डोकेदुखी खूप वेदनादायक असू शकते. कधी भुवयांभोवती तीव्र वेदना जाणवते तर कधी डोक्याच्या मागच्या बाजूला. तुम्हाला माहिती आहे का की, डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत. डोकेदुखी कशामुळे होते हे समजून घेतल्याने त्यावर उपचार करण्यास मदत होऊ शकते. डोकेदुखी कशामुळे होते आणि ती कमी कशी करावी, याबाबत इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांकडून जाणून घेतले आहे.

“डोकेदुखी हा सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. डोकेदुखी ही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. कधी कधी डोकेदुखी इतकी वाईट असू शकते की, त्याने तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करताना त्रास होऊ शकतो”, असे वर्सोवा येथील स्वाहिता आयुर्वेद क्लिनिकच्या संस्थापक, एमडी (आयुर्वेद) डॉ. मनीषा मिश्रा गोस्वामी यांनी स्पष्ट केले.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे

“एखाद्या व्यक्तीमध्ये डोकेदुखीसह कोणत्याही प्रकारचे आजार असणे हे वात, पित्त आणि कफच्या मूलभूत जैव ऊर्जेतील असंतुलनाचे लक्षण आहे आणि त्यांना पुन्हा संतुलनात आणणे हाच त्यावरील उपाय आहे,” असे डॉ. मिश्रा गोस्वामी म्हणतात.

हेही वाचा – “प्रेग्नन्सीदरम्यान माझे ३५ किलो वजन वाढले होते”, सोनम कपूरने केला खुलासा; डॉक्टरांनी सांगितले कारण

डोकेदुखीचे प्रकार:

वातज डोकेदुखी : या प्रकारची डोकेदुखी तणाव, वाऱ्याची झुळूक, अश्रू दाबून ठेवणे, खूप रडणे, सतत खाली पाहणे किंवा खूप बोलणे आणि बद्धकोष्ठता यामुळे होऊ शकते.

डॉ. मिश्रा गोस्वामी म्हणाल्या की, “रक्तवाहिन्यांमध्ये तीव्र स्पंदनांसह डोळ्याच्या बाजूला आणि कपाळावर वेदना जाणवते.

“कधी कधी ती स्वतःहून शांत होते किंवा तेलाने मसाज केल्याने शांत होते आणि चांगली झोप लागते. रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा तूप घ्या. गरम जेवणामुळे वात कमी होतो. श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा सराव करणे चांगले आहे,” असे डॉ. मिश्रा गोस्वामी यांनी स्पष्ट केले.

पित्तज डोकेदुखी : ही मायग्रेनसारखी डोकेदुखी आहे, जी पित्ताच्या वाढीमुळे होते. पित्त हे पचन आणि चयापचय यासाठी जबाबदार आहे.

या प्रकारामध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात किंवा डोळ्यांच्या आणि भुवयांच्या आसपास वेदना जाणवू शकतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी भूक लागल्यावर ही डोकीदुखी वाढते.

गोस्वामी यांनी शिफारस केली की, थंडावा देणारे, सुखदायक आणि ताजे अन्न हा आहाराचा भाग असावा. रिकाम्या पोटी तूप आणि गुलकंद घेतल्याने तसेच चंदनसारखे थंड करणारे तेल लावल्यानेही वेदना कमी होण्यास मदत होते.

कफजा डोकेदुखी : बहुतेकदा सायनसशी संबंधित, या प्रकारच्या डोकेदुखीमुळे डोके जड वाटते, मंद वेदना आणि भुवयाभोवती कडकपणा जाणवतो.

“उबदार अन्न आणि कोमट तेल लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. सुंठ पावडर पेस्ट लावणे किंवा त्रिफळा पाणी घेतल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते,” असे डॉ. मिश्रा गोस्वामी यांनी सांगितले.

हेही वाचा – पावसात भिजल्यानंतर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

डोकेदुखी कमी करण्यासाठी काय करता येईल?

डॉक्टरांच्या मते, “पहिली पायरी म्हणजे तुमची डोकेदुखी का होत आहे ते ओळखा. घरी शिजवलेले जेवण घ्या आणि अल्कोहोल, धूम्रपान टाळा व तळलेले पदार्थ खाऊ नका.

“मन निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यास करा आणि नियमित व्यायाम करा. हायड्रेटेड राहा आणि शरीराची योग्य मुद्रा (good posture) राखा,” असे डॉ. मिश्रा गोस्वामी म्हणाल्या.

निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने एकूणच आरोग्य सुधारेल. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, असे डॉ. मिश्रा गोस्वामी यांनी सुचवले.