Stress, Emotional Binge Eating Habits Cure: अन्न हे पूर्णब्रम्ह असं म्हटलं जातं पण जर तुम्ही योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने व योग्य भावनेने अन्नाचे सेवन केले नसेल तर याच अन्नाची बाधा सुद्धा होऊ शकते. अनेकदा आपल्याला एखाद्याचा राग आला, ऑफिस, घर, शाळा- कॉलेजमध्ये कामाचा दबाव वाढला, प्रिय व्यक्तीशी वाद झाले, कशाचं तरी वाईट वाटू लागलं की प्रमाणाच्या पेक्षा जास्त खाण्याची अनेकांना सवय असते. जर तुम्हीही असं करत असाल किंवा तुमच्या ओळखीत एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची वाईट सवय असेल तर आधी त्याचे कारण आणि त्यावर उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.

पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती (जास्त खाणे) हे पाचक समस्या आणि वजन वाढण्याचे कारण ठरू शकते असे सांगत त्यावर उपाय सुचवले आहेत. दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर साखर आणि कार्ब्सचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांची निवड करण्याऐवजी, तणावात आपण कोणत्या तीन पदार्थांचे सेवन करू शकता हे सुचवले आहे.

tharala tar mag audience upset about new track of the serial
खूप बोअर करताय, ठरवून ताणलेली मालिका अन्…; ‘ठरलं तर मग’चा नवीन ट्रॅक पाहून प्रेक्षक नाराज! पुढे काय घडणार?
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा

शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियम असते. दुपारच्या व रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान लागणाऱ्या भूकेवर उपाय म्हणून तुम्ही काही प्रमाणात भाजून थोडे शेंगदाणे खाऊ शकता. अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी सुचवले आहेत की, शेंगदाणे व गूळ हा कॉम्बो सुद्धा विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये विशेष मदतीचा ठरू शकतो.

काजू

लोह आणि मॅग्नेशियम समृद्ध काजू हे जेव्हाही तुम्हाला निस्तेज वाटत असेल तेव्हा मूड चांगला करण्यास मदत करू शकतात. झोपेच्या आधी दुधासह काजूचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

सुके खोबरे

सुके खोबरे तृप्ति वाढवते, जे तुम्हाला ताणतणाव चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यात मदत करते. यामध्ये लॉरिक अॅसिड असते, जे तुमचे केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारू शकते. हे गुळ किंवा दुपारच्या जेवणात चटणीच्या स्वरूपातही खाता येऊ शकते

आता आपण तणावात असताना किंवा मूड चांगला नसताना काय खावे हे पाहिले पण मुळात वारंवार तणाव जाणवू नये, दुःख होऊ नये यासाठी सुद्धा काही सवयी व आहारातील बदल आवश्यक आहेत. ते सुद्धा आपण जाणून घेऊया..

तणावमुक्त राहण्यासाठी कसा असावा आहार?

तणावात असताना काय खावे याविषयी इंडियन एक्सस्प्रेसने मुंबईच्या पवई येथे असणाऱ्या डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ ऋचा आनंद यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. ऋचा आनंद सांगतात की ओमेगा ३ फॅटी ऍसिड असणारे पदार्थ हे तणावमुक्त राहण्यास मदत करू शकतात. अक्रोड व काही माशांमध्ये ओमेगा ३ मुबलक प्रमाणात असते. याशिवाय पालेभाजी, बेरी, धान्य यांचा समावेश असलेला आहार तुम्हला व्हिटॅमिन्स व अँटी ऑक्सिडंट्सचा पुरवठा करू शकतो. मॅग्नेशियम युक्त पदार्थ जसे की बिया (भोपळ्याच्या बिया, फ्लॅक्ससीड, इत्यादी), डार्क चॉकलेट हे आपल्याला ताण- तणावापासून दूर राहण्यास मदत करू शकते.

जेवताना लक्ष विचलित होऊ नये यासाठी प्रयत्न का करावा?

जान्वी चितलिया, इंटिग्रेटिव्ह मायक्रोबायोम हेल्थ कोच आणि फंक्शनल मेडिसिन न्यूट्रिशनिस्ट यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की “लक्ष विचलित न होऊ देता, मानसिकरित्या उपस्थित राहून तुमचे अन्न ग्रहण करणे महत्वाचे आहे. शांतपणे बसून किंवा तुमच्या प्रियजनांसह बसून किमान एकदा जेवण करा. मानसिक व शारीरिक समन्वय साधल्यामुळे, तुमच्या जेवणाचे पचन व्यवस्थित होते. परिणामी अपचनाने होणारी चिडचिड कमी होते.”

मन न मोडता आरोग्य कसं जपायचं?

तुम्ही कोणत्या गोष्टी खाता यापेक्षा त्या किती प्रमाणात खाता हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच तुम्ही आता गोड खाणं बंद केलं एकही घास खायचा नाही असं करायची गरज नाही. तुम्हाला अगदीच गोड खावंसं वाटलं तर मोठं चॉकलेट खाण्यापेक्षा लहान आकाराचं चॉकलेट खा. कुरकुरीत खायची इच्छा असेल तर पॅकेटभर चिप्स खाण्यापेक्षा मूठभर चिप्स खा. तुमची गरज ही संतुलनाची आहे, टाळण्याची नाही. त्यामुळे प्रमाणात एखाद्या गोष्टीचे सेवन करणे नुकसानदायक ठरत नाही. उलट तुम्ही ते टाळल्यास तुमची चिडचिड होऊ शकते.

हे ही वाचा<< Benefits of 100 Gram Ajwain: डायबिटीस असल्यास ओवा खाणे योग्य आहे का? वजन कमी करण्यासाठी ओवा ठरतो जादुई?

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काही वेळा आपण ठरवलेली गोष्ट पूर्ण होत नाही त्यावेळेस आपण स्वतःला दोष देतो, ज्यातून आणखी राग येऊ लागतो, स्वतःशी संघर्ष होतो, याने तुम्ही दुःखी होऊन पुन्हा खाण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे स्वतःला माफ करून पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता.