नोव्हेंबर महिना हा जागतिक विगन महिना म्हणून देखील साजरा केला जातो. लोकसत्ताच्या आधीच्या लेखांमध्ये विगन आहाराबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहेच. आज नोव्हेंबर महिन्याच्या निमित्ताने विगन आहाराच्या इतिहासाबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल थोडेसे ! विगन आहाराचे मूळ साधारण १८०० सालापासून सुरु झालेले आढळते. ग्रीक गणितज्ञ पायथागोरस आणि त्याच्या अनेक अनुयायांनी देखील शाकाहारी आहार सुरू केला होता मात्र त्यासाठीची कारणे ही धार्मिक होती त्यातील गमतीशीर गोष्ट अशी की पायथागोरसच्या काही अनुयायांनी बीन्स म्हणजेच कडधान्यांना देखील आहारातून वजा केले होते कारण त्यांचा असा (गैर)समज होता कि कडधान्यदेखील काही मानवी जनुकांपासून बनलेले पदार्थ आहेत! गमतीचा भाग सोडल्यास विगन आहाराबद्दल गैरसमज असण्याचे प्रमाण सुरुवातीपासूनच आहे हे इथे अधोरेखित होते.

विगन आहाराची मुहूर्तमेढ रोवण्यात डॉ . विलियम लॅम्बे यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांना असं लक्षात आलं की वनस्पतीजन्य आहारामुळे अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. डॉक्टर लॅम्बेनी लिहिलेल्या काही पुस्तकांमध्ये विगन आहाराबद्दल लिहिलेले आढळते. हा आहार मुख्यत्वे केवळ वनस्पतीजन्य पदार्थ आणि कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थांशिवाय तयार केलेला होता आणि त्यांनी त्या वेळेला डेरीबॅन( dairy -ban म्हणजे न-दुग्धजन्य ) आणि बॅन-वेज (बॅन-Veg ) अशा नावाने स्वतःला घोषित केले होते. हळूहळू हीच नावे अपभ्रंश होत होत विगन या नावापर्यंत पोहचली . Vegan या इंग्रजी शब्दातील पहिली दोन अक्षरे Vegetarian (शाकाहार) या शब्दातील पहिली ३ अक्षरे आणि an म्हणजे शेवट या धर्तीवर – शाकाहाराची सुरुवात आणि शेवट या संकल्पनेवर आधारित आहे.

Rupali Chakankar angry reaction about obscene comments on social media
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रोफाइलला ठेवणारे अश्लील कमेंट कशी करू शकतात? रुपाली चाकणकरांची संतप्त प्रतिक्रिया
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Broccoli Or Cauliflower - Which Is Healthier?
ब्रोकोली की फ्लॉवर ? आरोग्यासाठी कोणती भाजी जास्त फायदेशीर; जाणून घ्या पोषणतज्ञ काय सांगतात
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
The site of the dockyard at Lothal, Gujarat, during the Indus Valley Civilisation. (Wikimedia Commons)
Indus Valley Civilization: हडप्पाकालीन लोथल बंदराच्या अस्तित्त्वाचे नवे पुरावे सापडले; काय सांगते नवीन संशोधन?
Bhiwandi cosmetics marathi news
कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची भिवंडीत विक्री
Rasmalai Modak Easy Recipe
Ganeshotsav 2024 : यंदा बाप्पासाठी बनवा ‘रसमलाई मोदक’; VIDEO तून पाहा सोप्पी पद्धत; रेसिपी लिहून घ्या पटकन
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी

१९८८ साली जागतिक स्तरावर मान्यता दिल्या गेलेल्या संज्ञेनुसार विगनीजम हे शास्त्र -अहिंसा , या-प्राणिजन्य पदार्थांचे सेवन आणि वापर , केवळ वनस्पतीजन्य पदार्थांवर आधारित असणारी जीवनशैली म्हणून केला गेला. सोबत विगन आहार हे न-प्राणिजन्य आहार घटक आणि केवळ वनस्पतीजन्य पदार्थ आणि उत्पादने यावर आधारित असल्याचे घोषित केले गेले. या जीवनशैलीतून मानवाची उत्क्रांती आणि विकास होईल असे पाहिले जाईल असे देखील घोषित केले गेले.

