बदललेली जीवनशैली, तणाव यांमुळे आजकाल अनेकांना मायग्रेन, डोकेदुखी याचा त्रास होतो. तणाव आणि काही आजारांमधील लक्षणांच्या स्वरूपात होणारी डोकेदुखी वगळता याची आणखीही काही कारणं असू शकतात. कोणत्या कारणांमुळे डोकेदुखी होते जाणून घ्या.
सतत डोकेदुखी होण्याची कारणं
आणखी वाचा : अति दूध प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या याचे योग्य प्रमाण
डिहायड्रेशन
डिहायड्रेशन झाल्याने म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे नियमित शरीराला आवश्यक तितके पाणी पिणे आवश्यक असते.
मद्यपान, धूम्रपान
मद्यपान किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे मद्यपान, धुम्रपान टाळण्याचा सल्ला दिला जातो.
डोळ्यांशी निगडित समस्या
डोळ्यांशी निगडित समस्या असल्यासही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यावर त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा : तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे का? याचा शरीरावर काय परिणाम होतो लगेच जाणून घ्या
तणाव
तणाव असणाऱ्या व्यक्तींना सतत डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यासाठी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)