How unhealthy is a vada pav : वडापाव हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांची भूक भागवणारा वडापाव खूप जास्त लोकप्रिय आहे. वडापाव पाहताच तोंडाला पाणी सुटतं आणि गरमा गरम वडापाव खाण्याची इच्छा होते. खरं तर वडापाव जरी चवीला स्वादिष्ट असला तरी आरोग्यासाठी वडापाव कितपत चांगला आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. वडापाव नियमित खाणे चांगले आहे का? वडापाव खाल्ल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात? वडापाव कोणी खाऊ नये? याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत सांगतात, “वडापाव हा खूप जुना पदार्थ आहे. कामगार किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्या वर्गातील लोकांना त्वरित ऊर्जा देण्याच्या हेतूने हा पदार्थ अस्तित्वात आला.
लगेच ऊर्जा देणारा पदार्थ खायचा असेल किंवा काहीतरी चमचमीत खायचं असेल तर हा पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वडापाव आरोग्यासाठी का चांगला नाही?

पल्लवी सावंत सांगतात, “वडापावमधील वडा जो बनवला जातो त्यात बटाटा म्हणजे स्टार्च आणि बेसन म्हणजे प्रोटिन्स असतात. यात असलेले कार्ब्स आणि प्रोटिन्सचे मिश्रण खूप चांगले आहे. पण, वड्याबरोबर पाव असतो जो मैद्यापासून बनवला जातो. त्यामुळेच वडापाव शरीराला चांगला नाही, असे आपण म्हणतो.
मैद्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. मैद्यामुळे आपल्याला वेगवेगळे विकार होऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैद्यामुळे सुस्ती येते. जर वडापाव खात असताना तुम्ही मैद्याचा पाव खात असाल तर हा एक चांगला पर्याय नाही.”

त्या पुढे सांगतात, “वडापाव तयार करताना तो तळला जातो. तळल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे फॅट आपल्या शरीरात जातात. रस्त्यावरचा वडापाव खाताना तुम्हाला अनेकदा जाणवले असेल की, हे तेल अनेकदा तळण्यासाठी वापरले जाते आणि तेल जर वारंवार वापरले गेले तर त्यात ट्रान्स फॅटी ॲसिड तयार होतं, ज्यामुळे
खराब कोलेस्ट्रॉल वाढतं. जर शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. कोलेस्ट्रॉलमुळे रक्त प्रवाह मंदावतो.”

सावंत सांगतात, “वडापावमध्ये फॅट्स, कार्ब्स आणि प्रोटिन यांचे प्रमाण उतरत्या क्रमाने आहे आणि जर आपल्याला सर्वसमावेशक आहाराचा विचार करायचा असेल तर हा क्रम चढता असायला हवा. म्हणजेच आहारात फॅट्स कमी, कार्ब्स मध्यम आणि प्रोटिन जास्त असायला हवे. पण, वडापावमध्ये हे प्रमाण उलट आहे.

हेही वाचा : उपवासाला साबुदाणा खावा का? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतायत….

या लोकांनी वडापाव खाऊ नये…

सावंत सांगतात, “बाहेरच्यापेक्षा घरचा वडापाव चांगला आहे, पण काही लोकांनी घरचासुद्धा वडापाव खाऊ नये. एखादा आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट खाऊ नये असा विचार करण्यापेक्षा तो आजार होऊ नये, यासाठी काय खाऊ नये याचा विचार करायला पाहिजे.
असे अनेकदा आढळून आले आहे की, रस्त्यावरचा वडापाव खाणाऱ्या तरुण मुलींमध्येदेखील किडनी लिव्हरचे विकार झालेले दिसून आले आहेत. कारण वारंवार वापरणाऱ्या तेलाचा आपल्या शरीरातील अवयवांवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांनी वडापाव खाऊच नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, ज्यांना किडनीचे विकार आहे किंवा शरीरात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित नाही, त्यांनीसुद्धा वडापाव खाऊ नये.
जे शक्यतो बसून काम करतात त्यांनीसुद्धा वडापाव खाणे टाळावे, हे माझे प्रांजळ मत आहे. जर तुम्ही जास्त शारीरिक कामे करत नाही, शारीरिक हालचाल करत नाही, कामाचं स्वरूप बसून असेल त्यावेळी वडापाव खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.”

महिन्यातून कितीदा वडापाव खावा?

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत सांगतात, “जर तुमची जीवनशैली निरोगी असेल तर तुम्ही महिन्यातून एखादा वडापाव खात असाल तर चालेल. तुम्ही जर निरोगी असाल, तुम्हाला कोणतेही आजार नाही, तुमचे फॅट टक्केवारी योग्य प्रमाणात असेल आणि तुम्ही आठवड्यातून एखादा वडापाव घरी बनवून खात असाल तर त्यात काहीही चुकीचे नाही. जर तुम्ही वडापाव घरी बनवत असाल आणि ताजा वडापाव खात असाल तर त्यात असलेले फॅट चांगले असते. तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही बाहेरचा एखादा वडापाव महिन्यातून एकदा खाऊ शकता, पण तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला आधीच कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, तुम्हाला आजार असेल तर तुम्ही वर्ज्य करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : Multigrain Rotis : मिश्र धान्यांची पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात

वडापावबरोबर चहा का पिऊ नये?

सावंत सांगतात, “ज्या दिवशी वडापाव खात असाल त्या दिवशी व्यायाम चुकवू नका आणि त्याबरोबर लस्सी किंवा गोड पदार्थाचे सेवन करू नका.”
वडापावबरोबर अनेक लोकं चहा घेतात. याविषयी पल्लवी सावंत सांगतात, “कोणत्याही पदार्थाबरोबर चहा किंवा कॉफी पिऊ नये. वडापावमध्ये तसेही प्रोटिन्स नाही. चहामध्ये प्रोटिन आणि थोड्या प्रमाणात न्यूट्रीअंट्स असतात. वडापावबरोबर चहाचे सेवन केल्याने तेसुद्धा तुमच्या शरीराला मिळत नाही. “

पल्लवी सावंत सांगतात, “जर तुम्हाला वडापाव अति प्रिय असेल आणि निरोगी राहायचं असेल तर फक्त वडा खा किंवा जर तुम्हाला वडा हा पावाबरोबरच खायचा असेल, तर गव्हाचे पाव मिळतात; हा एक चांगला पर्याय आहे. वडापाव दोन तीन पद्धतीने बनवला जातो. त्यामुळे पाव खाणे टाळा. फक्त वडा खा. पाव शक्यतो आहारामध्ये घेणे टाळा.”

Story img Loader