भारतातील कडक उन्हाळ्यामुळे आपल्याला सतत काहीतरी थंड आणि रसाळ खाण्याची इच्छा होते. हे खरे आहे की आपण पाणी पिऊन आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करू शकतो पण आपल्यला एखाद्या षौष्टिक आणि शुन्य कॅलरीज असलेल्या पेयाची गरज आहे. तुमची ही गरज भागविण्यासाठी उन्हाळ्यात कोकम फळ हा उत्तम पर्याय आहे. कोकम या फळामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात. कोकम सरबत हे उन्हाळ्यातील प्रसिद्ध पेयांपैकी एक आहे. याला गार्सिनिया इंडिका ( Garcinia Indica) या नावाने देखील ओळखले जाते. कोकममध्ये पौष्टिक असतात तसेच त्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन सी, फॉलिक अ‍ॅसिड, कॅलशिअम, आयर्न, पोटॅशिम, मॅग्नेशिअम, मॅंगनीज आणि झिंक यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोग्यासाठी लाभदायी आहे कोकम

१. रोगप्रतिकार शक्ती वाढवते कोकम

या फळातील अनेक घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, ज्यामुळे हे फळ अनेक जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग हाताळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरते. हे टॉपिकल(शरीरावर लावले जाणारे) आणि तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या घटकांबाबतीत खरे आहे. गार्सिनिया इंडिकाच्या मदतीने आतड्यांसंबंधी ऍलर्जी कमी करता येते हेही अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

२. पचनक्रिया सुधारण्यास मदत करते

गोड, तिखट आणि अत्यंत ताजेतवाने कोकम सरबत आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास असलेल्या रुग्णांना हे पेय प्यायल्याने खूप फायदा होतो.

.शरीरासाठी नैसर्गिक शीतलक म्हणून काम करते

कोकम फळ एक नैसर्गिक शीतलक आहे आणि एक ग्लास कोकम ज्यूस आपल्याला उन्हाळ्यातील उष्णतेपासून खूप आराम देतो. हे आश्चर्यकारकपणे ताजेतवाने आहे आणि आपल्याला ऊर्जा देते. हे निर्जलीकरण देखील प्रतिबंधित करते.

हेही वाचा –निरोगी राहणे एवढे पण अवघड नसते! ‘या’ ५ सोप्या सवयी लावा, स्वत:ला नेहमी सक्रिय ठेवा

४.आपल्या हृदयासाठी चांगले

कोकममध्ये कॅलरीज कमी असतात पण फायबर भरपूर असते. त्यात शून्य कोलेस्टेरॉल असतात आणि एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅंगनीज सारख्या खनिजे असल्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित ठेवते. हे सर्व घटक आपल्या हृदयाचे रक्षण करतात.

५.त्वचेसाठी देखील लाभदायक

एक अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडेंट असल्याने, वृक्षमला(Vrikshamla) अनेक वृद्धत्वविरोधी उपचारांमध्ये देखील नियमितपणे वापरली जाते. ते केवळ दुरुस्त आणि बरे करत नाही तर त्वचा आणि ऊतींचे नुकसान टाळण्यास देखील मदत करते.

हेही वाचा – रोबोटच्या सहाय्याने पहिल्या बाळांचा झाला जन्म, असा केला तंत्रज्ञानाचा वापर, जाणून घ्या सविस्तर

६.मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते

कोकममध्ये मधुमेहविरोधी (anti-diabetic) क्षमता आहे. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट देखील आहे. हे आपल्या शरीरातील इन्सुलिनचा स्राव वाढवते, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होण्यास प्रतिबंध होतो. यामुळे कोकम मधुमेहाच्या निंयत्रणात उपयुक्त ठरते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)