Do you feel so lazy : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार व नियमित व्यायाम आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पण, तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही लोकांना व्यायाम करण्याचा आळस येतो. व्यायामाऐवजी त्यांना अंथरुण अधिक प्रिय वाटते. तुमच्याबरोबरही असं होतं का? तुम्हालाही सतत अंथरुणावर पडून राहावंसं वाटतं? आज आपण यामागील कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊ.

फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या अंगात आळशीपणा निर्माण होण्यात दिसून येतो. शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर नीट झोप न झाल्यामुळे थकवा जाणवतो. बैठी जीवनशैली आणि पौष्टिक आहाराची कमतरता यामुळे आपली ऊर्जा कमी होऊ शकते. जर तुमच्या आहारात लोह आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, तर तुम्हाला सतत थकवा व शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला आळस येतो.”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती

डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन पुढे सांगतात, “मानसिकदृष्ट्या विचार केला, तर तणाव, काळजी व नैराश्य या महत्त्वाच्या भूमिका बजावतात. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते तेव्हा तुम्हाला हालचाल करावीशी वाटत नाही आणि अंथरुणात पडून राहावेसे वाटते. जरी तुम्ही व्यायामाकडे कंटाळवाणी किंवा वेळ घेणारी कृती म्हणून पाहत असाल तरीही हा मानसिक अवरोध तुम्हाला व्यायामाला सुरुवात करण्यापासून रोखू शकतो. जरी व्यायाम करण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल तरी नियमित व्यायाम हा मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो.”

जीवनशैलीचा प्रभाव

आपल्या जीवनशैलीतून आपण किती उत्साही किंवा आळशी आहोत, हे दिसून येते. डॉ. श्रीनिवासन यांनी खालील गोष्टींवरून हे स्पष्ट केले आहेत.

आहार : खूप जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त स्नॅक्स खाल्ल्याने आपल्याला लगेच ऊर्जा मिळते; पण ही ऊर्जा फार काळ टिकत नाही. ऊर्जा खूप लवकर कमी होते. ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फळे, भाज्या, प्रोटीन्स आणि धान्ये इत्यादी प्रकारचा संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

झोप : जर नीट झोप झाली नसेल, तर आपले शरीर ऊर्जा निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते आणि आळशीपणा येतो. शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी नियमित ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे.

तणाव : खूप जास्त तणावामुळे आपल्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे ऊर्जा कमी होऊ शकते आणि आपल्याला थकवा जाणवू शकतो. अशा वेळी योग, ध्यान किंवा दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे ताण-तणाव कमी होऊ शकतो आणि ऊर्जा पातळी सुधारू शकते.

हेही वाचा : सकाळी उठताच अर्धा- एक लिटर पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? तज्ज्ञ सांगतायत, सोनाक्षी सिन्हाचं रुटीन तुम्ही फॉलो करावं का?

“अनेकदा आहारात पौष्टिक घटकांची कमतरता हे ऊर्जा पातळी कमी असण्याचे महत्त्वाचे कारण असू असते. हायपोथायरॉडिझम, शरीरात रक्ताची कमतरता, मधुमेह इत्यादी कारणांमुळेसुद्धा थकवा जाणवू शकतो. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा”, डॉ. श्रीनिवासन सांगतात.

लोह, व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन बी यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक शरीराला मिळत नसतील, तर थकवा वा अशक्तपणा जाणवणे साहजिक आहे. त्यासाठी एकदा रक्त तपासणी करा आणि तुमच्या शरीरात कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे ओळखा. आहारात केलेले बदल किंवा पोषक आहार तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

आळस दूर करण्यासाठी डॉ. श्रीनिवासन यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.

स्मार्ट उद्दिष्टे जपा

विशिष्ट अशी मापक आणि पूर्ण करता येणारी उद्दिष्टे जपा. “मला खूप जास्त व्यायाम करायचा आहे”, असे म्हणण्याऐवजी “मी सोमवार, बुधवार व शुक्रवारी २० मिनिटे चालणार”, असे म्हणता. तुमच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता असेल, तर तुम्हाला प्रेरणा मिळू शकते.

तुम्ही जे काही करता, त्याचा आनंद घ्या

तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. मग ते नाचणे असू शकते किंवा ट्रेकिंगला जाणे असू शकते किंवा एखादा खेळ खेळणे असू शकते. तुम्ही जेव्हा शारीरिक हालचाल करता तेव्हा आनंद मिळणे खूप महत्त्वाचे आहे.

दिनचर्या तयार करा

वर्कआऊटला महत्त्वाच्या कामाप्रमाणे प्राधान्य द्या. वर्कआऊटचा वेळ तुमच्या कॅलेंडरमध्ये शेड्युल करा आणि त्यात सातत्य राखा. कालांतराने वर्कआऊट तुमच्या सवयीचा भाग होईल.

लहान गोष्टींपासून सुरुवात करा

खूप जास्त व कठोर वर्कआऊट करू नका. लहान गोष्टींपासून सुरुवात करा. हळूहळू वर्कआऊटचा वेळ वाढवा. त्यामुळे तुम्हाला आळस येणार नाही.

सोशल व्हा

मित्रांबरोबर जर तुम्ही व्यायाम करीत असाल किंवा जिमला जात असाल, तर तुम्हाला आळस येणार नाही. उलट वर्कआऊट करताना मजा येईल. कदाचित तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून प्रेरणा मिळू शकते.

Story img Loader