Viral Video of yoga at evening : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नीट पोषक आहाराच आणि व्यायामाच्या अभावामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशात दिवसभराच्या कामामुळे सुद्धा आपण थकतो. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपल्याला आरामाची आवश्यकता असत पण मोबाईलमुळे आपली झोप सुद्धा नीट होत नाही. तुम्हाला दिवसभराचा थकवा अगदी काही मिनिटांमध्ये घालवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सोशल मीडियावर योग अभ्यासक मृणालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी काही योगासने सांगितली आहेत. ही योगासने तुम्ही दररोज संध्याकाळी करू शकता. (do these yoga at evening for getting rid of the tiredness of the day)

या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

१. मार्जरीआसन

Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
do these Morning Yoga Stretches after get up early in the morning
VIDEO : सकाळी झोपेतून उठल्यानंतर करा हे पाच योगा स्ट्रेचेस, व्हिडीओ एकदा पाहाच
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
How To Clean Water Tanki Before Monsoon
१० रुपयांत टाकीतला गाळ करा गायब, पाणी नेहमी राहील स्वच्छ; टाकीत उतरण्याची पण गरज नाही, सहज जुगाडाचा Video पाहा

पाच ते सात वेळा करा

२.सेतुबंधासन

तीन ते पाच वेळा करा

३. गोमुखासन

दोन्ही बाजून १० ते ३० सेंकद होल्ड करा.

मृणालिनी यांनी हे तिन्ही योगासने व्यवस्थित करून दाखवली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की योगासने नेमकी कशी करायची. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा : गॅसवर चहाची गाळण न जाळता स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक, नव्यासारखी येईल चमक, पाहा Kitchen Jugaad Video

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून योग अभ्यासक मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिवसभराच्या कामाने आलेल्या थकव्याला घालवण्यासाठी आणि स्नायूना रिलॅक्स करण्यासाठी ही ३ योगासने नक्कीच फायदेशीर ठरतील, त्याचबरोबर तुमच्या शरीराचे पोश्चर सुद्धा सुधारण्यास मदत होईल.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून काही युजर्सनी प्रश्ने सुद्धा विचारली आहे.

हेही वाचा : झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात…

मृणालिनी या योग शिक्षिका असून प्रमाणित योग अभ्यासक आहेत. त्या सोशल मीडियावर वेगवेगळे योगासनांविषयी माहिती सांगतात आणि ते प्रत्यक्षात करून दाखवतात. सोशल मीडियावर हजारो लोक त्यांना फॉलो करतात. युजर्सना त्यांचे प्रत्येक व्हिडीओ खूप आवडतात. अनेक युजर्स त्यांना आरोग्याच्या समस्या सांगत कोणता योगा करावा, असा सल्ला सुद्धा विचारतात.