काकडी हे एक असं फळ आहे जे जवळपास ९६ टक्के पाण्याने बनलेले आहे. काकडीचे अनेक गुणधर्म आहेत, जे वजन कमी करणे, शरीरावर येणारे काळे डाग घालवणं आणि सूर्यप्रकाशापासून होणारा त्रास अशा बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी ठरतात. अनेक लोक रोजच्या जेवणात काकडीचा सॅलड म्हणून वापर करतात. काकडी कोणत्याही ऋतुमध्ये खाऊ शकतो, पण हिवाळ्यात काकडी खायची की नाही? या दिवसात काकडी खाल्याने सर्दी होते का ? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. तर हिवाळ्यात काकडीमुळे खरचं सर्दी येते की नाही हे आपण आज जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार काकडीचे तीन प्रमुख गुणधर्म आहेत, एक सीता (थंड करणारे), दोन रोपण (उपचार) आणि तीन काशय (तुरट). काकडी शरीर थंड करण्यास मदत करते. शिवाय जळजळ होण, शरीरावर पुरळ उठणे अशा अनेक समस्यांवर काकडी परिणामकारक ठरते. काकडी शरीरातील दोष कप, पित्त आणि वात हे तीनही दोष संतुलित करण्यास मदत करते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही टीकवते. पण काकडीच्या थंड गुणधर्मांमुळे काकडी हिवाळ्यात खाणे योग्य नसल्यांचही सांगितलं जातं.
हेही वाचा- सकाळी उठताच शिंका करतात हैराण? या समस्येपासून बचाव करण्याचे ५ उपाय जाणून घ्या
आपण हिवाळ्यात काकडी खाऊ शकतो का?
ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे शिवाय ज्यांना खोकला आणि सर्दी यांचा सतत सामना करावा लागतो अशा लोकांसाठी हिवाळ्यात काकडी खाणे योग्य नाही. कारण त्यात नैसर्गिक तुरट आणि सीता (थंड करणारे) गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीराला थंड होण्यास मदत करतात. जेव्हा तुम्हाला आतून उबदारपणाची गरज असते तेव्हा काकडी खाल्ल्याने शरीरातील कफाचे प्रमाण वाढते ज्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते.
हेही वाचा- सेक्स करताना पायात गोळे येतायत? मोक्याच्या क्षणी येणाऱ्या Muscle क्रॅम्पवर उपाय काय?
काकडीमुळे हिवाळ्यात सर्दी होते हे ऐकल्यावर कदाचित ज्यांना काकडी खूप आवडते त्यांना वाईट वाटू शकतं. पण तुम्हाला काकडी खायचीच असेल तर तुम्ही ती दिवसा खाऊ शकता, कारण शरीराच्या नैसर्गिक तापमानामुळे सूर्यप्रकाशात काकडी खाल्ल्याने हिवाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शिवाय जे लोक हिवाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पित नाहीत. अशा लोकांनी दिवसा काकडी खाल्यास त्यांच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास काकडी मदत करते. पण ज्यांची रोगप्रतिकारक चांगली आहे त्यांनीच हिवाळ्यात काकडी खावी अन्यथा सर्दीचा त्रास उद्भवू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)