cardio exercises before or after weight training : सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मात्र, काही फिटनेसप्रेमी दररोज न चुकता जिमला जातात. खरं तर जिममध्ये दोन प्रकारचा व्यायाम केला जातो. एक म्हणजे कार्डिओ व्यायाम आणि दुसरा वेट ट्रेनिंग. पण, कार्डिओ व्यायाम वेट ट्रेनिंगपूर्वी करावा की नंतर हा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हालाही हा प्रश्न पडतो का? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
खरं तर कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग हे फिटनेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्हींचे महत्त्व समजून घेतले तर त्याचा योग्य फायदा तुम्ही घेऊ शकता.

कार्डिओ व्यायाम वेट ट्रेनिंगपूर्वी करावा की नंतर?

कार्डिओ व्यायाम वेट ट्रेनिंगपूर्वी करावा की नंतर, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Rohit sharma starts training ahead of england and Champions Trophy running at the BKC in Mumbai video goes viral
Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरु केला सराव, मुंबईतील बीकेसीत धावतानाचा VIDEO व्हायरल
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा? (फोटो सौजन्य @Freepik)
Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…

पॉवरमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय गोयल म्हणतात, “वेट ट्रेनिंगपूर्वी किंवा नंतर कार्डिओ व्यायाम करणे हे त्या व्यक्तीचं ध्येय आणि ती व्यक्ती कोणत्या गोष्टीला प्राधान्य देते, यावर अवलंबून आहे.”

ते पुढे सांगतात, “कार्डिओ व्यायाम हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि कॅलरीज कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठीसुद्धा हा व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे.”

हेही वाचा : …म्हणून धोनी महिनाभर शाकाहारी झाला; मांसाहारी व्यक्तीने आहारात बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो

वेट ट्रेनिंगसाठी अति ऊर्जेचा वापर केला जातो, पण त्यामुळे स्नायू अधिक मजबूत होतात. वेट ट्रेनिंगनंतर कार्डिओ केल्याने आपली कार्यक्षमता वाढते. गोयल सांगतात, “वेट ट्रेनिंग केल्यानंतर कार्डिओ केल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होऊ शकते, पण वेट ट्रेनिंगमुळे थकवा येऊ शकतो ज्याचा थेट परिणाम कार्डिओ व्यायामावर होऊ शकतो. थकव्यामुळे तुमचा कार्डिओ व्यायाम काही वेळा अपूर्णसुद्धा राहू शकतो.”

आरोग्यतज्ञ डॉ. मिकी मेहता सांगतात, “मी गोयल यांच्याशी सहमत आहेत. थोडा वॉर्मअप केल्यानंतर कार्डिओ करा, ज्यामुळे तुम्ही चांगले वेट ट्रेनिंग करू शकता.”

कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचा क्रम का महत्त्वाचा?

गोयल यांच्या मते, तुम्ही ज्या क्रमाने कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करता, त्याचा तुमच्या एकूण फिटनेस आणि स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो.

ते पुढे सांगतात, “वेट ट्रेनिंगपूर्वी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित व्यायाम (कार्डिओ) केल्याने स्नायूंना थकवा येऊ शकतो, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होऊ शकते; याशिवाय खूप वजनी वस्तू उचलण्यासाठी आवश्यक असलेला ग्लायकोजेनचा साठासुद्धा कमी होऊ शकतो.

याउलट, कार्डिओपूर्वी वेट ट्रेनिंग केल्याने लोकांची स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी जास्तीत जास्त ऊर्जा खर्च होते. यामुळे वेट ट्रेनिंग कठीण जाते. स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायू तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.”

वेट ट्रेनिंगनंतर कार्डिओ केल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि चरबी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे स्नायूंचे आरोग्य सुधारू शकतात. ज्यांना स्नायू मजबूत करायचे आहे त्यांनी कार्डिओपेक्षा वेट ट्रेनिंग किंवा वेट लिफ्टिंगला अधिक प्राधान्य द्यावे.

हेही वाचा : इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

विशिष्ट प्रकारचे कार्डिओ व्यायाम वेट लिफ्टिंगसह करू शकता. गोयल सांगतात, ” वेटलिफ्टिंग हे कमी ते मध्यम प्रकारच्या कार्डिओ व्यायामासह केले जाऊ शकते. उदा. “सायकलिंग किंवा चालणे हे व्यायाम वार्मअप करण्यास मदत करतात, कारण ते भरपूर ऊर्जा न वापरता रक्त प्रवाह सुधारण्यास आणि दुखापतीचा धोका कमी करण्यास मदत करतात.”

ते पुढे सांगतात, “वेट लिफ्टिंगनंतर धावणे किंवा High-Intensity Interval Training (HIIT)सारखे उच्च-तीव्रतेचे कार्डिओ व्यायाम करणे उत्तम आहे. या व्यायामासह स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने फॅट कमी करण्यास आणि स्नायू बळकट करण्यास मदत होते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते.”

वेळ खूप महत्त्वाची आहे हे सांगताना गोयल म्हणतात, “कमी तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामामुळे थकवा येत नाही आणि शरीर वेट लिफ्टिंगसाठी तयार असते. जेव्हा उच्च तीव्रतेचे कार्डिओ केले जाते, तेव्हा शरीरातील ऊर्जा स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी वापरली जाते, ज्यामुळे स्नायूंची वाढ होते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते.

Story img Loader