Weight Loss Jumping Jack: वजन कमी करायचंय ही इच्छा साधारण प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकायला येते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पण कितीही इच्छा असली तरी अनेकांचे वजन कमी करण्याचे प्रयत्न हे पाच दिवसांच्या वर टिकतच नाहीत. याचे एक कारण म्हणजे आपल्या मर्यादेच्या पेक्षा जास्त तीव्रतेच्या व्यायामाची किंवा डाएटची जबरदस्ती. ऑनलाईन बघून कोणताही विचार न करता अनेकजण आपलं रुटीन तयार करण्याचा प्रयत्न करतात पण तुमच्या शरीराला तीच गोष्ट साजेशी ठरेल याची ग्वाही देता येत नाही. अशावेळी सर्वात सुज्ञ सुरुवात म्हणजे अगदी साध्या पद्धतीने व्यायाम सुरु करणं. असाच एक व्यायाम म्हणजे जंपिंग जॅक..मराठीत सांगायचं तर ही विशिष्ट पद्धतीने उड्या मारण्याची पद्धत आहे जी तुम्हाला एकाच वेळी कार्डियोसह संतुलनासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामाचे सुद्धा फायदे मिळवून देऊ शकते.

बॉलिवूडचे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर डॉ. मिकी मेहता यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार आपणही आज जंपिंग जॅक या मजेशीर व प्रभावी व्यायामाची ओळख करून घेऊया ..

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Facebook
Facebook Logo : फेसबूकने लोगो अचानक का बदलला? मेटानं दिलं स्पष्टीकरण! ॲप अपडेट करण्याचं सर्वांना आवाहन, नेमकं कारण काय?

जंपिंग जॅक कसे करावे? (How To Do Jumping Jack)

  • तुमच्या पायात थोडे अंतर घेऊन सरळ उभे राहा आणि हात आडवे करा
  • पहिली उडी मारताना आपल्याला पाय विश्राम स्थितीत असतात त्याप्रमाणे बाजूला करायचे आहेत आणि त्याच वेळी हात डोक्यावर जोडून टाळी वाजवायची आहे.
  • मग पुन्हा उडी मारून सावधान स्थितीप्रमाणे पाय एकमेकांच्या जवळ आणा
  • टाळीच्या तालावर अशा पद्धतीने उड्या मारत राहा.
  • कालांतराने यात तुम्ही ऍडव्हान्स स्टेप्स करू शकता, जसे की विश्राम स्थितीत उडी मारताना तुम्ही गुडघे किंचित वाकवून स्क्वॉट करू शकता. शिवाय डोक्याच्या वर टाळी मारण्याऐवजी छातीच्या समोर टाळी मारू शकता.

जंपिंग जॅकचे कार्डिओ व्हॅस्क्युलर फायदे (Benefits To Heart)

जंपिंग जॅक रूटीन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्य सुधारते. या व्यायामाने तुमचे फुफ्फुसे आणि हृदय मजबूत होते, रक्ताभिसरण सुधारते, तुमच्या रक्तप्रवाहात ऑक्सिजन वाढते व रक्तदाब नियंत्रणात राहतो. या व्यायामाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहून स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

मेंदू आणि हार्मोन्स (Brain & Hormones)

उड्या मारणं हा गुरुत्वाकर्षणाच्या बळाशी जोडला जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे काय तर, आपण उभे असता, जमिनीपासून किंचित वर जाता आणि पुन्हा खाली येता म्हणजेच उडी मारता बरोबर? तुम्ही उडी मारून पुन्हा खाली येण्याच्या प्रक्रियेत गुरुत्वाकर्षणाचे बळ वापरत असता, यातून आपले न्यूरॉन्स सतर्क होऊन मेंदूला सक्रिय करतात. शिवाय संतुलन व ऊर्जा राखण्यासाठी सुद्धा उडी मारणे हा उत्तम मार्ग आहे. उड्या मारताना शरीरात एंडॉर्फिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या आनंदी हार्मोन्सचा संचार वाढू लागतो ज्यामुळे तुमचा मूड उत्तम होऊन ताण- तणाव दूर होऊ शकतो.

वृद्धत्व विरोधी प्रभाव (Anti-Ageing)

एखाद्या व्यक्तीच्या वयोमानानुसार, त्याचे टेस्टोस्टेरॉन नैसर्गिकरित्या कमी होते. मात्र , नियमित शारीरिक हालचाली असल्यास टेस्टोस्टेरॉन वाढण्यास किंवा किमान राखण्यास मदत होऊ शकते जे वृद्धत्वाचे नैसर्गिक परिणाम कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकार शक्ती आणि हाडांची ताकद (Bones Health)

पाय आणि हात विश्राम व सावधान स्थितीत आणताना आपल्या लिम्फॅटिक सिस्टीम सक्रिय होतात. तसेच शरीरातून विषारी पदार्थ अधिक चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी आपल्या लिम्फॅटिक नोड्सची कार्यक्षमता वाढते. हाडे मजबूत होणे हा जंपिंग जॅक करण्याचा मुख्य फायदा आहे. यामुळे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो, नवीन हाडांच्या पेशी तयार होण्यास मदत होते.

स्नायूंची पॉवर तयार करा (Muscle Power)

जंपिंग जॅक रूटीन वेग आणि शक्ती वापरत असल्याने, विशेषतः हात, पाय आणि कोर (पोटाचा भाग) येथील स्नायूंसाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. हा एक उत्तम सेल्युलर मसाज आहे कारण बाउन्समुळे आपल्या पेशी, आपले स्नायू, चरबीयुक्त ऊती आणि सांधे उत्तेजित होतात.

वजनावर नियंत्रण (Weight Management)

आणि आता सर्वात मुख्य फायदा म्हणजे वजन कमी करणे. जंपिंग जॅकमुळे हात, पाय आणि ओटीपोटातील अनावश्यक फॅट्स बर्न होण्यास मदत होते. हे तुमचे चयापचय वाढवते आणि शरीराला फॅट्स बर्न करून ऊर्जा पुरवते साहजिकच यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हे ही वाचा<< Sexual Health Yoga: लैंगिक व प्रजनन क्षमतेसाठी कोणते योगासन फायद्याचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या प्रभाव व कृती 

जंपिंग जॅक कोणी करावे? (Who Should Do Jumping Jack)

विशेषतः तरुण वर्गासाठी हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे कारण यामुळे हार्मोन्सचे कार्य सुधारण्यास मदत होते. पण तुम्ही चाळीशी पार असाल तर केवळ खबरदारी म्हणून उडी मारताना वेग व तीव्रतेवर नियंत्रण ठेवावे. ठराविक वयाच्या पुढे स्नायू व हाडे कमकुवत होण्याची भीती असते त्यावेळी उच्च तीव्रतेने व्यायाम करण्याचा हट्ट केल्यास तुम्हाला गुडघेदुखी, स्नायू फाटणे असे त्रास होऊ शकतात. शिवाय गर्भवती महिला व सांधेदुखी, हृदयाचे विकार असणाऱ्यांनी हा व्यायाम करण्याआधी एकदा तुमच्या परिचित डॉक्टरांचा सल्ला घ्या.