Protein Powder Side Effects: आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की फक्त सप्लिमेंट्स वापरून आपण आवश्यक प्रोटीन मिळवू शकतो, पण तसे काहीही नाही. तुम्ही नियमित आहारातून चांगले प्रोटीन मिळवू शकता.
जे लोक तीव्र प्रकारचा व्यायाम करत नाही, खेळ खेळत नाही किंवा खूप जास्त शारीरिक हालचाल करत नाही, त्यांनी दररोज त्यांच्या शरीराच्या प्रत्येक दिवशीच्या वजनानुसार ०.८-०.९ ग्रॅम प्रोटीन घ्यावे. या प्रोटीनमध्ये चांगले जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि चांगले फॅट्स असते, जे तुम्ही संतुलित आहाराद्वारे सहज मिळवू शकता. पण, हे पोषक घटक तुम्हाला तुमच्या प्रोटीन पावडरमध्ये मिळू शकत नाही.

प्रोटीन पावडरमध्ये असतो आवश्यक पोषक घटकांचा अभाव

मोहाली येथील मॅक्स हॉस्पिटलच्या न्यूट्रिशन आणि आहारतज्ज्ञप्रमुख डॉ. आस्था खुंगर सांगतात, ” मासे, टोफू, चिकन अंडी, दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे, नट्स, बिया आणि धान्ये यांचे सेवन संतुलित आहारासाठी पुरेसे आहे. यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक घटक असतात, जे प्रोटिन पावडरमध्ये नसतात. जसे की जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि चांगले फॅट्स.”

Protein Digestion
तुमचे शरीर प्रथिने पचवू शकत नाही? तज्ज्ञांनी सांगितली पाच लक्षणे…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
Should you eat Bottle guard with peel or without the peel health benefits helps for weight management
वजन नियंत्रणात ठेवेल दुधीची साल! पण ती कशाप्रकारे खावी? तज्ज्ञांनी सांगितले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

प्रोटीन पावडरचे दुष्परिणाम जाणून घेऊ या

पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने मूत्रपिंडावर ताण येतो, ज्यामुळे युरियातून जास्तीचे नायट्रोजन उत्सर्जित करणे कठीण जाते. “किडनी स्टोन, अॅलर्जी, पुरळ येणे इत्यादी गोष्टींचा त्रास उद्भवतो. याशिवाय आतड्यांमधील बॅक्टेरियासुद्धा बदलतात, ज्यामुळे आतड्यांशीसंबंधित आजार किंवा कोलन कर्करोग होण्याचा धोका वाढतो.” मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमित शर्मा सांगतात,

डॉ. खुंगर काही प्रोटीन पावडरविषयी सांगतात, ज्यामध्ये साखर, आर्टिफिशिअल गोडपणा, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा कमी-गुणवत्तेचे प्रोटीन टाकले जाते. “हे प्रोटीन दीर्घकालीन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. काही प्रोटीन पावडरमध्ये विशेषत: आर्टिफिशियल साखरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने अल्सरचा त्रास, अतिसार, इत्यादी समस्या जाणवू शकतात.”

चंदीगड येथील पीजीआय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे माजी प्रमुख डॉ. राकेश कोचर सांगतात, “दररोज ४५-५५ ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात, जे आहारातून मिळवू शकतात. “सोय-प्रोटीन प्रोडक्ट हार्मोनल पातळी बदलू शकतात. मागील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की काही पदार्थांमध्ये शिसे, आर्सेनिक, कॅडमियम, मर्क्युरी आणि बिस्फेनॉल-ए (बीपीए) हे कार्सिनोजेनसारखे जड धातू असतात. भारतात औषध निर्मितीच्या नियमांनुसार संतुलित आहार नियंत्रित नसल्यामुळे या समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.”

गुणवत्ता, पचनक्षमता आणि अॅलर्जीकडे लक्ष द्या

मोहाली येथील लिवासा हॉस्पिटलच्या बेरिअॅट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमित गर्ग सांगतात, “प्रोटीन पावडर निवडताना त्याची गुणवत्ता, पचनक्षमता आणि त्यापासून होणाऱ्या अॅलर्जीचा विचार करावा, त्यामध्ये असलेल्या पदार्थांची सूची, प्रमाण आणि प्रमाणपत्रसुद्धा वाचावी.”

Story img Loader