आपल्यापैकी अनेकजण कामाच्या ठिकाणी किंवा घरातही सतत बिस्किटं, केक, बर्गर यासारखे जंक फूड खात असतात. शिवाय अलिकडे तर बर्गर खाण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतू अधिक प्रमाणात किंवा सतत हे पदार्थ खाणं पचनक्रियेसाठी घातक असल्याचं नुकत्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे असे पदार्थ खाताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की जंक फूड खाल्ल्याने आपली पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जंक फूड भूक नियंत्रित करण्याची क्षमता कमी करतात आणि मेंदूच्या कार्यातही अडथळा निर्माण करतात. उंदरांवर केलेल्या एका अभ्यासातून असे आढळून आले की, अॅस्ट्रोसाइट्स नावाच्या पेशी आतड्यातील रासायनिक मार्ग नियंत्रित करतात.
हेही वाचा- मुलांच्या वयानुसार उंची वाढत नाहीये? तर आजच आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा
इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक डॉ. कर्स्टन ब्राउनिंग यांनी सांगितले की, आम्हाला आढळले की जास्त फॅट आणि कॅलरीयुक्त अन्नाचा अॅस्ट्रोसाइट्सवर सर्वाधिक परिणाम होतो. जास्त फॅटआणि कॅलरीयुक्त आहार खाल्ल्यानंतर सुमारे १०-१४ दिवसांनी अॅस्ट्रोसाइट्स प्रतिसाद देऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर मेंदूच्या कॅलरीज नियंत्रित करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
लठ्ठपणाची समस्या –
हेही वाचा- अपेंडिसाइटिस दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं; वेळीच जाणून घ्या याची लक्षणं आणि घरगुती उपचार
ब्रिटनमध्ये ३ पैकी २ वयस्कर आणि एक तृतीयांश मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या आहे. या समस्येमुळे हृदयविकार आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. जेव्हा जंक फूड खाल्ले जाते, तेव्हा अॅस्ट्रोसाइट्स सुरुवातीला प्रतिसाद देतात जे ग्लिओट्रांसमीटर नावाचे रसायन सोडतात. जेव्हा अॅस्ट्रोसाइट्स प्रतिबंधित केले जातात तेव्हा कॅस्केड देखील प्रतिबंधित होते. सिग्नलिंग केमिकल्सच्या कमतरतेमुळे पचनास उशीर होतो, कारण पोट व्यवस्थित भरत नाही आणि रिकामे राहते.
द जर्नल ऑफ फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डॉ. ब्राउनिंग यांनी सांगितलं की, आम्हाला अजूनही हे माहिती करुन घ्यायचे आहे की, अॅस्ट्रोसाइट अॅक्टीव्हीटी आणि सिग्नलिंग मैकेनिज्मचे नुकसान हे अति खाण्यामुळे होते का ? तसंच अधिक कॅलरीज नियंत्रित करण्यासाठी मेंदूची गमावलेली क्षमता पुन्हा सक्रिय करणे शक्य आहे का हे देखील आम्हाला जाणून घ्यायचं असल्याचं डॉ. ब्राउनिंग म्हणाले.