Consumption of Sugar : अनेक लोकांना खूप गोड खायची सवय असते आणि अतिगोड पदार्थांच्या सेवनामुळे त्यांना वजनवाढ आणि मधुमेह यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, काही लक्षणांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्ही खूप गोड खात आहात की नाही?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. रूपी औजला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी वजनवाढ आणि सतत ऊर्जा कमी होणे या कारणांशिवाय गोड खाण्यामागची आणखी काही कारणे सांगितली आहेत. पण, ही कारणे जाणून घेण्यापूर्वी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की, काही पौष्टिक अन्नपदार्थ असे आहेत; ज्यामध्ये साखर भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे दीर्घकाळ आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

लोक काही पदार्थ पौष्टिक म्हणून खातात; पण त्यात भरपूर प्रमाणात साखर असते. आहारतज्ज्ञ व सल्लागार कनिका मल्होत्रा सांगतात, “जे अन्नपदार्थ पौष्टिक म्हणून खपवले जातात, त्यात साखरेची मात्रा अधिक असते आणि याची आपल्याला कल्पनाही नसते.”

कोणत्या पौष्टिक पदार्थांमध्ये किती साखर असते, ते जाणून घ्या

  • फॅट्सयुक्त दह्याला मलईदार होण्यासह गोड चव येण्यासाठी त्यात भरपूर साखर वापरली जाऊ शकते.
  • सॅलड तयार करताना मलई किंवा साखरयुक्त व्हिनायग्रेट्स (vinaigrettes) टाकतात. त्यात साखर असते. त्यामुळे तुम्ही फक्त पौष्टिक सॅलड खाताय का, याची खात्री करा.
  • अनेक चवदार सॉसमध्ये साखरेची मात्रा असते. अर्धा कप सॉसमध्ये अनेकदा सहा ते १२ ग्रॅम साखर असते. त्यामुळे कमी साखर असलेले पर्याय निवडा.
  • चिक्की ही अनेकदा पौष्टिक पदार्थ म्हणून खाल्ली जाते; पण त्यात ब्राउन शुगर, कॉर्न सिरप व एगेव नेक्टर यांसारख्या साखरेचे प्रमाण अधिक असते. अशा चिक्की खा; ज्यामध्ये पाच ग्रॅमपेक्षा कमी साखर असेल.
  • ओट्स हा अत्यंत पौष्टिक पदार्थ म्हणून ओळखला जातो; पण वेगवेगळ्या चवीच्या ओट्समध्ये साखर असते. त्यामुळे साधे ओट्स खाण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? मधुमेही रुग्णांसाठी ठरेल का धोक्याची घंटा? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

या माहितीच्या आधारे तुम्ही लक्षात घेऊ शकता तुम्ही खूप जास्त साखर खात आहात की नाही ते?

मल्होत्रा यांनी डॉ. औजला यांनी सांगितलेल्या लक्षणांविषयी सांगितले आहे. त्या सांगतात की, ही गृहीत धरलेली लक्षणे आहेत; पण त्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात.

सतत भूक लागणे आणि काहीतरी खावेसे वाटणे

साखर ही आपल्या मेंदूला आणखी गोड खाण्यास उत्तेजित करते आणि यादरम्यान तुम्ही जर साखर खाल्ली, तर तुमची ऊर्जा अचानक वाढते आणि अचानक कमी होते; ज्यामुळे तुम्हाला आणखी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते

कमी ऊर्जा आणि कमी झोप

रक्तातील साखर वाढल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि आळस येऊ शकतो. एवढेच काय, तर साखर तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते; ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळू शकणार नाही.

मूड बदलणे आणि चिडचिड होणे

रक्तातील साखरेचे चढ-उतार तुमच्या मूडवर परिणाम करतात आणि त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. यातून तणाव आणि नैराश्याची लक्षणेसुद्धा दिसू शकतात.

आतड्याशी संबंधित समस्या

खूप जास्त साखर खाल्ल्यामुळे आतड्यांतील चांगल्या-वाईट जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते मग या असंतुलनामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटणे आणि पचनाशी संबंधित त्रास आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

साखरेमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते; ज्यामुळे कोणत्याही संक्रमणास तुम्ही लवकर बळी पडू शकता.

साखर कमी खाण्यासाठी या गोष्टी करा

मल्होत्रा यांनी साखरेचे सेवन कमी करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे :

फूड लेबल वाचा

अन्नपदार्थावर असलेले फूड लेबल नीट वाचा. त्यात किती साखर वापरली आहे, हे लक्षात घ्या. अमेरिकन हॉर्ट असोसिएशनने सुचविल्याप्रमाणे दररोज पुरुषांनी ३७.५ ग्रॅम आणि स्त्रियांनी २५ ग्रॅम यापेक्षा अधिक साखर खाऊ नये.

गोड पदार्थ खाणे टाळावे

ब्राउन शुगर, कॉर्न सिरप, मध इत्यादी प्रकारचे गोड पदार्थ खाणे टाळावे.

सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांना महत्त्व द्यावे

फळे, भाजीपाला, कडधान्ये, असे सर्व प्रकारचे अन्नपदार्थ खावेत. प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत. हे पदार्थ पौष्टिक असतात आणि त्याचबरोबर तुमची भूकही भागवतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you eat excessive amounts of sugar you are inviting diabetes know some surprising signs told by expert ndj
Show comments