हल्लीची मुलं स्वतःहून सोशल मीडियावर येण्याआधीच त्यांचा डिजिटल प्रेझेन्स तयार झालेला असतो. त्यांना तो डिजिटल प्रेझेन्स हवाय का, त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेलं त्यांना आवडतंय का या सगळ्याशी त्या मुलांचा काहीही संबंध नसतो. मुलांचे फोटो आणि व्हिडीओ, त्यांच्या नावासकट लिहिलेल्या पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर करत असताना आपल्या मुलांना हे शेअरिंग आवडणार आहे का, त्यांची अशा शेअरिंगसाठी परवानगी आहे का, त्यांची इच्छा आहे का हे आपण मुलांना विचारतो का? ज्या तान्ह्या बाळांना अजून बोलता येत नाही, स्वतःच्या जगण्याबाबतच्या निवडी करता येत नाहीत त्यांचे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करून ठेवणं योग्य आहे का?

माणसाची पिल्लं स्वतः निर्णय घ्यायला फार उशिरा शिकतात कारण पालक त्यांना तशी संधीच देत नाही. माणूस अनेकार्थानं परावलंबी जीव आहे. कामाच्या निमित्ताने जेव्हा मुलांशी बोलणं होतं तेव्हा अनेक मुलांना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चारचौघांना दाखवलेले आवडत नाहीत, शेअरिंग आवडत नाही. पण पालकांना हे सांगण्याची अनेकदा त्यांच्यात हिंमत नसते. तर काहीवेळा आईबाबांना वाईट वाटेल म्हणून ते गप्प बसतात. कधीतरी मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं निराळं आणि सातत्यानं तेच करत राहणं वेगळं. यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपण आपल्या मुलांचे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करत असतो.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

हेही वाचा : हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा का होतो? तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या दिवसांत केसांची कशी घ्यावी काळजी ….

मुलांची प्रायव्हसी आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्याबाबतची एखादी गोष्ट जगाला सांगायची की नाही हा त्यांचा निर्णय असला पाहिजे. त्यांच्या अंघोळीची, खेळाची, खाण्या पिण्याची, कपडे घालण्याच्या पद्धतींची, त्यांच्या खोलीची, दप्तराची, किंवा इतर कुठल्याही गोष्टींची माहिती द्यायची की नाही हा निर्णय मुलांचा असतो. ही निवड त्यांनी करायची आहे कारण ते त्यांचं आयुष्य आहे. निवडीला मदत करणं फक्त पालकांनी करायचं असतं. पण शेरेटिंगमध्ये अडकलेले पालक हा सगळा विचार करत नाहीत. ते त्यांना आवडतील ते फोटो आणि व्हिडीओ धडाधड एका मागोमाग एक सोशल मीडियावर टाकत सुटतात. खास सोशल मीडियासाठी फोटो काढून घेतात. व्हिडीओ तयार करतात. आपण मुलांचं खासगी आयुष्य जगासाठी खुलं करतोय हा विचार त्यांच्या मनालाही शिवत नाही. मुलांचं चिमुकलं सुंदर जग पब्लिकसाठी खुलं करून टाकतो. त्यांच्या जगातल्या छोट्या छोट्या गमती जमती ते आणि आईबाबा एवढ्याच मर्यादित न ठेवता साऱ्या जगाच्या करून टाकतो. त्यांची फक्त आईबाबांसाठी असलेली गुपितं जगाला सांगून मोकळे होतो.

हेही वाचा : थंडीत ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कुरळे केस देतात त्रास, केसगळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलं खास उपाय 

कशाला?

मुलांना असा रिएलिटी शो नको असतो. मग पालकांना तो हवाहवासा असतो का? अनेकदा मुलांच्या कौतुकाच्या आडून स्वतःची पाठ थोपटून घेण्याकडे पालकांचा कल असतो का? आणि या सगळ्या गोंधळात मुलांचं आयुष्य आपण धोक्यात घालतोय हे पालकांच्या लक्षात येत नाही.
खरंतर पालक मुलांसाठी ‘गेट किपर्स’ असतात. सगळे धोके, सगळी नकोशी माणसं यांच्यापासून त्यांना दूर ठेवणारे आणि त्यांचं रक्षण, त्यांची प्रायव्हसी जपणारे, त्यांना संपूर्ण संरक्षण देणारे करणारे द्वारपाल. पण शेरेन्टींगमध्ये हे सुरक्षा कवच पालक स्वतःहूनच दूर करतात. त्यांच्या आयुष्याचा रिऍलिटी शो पोस्ट करता करता मुलांची परवानगी हा विषय तर बाजूला राहतोच शिवाय गुन्हेगारांना आयती माहिती आपण देत असतो हेही त्यांच्या लक्षात येत नाही.

मुद्दा आहे तो कन्सेंटचा. होकाराचा. मुलांच्या निवडीचा. प्रायव्हसीचा आहे.
आपण मुलांचे जे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करतोय ते मुलांना आवडतील का? मोठं झाल्यावर या सगळ्याकडे आपली मुलं कशी बघणार आहेत? त्यांना ते आवडलं नाही तर? त्याचा त्यांना त्रास झाला, त्यांनी त्रास करून घेतला तर? हे प्रश्न मुलांविषयी काहीही पोस्ट करताना पडले पाहिजेत.

कुठल्याही फोटोचं, व्हिडिओचं शेरेन्टींग करण्याआधी मुलांची परवानगी घेतली का? हा बेसिक प्रश्न विचारायला विसरू नका. आता काही पालक म्हणतील आमची मुलं खूप छोटी आहेत मग त्यांची परवानगी कशी घेणार?तर मग सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं टाळलं पाहिजे. जोवर ती मोठी होत नाहीत आणि त्यांच्या निवडी सांगत नाहीत तोवर शेरेटिंगचा मोह बाजूला ठेवता आला पाहिजे.

हेही वाचा : बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुणांना हृदयरोग; जागरूकता आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे  मत 

शेरेन्टींग म्हणजे काय?

शेअरिंग आणि पेरेंटिंग हे दोन शब्द एकत्र करून शेरेन्टींग हा शब्द तयार झाला आहे. सतत मुलांविषयी काही ना काही पोस्ट करणाऱ्या पालकांना उद्देशून हा शब्द वापरला जातो.

डिजिटल फूटप्रिंट्स म्हणजे काय?

डिजिटल स्पेसमध्ये आपण जेजे काही करतो, जे अपलोड, डाउनलोड करतो, जे सोशल मीडिया वापरतो, गेमिंग करतो, पॉर्न बघतो, कुणाशी काय बोलतो, कुणाला फॉलो करतो.. म्हणजेच एकूण व्यक्तीचं जे ऑनलाईन वर्तन आहे, त्याला डिजिटल फूटप्रिंट्स म्हणतात. आणि हे फूटप्रिंट्स कधीही डिजिटल स्पेसमधून डिलीट होत नाहीत. म्हणूनच मुलांचे डिजिटल फूटप्रिंट्स आणि डिजिटल प्रोफाइल त्यांच्या परवानगीशिवाय तयार करणं बरोबर नाही.