Slow Walking : चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे; पण तुम्ही हळू चालता की वेगाने चालता, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की, हळू चालण्याने वजन कमी होत नाही; पण ज्यांनी नुकताच व्यायाम सुरू केला आहे, त्यांच्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते.
‘होलिस्टिका वर्ल्ड’चे संस्थापक व संचालक डॉ. धर्मेश शाह सांगतात, “वेगाने चालणे किंवा धावणे यांसारख्या जलद गतीच्या व्यायामामुळे कमी होणाऱ्या कॅलरीज हळू चालण्यामुळे कमी होऊ शकत नाहीत; पण वजन नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे आरोग्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते.”
हळुवार चालण्याचे फायदे
हळू चालणे हा कमी प्रभावी व्यायाम आहे; जो वृद्ध, प्रौढ व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुदृढ राहते आणि आरोग्याचा धोका कमी होतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तणावसुद्धा कमी होते. डॉ शाह सांगतात की, ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा : हृदयविकाराचा झटका ओळखून स्मार्ट वॉच तुमचा जीव वाचवू शकतो का? वाचा संशोधनातून समोर आलेली माहिती…
“फक्त हळू चालण्याने वजन कमी होत नाही. तुमच्या फिटनेसचा तो एक महत्त्वाचा भाग असू शकतो. संतुलित आहार, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा तीव्र स्वरूपाचा व्यायाम, हळुवार चालणे यांमुळे शारीरिक हालचाली वाढतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते”, असे डॉ. शाह सांगतात.
हळू चालण्यामुळे फक्त शारीरिक फायदाच होत नाही, तर त्यामुळे तुम्ही तणावमुक्तही होऊ शकता. मानसिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम होऊ शकतो. हळू चालण्यामुळे मानसिक आरोग्याचे फायदे दिसून येतात. तसेच, दीर्घकाळ वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते. निरोगी जीवनशैली राखण्यामध्ये तणाव आणि भावनिक आरोग्य या बाबी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
डॉ. शाह सांगतात की, हळू चालणे हा एक दीर्घकाळ करता येणारा व्यायाम आहे; जो कोणीही करू शकतो. सातत्याने हळू चालण्याचा व्यायाम केला, तर तो निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो.
हेही वाचा : महिनाभर दात न घासल्यास शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितल्या आरोग्याच्या गंभीर समस्या
कॅलरीज कमी करण्यासाठी हळुवार चालणे हा व्यायाम फायद्याचा नाही; पण संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह हळुवार चालणे वजन नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरू शकते. मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी नियमितपणे हळुवार चालणे हा एक चांगला पर्याय आहे.