हेही वाचा… Mental Health Special: आनंदाचा पासवर्ड

साधारण १८१३ च्या सुमारास काहीप्राणीप्रेमींनी न- प्राणिजन्य आहार पद्धती अवलंबायला सुरुवात केली . सन १९४४ पर्यंत विगन कार्यकर्त्यांनी या चळवळीला वेगळी दिशा दिली आणि त्यानुसार प्राणिहत्या पातक आहे आणि मानवी आरोग्यासाठी शाकाहार आणि त्याहूनही जास्त महत्वाचे म्हणजे अहिंसा तत्त्वावर आधारित विगन म्हणजेच न-प्राणीजन्य आहार ज्याला पूर्णपणे वनस्पतीजन्य आहार म्हणतात तो जास्त महत्वाचा आहे हे जनमानसात बिंबवले जाऊ लागले विगन ही संकल्पना प्राणीप्रेम आणि वनस्पतीजन्य आहारावर आधारित संकल्पना आहे. त्याला पूरक पैलूंचा विचार करता विगन प्रवक्ते निसर्गात होणारे बदल, प्रदूषण आणि त्याचे मानवी जीवनशैलीवर होणारे बदल अशा पैलूंचा आणि मानवी आहार-विहार आणि जीवन मूल्यांचा विचार होतो.

गेली अनेक वर्षे समाजमाध्यमांवर अनेक विगन पदार्थानी वेगळा ठसा उमटवला आहे. विगन आहारशैली नसून जीवनशैली आहे. विगन असणं ही संकल्पना किवा शाकाहार या संकल्पनेपुढे जाऊन संपूर्ण वनस्पतीजन्य जीवनशैलीशी संबंधित आहे. विगन आहाराबद्दल होणाऱ्या अनेक संशोधनाअंती त्याचे विविध वयोगटातील मानव शरीरावर होणारे परिणाम वारंवार अधोरेखित केले गेले आहेत.

गरोदर स्त्रिया : जीवनसत्त्वांची कमतरता. आवश्यक वजन वाढ न होणे , बाळाच्या न्यूरॉन्सची योग्य वाढ न होणे. शरीरात कॅल्शिअमची कमतरता असणे. हाडे ठिसूळ असणे.

तरुण मुली आणि मुलं: अपुरी वाढ, भुकेच्या संप्रेरकांचे योग्य संतुलन, हाडांची घनता कमी असणे. आहारविषयक तक्रारी जास्त असणे. आहारविषयक आजारांचे प्रमाण जास्त असणे. खाण्याच्या तक्रारी- अनावश्यक खाणे आणि आहाराबद्दल भीती बाळगणे अशा समस्यांचे प्रमाण जास्त असते.
मुलींमध्ये लोह कमी असणे , जीवनसत्त्व बी ,जीवनसत्त्व डी -३ चे अत्यल्प प्रमाण आढळून आले आहे. विगन आहारामुळे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासारख्या आजारांपासून रक्षण होते असे संशोधन देखील झालेले आहे मात्र अशा आहारपद्धतीचा अवलंब करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक ठरतं.

हेही वाचा… Health Special: ‘ड’ जीवनसत्वाचे शरीरासाठी एवढे महत्त्व का?

विगन आहार करताना तुम्हाला जीवनसत्व आणि पोषणमूल्यसाठी काही डायटरी सप्लीमेंट्स म्हणजे बाह्य अन्न घटकांवर अवलंबून राहावे लागते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी विगन आहाराचे उत्तम परिणाम आढळून आले आहेत. मात्र वजन कमी होत असताना हाडांची घनता कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

विगन म्हणजे नैसर्गिक आणि वनस्पतीजन्य !

अशा आहार पद्धतीचा अवलंब करताना नैसर्गिक धान्ये, कडधान्ये, तृणधान्ये ,फळे , फळभाज्या, पालेभाज्या , सुकामेवा, तेलबिया , वनस्पतीजन्य तेल आणि तूप यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. विगन म्हणजे कच्चा आहार नव्हे . विगन आहारपद्धतीमध्ये शिजवलेले वनस्पतीजन्य पदार्थ नक्कीच समाविष्ट केले जाऊ शकतात . तेलबियांवर प्रक्रिया करू त्यापासून तयार केले जाणारे अन्नपदार्थ आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.

कोणत्याही सजीव प्राण्याचे सेवन न करणे तसेच प्राणिजन्य दूध, किंवा तत्सम पदार्थ यांना आहारातून पूर्णपणे वजा करावे लागते. अनेकजण मनःशांतीसाठी विगन आहारशैलीचा अवलंब करतात. मनःशांतीची सुरुवात संवेदना आणि संवाद या दोन तत्त्वांवर आधारित आहे. आपण समाज म्हणून संवेदनशील असलो आणि संवाद साधताना आपण माणूस म्हणून विचार करत असू तर आपला प्रवास विकसनशील असण्याकडे होऊ शकतो. विगन जीवनशैलीच्या अहिंसा आणि विकास या दोन मूल्यांचा नियमित आहारविहारात समावेश करायला नक्कीच हरकत नाही . आहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ आहेतच!