Hardik Pandya Diet Plan : २९ जून रोजी भारताने टी -२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकून आणला. भारतीय संघाला हा मोठा विजय मिळवून देण्यात संघातील प्रत्येक खेळाडूने खूप मोलाचे योगदान दिले. आज आपण हार्दिक पांड्याविषयी जाणून घेणार आहोत; ज्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करीत भारताला विश्वचषक जिंकून दिला. हार्दिक पांड्याला काही महिन्यांपासून अनेक कारणांवरून सतत ट्रोल केले जात होते; पण त्याच्या फिटनेस व मेहनत यांचा परिणाम खेळावर दिसून आला नाही. आज आपण अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेस आणि डाएटविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पांड्या जेव्हा सामना खेळत नाही तेव्हा तो त्याच्या दैनंदिन जीवनात योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश करतो. पांड्या ईएसपीएन (ESPN)ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगतो, “मी सकाळी ७ किंवा ८ वाजता उठतो. हनुमान चालिसा सात वेळा ऐकतो आणि त्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करतो. त्यानंतर मी जवळपास तासभर योगा आणि मग अर्धा तास ध्यान करतो. मी ११.३० ते १ च्या दरम्यान जिममध्ये व्यायाम करतो. वर्कआउट सेशननंतर मी १५ मिनिटे आराम करतो.”

हेही वाचा : झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेला हार्दिक पांड्या पुढे सांगतो की, दुपारी जेवणाच्या वेळीच तो फक्त टीव्ही पाहतो. यादरम्यान तो पाऊण तास ब्रेक घेतो. हार्दिक सांगतो, “एक तास आराम केल्यानंतर मी ४ ते ६.३० वाजेपर्यंत जिममध्ये पुन्हा व्यायाम करतो. सायंकाळी ७ वाजता मी परत घरी येतो. मी कधी पुस्तक वाचतो, कधी लिहितो आणि साडेनऊ वाजता मी झोपतो.” यावरून तुम्हाला कळेल की, हार्दिक त्याच्या फिटनेसविषयी किती गंभीर आहे.

प्रमाणपत्रधारक योग प्रशिक्षक व ‘हॅबिल्ड’चे सीईओ सौरभ बोथरा यांच्या मते, वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी काही विशिष्ट सवयी फायदेशीर ठरू शकतात. कार्टिसोल (Cortisol) नावाचा स्ट्रेस हार्मोन सकाळी जास्त प्रमाणात स्रवतो. त्यामुळे आपल्याला सकाळी जाग येते. हा हार्मोन आपल्या संपूर्ण दिवसभराच्या कामावर परिणाम करू शकतो; पण तुम्ही जर शरीराची हालचाल केली. जसे की धावणे, नियमित योगा केला, तर कार्टिसोलचे प्रमाण कमी होते.

बोथरा यांच्या मते, “आपले विचार आणि कृती हे आपल्या दिवसाची उद्दिष्टे ठरवीत असते. ध्यान करणे, प्राणायाम करणे किंवा श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कार्टिसोल हार्मोनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दिवसभराचे वेळापत्रक तयार केले, तर ते अधिक सोईस्कर ठरते.
“व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तके वाचणे किंवा पॉडकास्ट ऐकणे खूप चांगले आहे. या सवयी जर सातत्याने पाळल्या, तर तुमचा दिवस चांगला जाईल. पण यादरम्यान स्वत:साठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know all rounder cricketer hardik pandya diet plan although he was facing trolling ndj
Show comments