Does Beer Cures Kidney Stone: किडनी स्टोन ही जगभरात आढळणारी एक सामान्य समस्या आहे. यामुळे तुम्हाला निद्रानाश होऊ, अनेकदा पाठदुखी, लघवी करताना होणाऱ्या वेदना किंवा लघवीमध्ये रक्त येण्याची शक्यता असते. बहुतांश वेळा मधुमेही किंवा अतिवजन असलेल्यांना ही समस्या अधिक छळते. शरीर योग्य रीतीने डिटॉक्स होत नसेल तर किडनी स्टोनचा धोका वाढतो. जेव्हा रक्तातील युरिक ऍसिड शरीराबाहेर टाकण्यास किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा हेच युरिक ऍसिड क्रिस्टल्सच्या रूपात शरीरात जमा होते. हेच क्रिस्टल खडे साचून मुतखडा होऊ शकतो. सुदैवाने हे खडे लहान असल्यास ते शस्त्रक्रियेशिवाय 30-40 दिवसांत नैसर्गिकरित्या लघवीवाटे बाहेर पडू शकतात. किडनी स्टोनवरील एक सर्वश्रुत उपाय म्हणजे बिअर. बिअर प्यायल्याने किडनी स्टोन शरीराबाहेर पडण्याची प्रक्रिया वेगाने होते का? याविषयी डॉक्टरांचे मत जाणून घेऊयात..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा