Sunset Anxiety: निसर्गाच्या सौंदर्याची किमया अगाध आहे. सकाळचा सुंदर सूर्योदय ते संध्याकाळचा शांत सूर्यास्त आणि रात्रीच्या अंधारातील चंद्र, चांदण्या न्याहाळण्याचा आनंद अनेकांसाठी लाखमोलाचा असतो. त्यातच संध्याकाळ म्हटलं की, अनेक निसर्गप्रेमी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहण्याचा सुंदर क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? हीच संध्याकाळ अनेकांना अस्वस्थ करते. याला ‘सूर्यास्ताची चिंता’, असेही म्हणतात. त्यांना सूर्य क्षितिजाच्या खाली मावळताना अस्वस्थता, दुःख किंवा भीतीची भावना जाणवू लागते.
ही गोष्ट ऐकायला आणि वाचायला सामान्य वाटत असली तरी ती पूर्णपणे सामान्य बाब सूर्यास्ताच्या वेळी अनेक व्यक्तींना अचानक अस्वस्थ का वाटते?
सूर्यास्ताची चिंता का असते आणि ती हंगामी भावनिक विकार (एसएडी)पेक्षा वेगळी आहे?
परवानाधारक पुनर्वसन सल्लागार व मानसोपचार तज्ज्ञ सोनल खंगरोत स्पष्ट करतात की, ‘सूर्यास्ताची चिंता’ ही एक गैर-क्लिनिकल संज्ञा आहे, जी सूर्यास्त होताना येणाऱ्या चिंतेला सूचित करते. त्यामुळे पश्चात्ताप, अस्वस्थता, पोकळी किंवा अपूर्णतेच्या भावना जाणवते. खरं तर माणसाच्या आयुष्यातील सामान्य चिंतेच्या विपरीत, जी सततच्या ताणतणावांशी किंवा मानसिक आरोग्य विकारांशी संबंधित असते, सूर्यास्ताची चिंता ही दिवसापासून रात्रीपर्यंतच्या दैनंदिन संक्रमणाशी संबंधित असते.
खंगरोत याबाबत, “ही बाब हंगामी भावनिक विकार (एसएडी)पासून वेगळी आहे, जी हिवाळ्यात दिवसाच्या कमी प्रकाशात जाणवते. ‘सूर्यास्ताची चिंता’ ही एका ऋतूशी बांधील नसून, ती या दैनंदिन बदलाशी संबंधित खोलवरच्या मानसिक घटकांमुळे उद्भवू शकते,” असे त्या म्हणाल्या.
जैविक किंवा मानसिक घटक ज्यामुळे लोकांना संध्याकाळी अस्वस्थ वाटते
खंगरोत स्पष्ट करतात की, काही मानसिक घटक सूर्यास्ताच्या चिंतेला कारणीभूत ठरतात. “बऱ्याच लोकांसाठी मावळणारा सूर्य पूर्णतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अपूर्णता किंवा पश्चात्तापाची भावना निर्माण होऊ शकते.” याव्यतिरिक्त एकाकीपणा किंवा अंधाराची भीती हे कारणही असू शकते. कारण- जे लोक रात्रीचा वेळ एकांत किंवा जुन्या, वाईट आठवणींमध्ये घालवतात. त्यांना संध्याकाळ अस्वस्थ करणारी वाटू शकते.
जैविक घटकदेखील यात भूमिका बजावतात. झोप-जागण्याच्या होण्याच्या चक्राचे नियमन करणारे सर्कॅडियन लय किंवा अंतर्गत शरीर घड्याळ विस्कळित होऊ शकते, ज्यामुळे सूर्यास्ताची चिंता वाढते. खंगरोत म्हणतात की, दिवसाचा प्रकाश कमी होत असताना, शरीराला विश्रांतीसाठी तयार करण्यासाठी मेलाटोनिनचे उत्पादन वाढते. तथापि, या संप्रेरकाची वाढलेली संवेदनशीलता असंतुलन निर्माण करू शकते, ज्यामुळे शांत होण्याऐवजी अस्वस्थता वाटते.
संध्याकाळी अस्वस्थता सामना करणाऱ्या व्यक्तीसाठी उपचार खंगरोत परवानाधारक थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) टूल्स आणि तंत्रे’ वापरण्याची शिफारस करतात. सूर्यास्तामुळे चिंता निर्माण होते तेव्हा ग्राउंडिंग व्यायाम विशेषतः उपयुक्त ठरू शकतो, जसे की ‘५४३२१ ग्राउंडिंग एक्सरसाइज ‘, जे मनाला पुन्हा केंद्रित करण्यास मदत करते.
याव्यतिरिक्त रात्रीच्या वेळी अंधाराच्या वेळी प्रकाशाचा संपर्क वाढवण्यासाठी लाईट थेरपी दिवे वापरल्याने सर्कॅडियन लय नियंत्रित होण्यास आणि सूर्यास्ताच्या चिंतेशी संबंधित लक्षणे कमी होण्यास मदत होते.