यात लहान मुलांनी भरपूर पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या, मुलांमधील निर्जलीकरणाची लक्षणे

हल्ली बाजारात सॅनिटरी पॅड्सचे नवनवीन ब्रॅण्ड आलेले आहेत. अशात जाहिरातीच्या आमिषाला बळी पडू नका आणि तुमच्या त्वचेसाठी योग्य पॅड निवडा. ज्यांना मासिक पाळीदरम्यान पुरळ येत असेल किंवा ज्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल, अशा लोकांनी कॉटन किंवा ऑरगॅनिक पॅडचा वापर करावा. कारण- त्यात हानिकारक रसायने किंवा रंग नसतात.

जर तुमची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल, तर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरा. कारण- मेन्स्ट्रुअल कपमुळे तुम्हाला पुरळ येणार नाही. त्याशिवाय सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पून्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कपमध्ये जास्त रक्त शोषून घेण्याची क्षमता असते. मेन्स्ट्रुअल कप विघटन आणि विल्हेवाट करण्यास सोपा आहे. हे स्वस्त आणि वापरण्याससुद्धा तितकेच सुरक्षित आहेत.

जर तुम्हाला अ‍ॅलर्जी किंवा पुरळ आले असेल, तर क्रिम्स वापरण्याचा सल्ला दिला जातो; ज्यामुळे पुरळ दूर होण्यास मदत होते. पुरळ घालवण्यासाठी कॅलामाइनसारखे लोशन तुम्ही वापरू शकता. पण जर सॅनिटरी नॅपकिन वापरणे बंद केल्यानंतरही पुरळ बरे होत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

योनीचा आजूबाजूचा भाग नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. योनीची योग्य पीएच पातळी साधारणपणे ३ ते ४.५ च्या दरम्यान असावी. ही पातळी कोणत्याही प्रकारच्या जीवाणूंची वाढ थांबवते.

Story img Loader