Does Beer Cures Kidney Stone: किडनी स्टोन ही जगभरात आढळणारी एक सामान्य समस्या आहे. यामुळे तुम्हाला निद्रानाश होऊ, अनेकदा पाठदुखी, लघवी करताना होणाऱ्या वेदना किंवा लघवीमध्ये रक्त येण्याची शक्यता असते. बहुतांश वेळा मधुमेही किंवा अतिवजन असलेल्यांना ही समस्या अधिक छळते. शरीर योग्य रीतीने डिटॉक्स होत नसेल तर किडनी स्टोनचा धोका वाढतो. जेव्हा रक्तातील युरिक ऍसिड शरीराबाहेर टाकण्यास किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा हेच युरिक ऍसिड क्रिस्टल्सच्या रूपात शरीरात जमा होते. हेच क्रिस्टल खडे साचून मुतखडा होऊ शकतो. सुदैवाने हे खडे लहान असल्यास ते शस्त्रक्रियेशिवाय 30-40 दिवसांत नैसर्गिकरित्या लघवीवाटे बाहेर पडू शकतात. किडनी स्टोनवरील एक सर्वश्रुत उपाय म्हणजे बिअर. बिअर प्यायल्याने किडनी स्टोन शरीराबाहेर पडण्याची प्रक्रिया वेगाने होते का? याविषयी डॉक्टरांचे मत जाणून घेऊयात..

बिअर प्यायलायने किडनी स्टोन निघून जातो का?

अलीकडेच ज्यांना कधीच मुतखडा झाला नव्हता अशा लोकांवर दोन अभ्यास केले गेले आहेत, ज्यावरून असे दिसून आले आहे की बिअर पिणार्‍यांमध्ये किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होता, परंतु बिअर पिण्याचे प्रमाण आणि वारंवारता ही माहिती यात उपलब्ध नव्हती. हेल्थशॉट्सने डॉ. धारिया यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुळात बिअरमुळे शरीर डिहायड्रेट होते जे की मुतखड्याचे मुख्य कारण असते पण दुसरीकडे बिअर प्यायल्याने लघवी सुद्धा अधिक प्रमाणात तयार होते. यामुळे अगोदरच किडनी स्टोन असल्यास (साधारण 5 मिमी पेक्षा कमी) बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?

हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात ‘या’ डाळी व भाज्या; युरिक ऍसिडचा मोठा धोका ओळखा

थोडक्यात सांगायचं तर किडनी स्टोनची जोखीम कमी करण्यासाठी बिअर हा एक पर्याय आहे. परंतु जास्त मद्यपान करणार्‍यांसाठी, बिअर किडनी स्टोन होण्याचा धोका वाढवू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला हुशारीने निवड करावी लागेल. भरपूर लघवी निर्माण करण्यासाठी आपल्याला निदान शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिण्याची गरज आहे.

किडनी स्टोनचा धोका का वाढतो?

जर तुमच्या आहारात प्रथिने, सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असेल तर किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असल्यास तुम्ही अतिरिक्त सोडियम शरीरात ढकलत असता. जर हे घटक तुमच्या किडनीला फिल्टर करता आले नाहीत तर शरीरात त्याचे कॅल्शियमच्या खड्यांमध्ये रूपांतर होते. लठ्ठपणा, उच्च बॉडी मास इंडेक्स (BMI), अनुवंशिकता आणि काही वैद्यकीय परिस्थिती सुद्धा किडनी स्टोनचे कारण असू शकतात.