Thyroid and Weight : थायरॉइडची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष करून महिलांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. कारण थायरॉइडमुळे लठ्ठपणासारख्या अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी थायरॉइडग्रस्त लोकांना वजन नियंत्रणात ठेवणे अवघड जाते. याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

थायरॉइड ग्रंथी आपल्या मानेच्या भागात असतात. मेंदूद्वारे या ग्रंथींवर नियंत्रण ठेवले जाते. ज्यावेळी आपण म्हणतो की, थायरॉइडमुळे वजन वाढलंय तेव्हा समजायचं की थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम झाला आहे. थायरॉइड ग्रंथी ट्रायआयडोथायरोनिन Triiodothyronin (T3) आणि थारोक्सिन Thyroxin (T4) अशी दोन हार्मोन्स स्त्राव करतात. या हार्मोन्समुळे शरीराची चयापचय क्रिया चांगली राहते. शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा होतो, हृदयाची गती चांगली राहते आणि शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करते.”

Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Broccoli Or Cauliflower - Which Is Healthier?
ब्रोकोली की फ्लॉवर ? आरोग्यासाठी कोणती भाजी जास्त फायदेशीर; जाणून घ्या पोषणतज्ञ काय सांगतात
loksatta kutuhal artificial intelligence for wildfire prediction
कुतूहल : वणव्यांच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Loksatta kutuhal System Reliability Self Driving Artificial Intelligence
कुतूहल: प्रणालींची विश्वासार्हता
Loksatta explained Prices collapsed before the new soybeans hit the market
विश्लेषण: सोयाबीनचे अर्थकारण कसे बिघडणार?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : न्यायदानातील विलंबही कारणीभूत

थायरॉइड वाढले हे कसे जाणून घ्यावे?

थायरॉइडमध्ये हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड असे दोन प्रकार असतात. हायपोथायरॉइडमध्ये जेव्हा थायरॉइडचे कार्य बिघडते तेव्हा थायरॉइड ग्रंथीला खूप जास्त काम करावे लागते. त्यामुळे चयापचय शक्ती कमी होते, थकवा जाणवतो, श्वास घेताना तुम्हाला त्रास जाणवतो आणि हळू हळू वजन वाढत जाते.
जर तुम्हाला हायपरथायरॉइड असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. तुमची भूक कमी होऊ शकते, याचा परिणाम म्हणून तुमचे वजन वाढू शकते.

थायरॉइडची लक्षणे ?

थायरॉइड वाढलेले आहे, हे ब्लड टेस्ट केल्यावर कळू शकते पण त्याआधी आपण त्याची लक्षणे जाणून घेऊ या.

१. शरीरावर सारखी सूज येणे
२. खूप जास्त थंडी वाजणे
३. वजन वाढणे
४. खूप जास्त थकवा येणे
४. खूप जास्त चिडचिड होणे
५. स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होणे
६. थकवा येणे
७. श्वास घेण्यास त्रास होणे

थायरॉइडमुळे वजन का वाढतं ?

पल्लवी सावंत सांगतात, “आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत ठेवणे हे थायरॉइडचे महत्त्वाचे कार्य आहे. याशिवाय थायरॉइड ग्रंथी भूकेवर नियंत्रण ठेवते आणि शरीरात उष्णता निर्माण करते. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुमची पचनक्रिया कमकूवत होऊ शकते. त्याचा परिणाम आपल्या आहाराच्या आवडी निवडीवर होतो. थंडी वाजणे हे थायरॉइडचे महत्त्वाचे लक्षण आहे. जर लोह कमी असेल तर आपल्याला थंडी वाजते. परिणामी आपलं गोड खाण्याकडे कल वाढतो.त्यामुळे चांगला आहार जसे की वरण भात, सॅलेड, पालेभाज्या या गोष्टी आपण खाणे टाळतो आणि त्यात थायरॉइड संतुलित नसेल तर वजन आणखी वाढते. हायपोथायरोडीझमचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे.

हेही वाचा : एक चमचा आल्याचं लोणचं रोज खाल्ल्याने शरीराला काय मदत मिळू शकते? बनवायचं कसं ते ही पाहा 

थायरॉइडग्रस्त असल्यावर वजन कमी कसं करावं?

वजन कमी करताना तुमची थायरॉइडची मात्रा किती आहे, हे आधी तपासावे. त्या मात्रेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉइडसाठी औषध घ्यावेत. औषधीचे सेवन केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटे काहीही खाऊ नये. एक असा गैरसमज आहे की, वजन कमी करायचे असेल तर फॅट्स खाऊ नये. जेव्हा तुम्ही आवश्यक फॅटयुक्त पदार्थ खाता, तेव्हा तुमचे वजन कमी होऊ शकते आणि दुसरे म्हणजे तुम्ही खूप जास्त कर्बोदके खाल्ली आणि व्यायाम काहीच करत नसाल तर तुमचे वजन जसे आहे तसे राहू शकते. त्यामुळे थायरॉइड असताना तुम्हाला प्रोटिन्स आणि फॅट्सचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. ज्यांना थायरॉइड आहे, त्यांनी सॅलडमध्ये कोबी फ्लॉवर या भाज्या कच्च्या खाणे टाळावे.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा?

पल्लवी सावंत सांगतात, “थायरॉइड ग्रस्त लोकांनी शक्यतो घरचे जेवण करावे. सर्व प्रकारची फळे थायरॉइड असणारे व्यक्ती खाऊ शकतात. दिवसातून किमान एक वाटी कडधान्य देखील शिजवून खाऊ शकतात फ्लॉवर, ब्रोकोली, कोबी यांसारख्या भाजी मात्र टाळाव्यात कारण त्यांच्यात असलेल्या गॅट्रोजन थायरॉइड साठी घातक ठरू शकतात. जेवढे तुम्ही घरी शिजवलेले ताजे अन्न खाऊ शकाल तेवढे तुमच्या थायरॉइड ग्रंथी साठी उत्तम आहे. अनेकदा हायपोथायरोडीझम असताना भूक लागत नाही म्हणून लोक जेवण करत नाहीत अशा थायरॉइड ग्रस्त व्यक्तींनी थायरॉइडचे प्रमाण किती आहे हे रक्त तपासणी द्वारे तपासावे आणि त्याप्रमाणे आहार घ्यावा शिवाय नियमित व्यायाम तुमच्या थायरॉइड ग्रंथीचे काम नियंत्रणात आणण्यास मदत करू शकतो. शरीराच्या अवयवांना शिस्तीत ठेवले की आपोआप शरीरातील संप्रेरकांवर योग्य अंकुश ठेवता येतो त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात झोप घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. लवकर झोपणे आणि लवकर उठणे आणि त्याप्रमाणे जीवनशैली बदलणे यामुळे देखील थायरॉइडचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यात मदत होते”