Heart Attack : मागील काही वर्षांपासून हार्ट अटॅकचा धोका खूप वाढला आहे. बदलती लाइफस्टाइल, अयोग्य आहार, स्ट्रेस, धूम्रपान, लठ्ठपणा किंवा मधुमेहसारख्या आजारांमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. सहसा हार्ट अटॅक हा सकाळी येतो, असे मानले जाते पण सोमवारी हार्ट अटॅक येण्याची अधिक शक्यता असते का? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे. दिवस बघून हार्ट अटॅक कसा येणार? खरंच आठवड्यातील दिवस आपल्या आरोग्यावर परिणाम करतात का? याविषयी वेगवेगळ्या अभ्यासातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बेलफास्ट हेल्थ ॲण्ड सोशल केअर ट्रस्ट आणि आयर्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या संशोधकांनी २०१२ ते २०१८ दरम्यान हार्ट अटॅकमुळे हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या आयर्लंडमधील जवळपास १०,५२८ रुग्णांवर रिसर्च केला होता. या रिसर्चमध्ये असे दिसून आले की सीरियस हार्ट अटॅक हे आठवड्याच्या सुरुवातीला येतात.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी

हेही वाचा : Health Special: कधी थंड, कधी गरम: त्वचाविकारांचा आणि तापमानाचा काय संबंध?

पण सीरियस हार्ट अटॅक म्हणजे काय? सीरियस हार्ट अटॅकला ST- segment elevation myocardial infarction (STEMI) म्हणतात. हा सीरियस अटॅक तेव्हा येतो जेव्हा कोरोनरी आर्टरी पूर्णपणे ब्लॉक होतात.
यूकेच्या मॅंचेस्टर येथे झालेल्या एका ब्रिटिश कार्डिओव्हस्कूलर सोसायटी परिषदेत सादर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असे सांगितले होते की आठवड्याच्या सुरुवातीला कामामुळे STEMI म्हणजेच सीरियस हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ दिसून आली आणि याची संख्या सोमवारी जास्त होती.

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनचे वैद्यकीय संचालक प्रोफेसर नीलेश सामानी सांगतात, “रिसर्चमध्ये वेळेचा सुद्धा पुरावा सांगितला आहे पण आता आपण ठराविक दिवसांविषयी जाणून घेऊ या. ज्यामुळे सीरियस हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. जर हे समजण्यात डॉक्टर यशस्वी झाले तर भविष्यात अनेक लोकांचा जीव वाचवू शकतात.”

हेही वाचा : द्राक्षांमुळे कोलेस्टॉलची पातळी कमी होते का? ह्रदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?

बेलफास्ट हेल्थ ॲण्ड सोशल केअर ट्रस्टचे संशोधक जॅक लॅफन सांगतात, ” संशोधकांना आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी आणि STEMI हार्ट अटॅकमध्ये खूप जास्त सांख्यिकीय संबंध आढळून आला.
जॅक लॅफन पुढे सांगतात, ” याविषयी आम्ही सांगितले आहे पण तरीसुद्धा कुतूहल कायम आहे. सीरियस हार्ट अटॅकमागे अनेक कारणे असू शकतात पण आम्ही केलेल्या अभ्यासातून जे समोर आले त्याकडे दुर्लक्ष करणे, चुकीचे आहे.”

गुरुग्राम येथील नारायण हॉस्पिटलचे सहयोगी संचालक संजय चुघ म्हणाले, “अभ्यासावरून असे दिसून येते की हार्ट अटॅक हे सहसा सोमवारी येण्याची शक्यता अधिक असते. यामागे अनेक कारणे आहेत. भरपूर मद्यपानाचे सेवन, भरपूर जेवण, वीकेंडला पार्ट्या करणे आणि आठवड्याच्या सुरुवातीला कामामुळे येणारा स्ट्रेस यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

हेही वाचा : Uric acid and Gout : संधिरोग होण्यामागे खरंच युरिक अ‍ॅसिड कारणीभूत? तज्ज्ञांनी सांगितले खरे कारण..

याशिवाय वेगवेगळ्या संस्कृती आणि समाजामध्ये हा दिवस बदलू शकतो. जसे की दिल्ली एनसीआरमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी जास्त नोंदवले जाते. आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की जास्तीत जास्त हार्ट अटॅक आणि स्ट्रोक चुकीच्या लाइफस्टाइलमुळे येतात. यात विशेषत: उच्च रक्तदाबाची समस्या असो की हार्ट रेटचे अचानक वाढणे असो किंवा रक्त गोठणे असो यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.”

डॉ. चुघ पुढे सांगतात की, “हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्यामागे अनेक कारणे आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव, स्मोकिंग, स्ट्रेस, वय इत्यादी घटकही तितकेच कारणीभूत आहेत.

नवी दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटमधील ॲडल्ड कार्डिओथोरॅसिक व्हस्कुलर सर्जरीचे संचालक डॉ. ऋत्विक राज भुयान सांगतात, “हार्ट अटॅकचा फक्त आठवड्याशी संबंध नाही तर ऋतूशी संबंध आहे. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक दिसून येते.”
“सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो, यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. अनेक रिसर्चमध्ये फरक दिसून आला आहे,” असेही राज भुयान यांचे म्हणणे आहे.

Story img Loader