क्षेमशर्मा नावाच्या लेखकाने १९२० साली लिहिलेल्या क्षेमकुतूहल या ग्रंथामध्ये हे स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नं’अर्थात अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. अन्नाचे पचन व्यवस्थित नाही म्हणजे आरोग्य ठीक नाही, हे तर सरळ गणित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्यक्षातही जठरामधील पाचक पित्ताच्या स्त्रावामधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावरच त्याचा पीएच कमी होऊन तो स्त्राव तीव्र आणि पचनास समर्थ होतो. यकृतामधील पित्त पित्ताशयात जमलेले असताना त्यामधील पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हाच ते अधिक संहत (तीव्र) होऊन चरबीचे पचन करु शकते. अतिजलपानाने हे पाचक स्त्राव विरल (पातळ) होतात.

हेही वाचा… Health Special: कर्करोग, हृदयरोग, अल्झायमर… सर्वांवर रामबाण उपाय, स्वयंपाकघरातील ‘हा’ घटक!

अन्न पचवण्यासाठी त्या पाचक स्त्रावांमध्ये जी तीव्रता हवी असते, ती गमावून बसल्याने असे पाचक स्त्राव सेवन केलेल्या अन्नाचे पचन नीट करू शकत नाहीत आणि अन्नाचे पचन व्यवस्थित नाही म्हणजे विकृतीची सुरुवात. इथे पचन म्हणताना अन्नसेवन व पोट साफ होणे इथपर्यंतच अर्थ मर्यादित नाही, तर सेवन केलेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाचे पचन- पृथक्करण-सात्म्यिकरण- उर्जेमध्ये रुपांतर- निरोगी कोषनिर्मिती व ताज्या घटकांचे संपूर्ण विसर्जन असा व्यापक अर्थ अपेक्षित आहे. अती पाणी पिण्यामुळे अन्न पचत नसते तेव्हा यातल्या कोणत्याही पातळीवर विकृती संभवते, हे लक्षात घेतले पाहिजे; जी विकृती विविध विकारांमागचे मूळ कारण ठरते. समाजाने हा विषय समजून घ्यायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अतिजलपानाने शरीराची तहानेची संवेदना तयार करण्याची प्रक्रिया बिघडणे. सातत्याने अति पाणी प्यायल्याने शरीराला पाण्याची गरजच वाटेनासे होऊन नैसर्गिकरित्या तहान लागण्याची क्रिया बिघडते. अतिजलपान हे शरीर स्थूल (वजनाने जड व आकाराने मोठे) होण्यास कारणीभूत होते. भरपूर पाणी पितो असं म्हणणारे सर्वसाधारणपणे स्थूल असतात.

हेही वाचा… Health Special: फॅट्स कमी होतात म्हणजे नक्की जातात कुठे?

अती पाणी प्यायल्याने पाण्यामधील सोडियमचे रेणू घटतात. शरीराचे कोश (cells) आणि कोशांबाहेरील द्रवपदार्थ यांमध्ये होणारी विविध घटकांची देवाणघेवाण ज्या द्रवामधून होते, त्या द्रवाचा कोशाच्या आत व कोशाच्या बाहेर असा प्रवास हा सोडियम व कॅल्शियमच्या ज्या रेणूंवर निर्भर असतो. अती पाणी पित राहिल्याने पाण्यामध्ये सोडियमचे रेणू घटल्यास शरीरकोशांमध्ये अधिकचे पाणी शिरते. हे खूप अधिक प्रमाणात झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र तितक्या तीव्रतेने व गंभीरतेने ही विकृती न होता एखादी व्यक्ती सातत्याने दीर्घकाळ अती प्रमाणात पाणी पित राहिल्यास सुद्धा सोडियमचे प्रमाण सातत्याने अल्प प्रमाणात घटत राहिले, तर त्याच्या परिणामी नित्य थोडा-थोडा द्रव कमी प्रमाणात कोशामध्ये शिरत राहिल्यास आणि त्याचा निचरा होत नसल्यास हळूहळू कोश ते अधिकचे पाणी जमवायला शिकतील.

अशाप्रकारे अनावश्यक असे अतिरिक्त प्राशन केलेल्या पाण्याचे रेणू शरीरातील प्रत्येक कोषांना (cells) हळूहळू अधिक द्रव जमा करायला शिकवतात आणि ते कोष आकाराने मोठे होत जातात. त्याच्या परिणामी संपूर्ण शरीर पुढे आकाराने व वजनानेसुद्धा मोठे होते. तुम्ही निरीक्षण करा, भरपूर पाणी पिणारे तुम्हाला सहसा कृश दिसणार नाहीत. स्थूल लोकांचे पाणी पिणे वाजवीपेक्षा अधिकच असते. स्थूलत्व हे अनेक आजारांचे मूळ कारण आहे. त्यामुळेच पाणी पिताना तारतम्य ठेवणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does drinking too much water affect digestion hldc dvr
Show comments