आपल्या शरीराला योग्य ते पोषण देण्यासाठी आपण जो आहार घेत आहोत, याचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असते. खरंतर पोषक आहार ठरवणे ही फारच साधी-सोपी गोष्ट वाटत असेल. मात्र, आहारातील प्रत्येक पदार्थाच्या पौष्टिकतेचा विचार करून तो ठरवणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षांपासून दह्यातील पाणी काढून तयार केलेला दह्याचा चक्का, म्हणजेच हंग कर्ड प्रथिनांनी भरपूर असल्याने, त्याचा आपल्या जेवणात समावेश करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला जर आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवायचे असेल तर हंग कर्ड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे हैद्राबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ फिजिशियन सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांचे मत आहे; अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातून समजते.

आपल्या नेहमीच्या दह्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकून हे हंग कर्ड बनवले जाते. “या दह्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असतेच, त्यासह कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्सदेखील मुबलक असतात. त्यामुळे जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांच्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. याच्यामुुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हृदयाची काळजी घेण्यास मदत होते”, असे डॉक्टर गुडे म्हणतात.

हेही वाचा : सकाळपासून रात्रीपर्यंत राहाल प्रचंड उत्साही; रिकाम्यापोटी केवळ ‘हे’ पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर, टिप्स पाहा…

इतकेच नव्हे तर या दह्यात असणाऱ्या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रित राहून, उच्च रक्तदाबासारख्या समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरते, अशी माहिती आरोग्य प्रशिक्षक [health coach] दानिश अब्बासी देतात. “यासोबतच दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक घटक तुमचे कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रणात ठेवते.”

या दह्याचा फायदा केवळ शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर त्वचेसाठीदेखील होत असतो. “दह्यातील पाणी काढून टाकल्यामुळे दह्यात असणाऱ्या लॅक्टोज घटकाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांना लॅक्टोजचा त्रास होत असेल [lactose intolerance] अशा व्यक्तीदेखील हे दही खाऊ शकतात. त्याचबरोबर हे दही फ्रीजमध्ये पाच दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहू शकते”, अशी माहिती डॉक्टर गुडे यांनी दिली आहे.

“आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती, उतींचे देखभाल आणि काळजी घेणे, एंझाइम आणि हार्मोन्स यांचे संश्लेषण करण्यासाठी शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते, त्यामुळे एखाद्या पदार्थामध्ये किंवा नुसतेच हे हंग कर्ड खाण्याने तुमच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची मात्रा पूर्ण होण्यास मदत होते”, असे डॉक्टर गुडे म्हणतात.

हेही वाचा : क्रिती सेननलादेखील आवडतो ‘बटर मेथी पराठा’; काय आहेत याचे सहा आरोग्यदायी फायदे पाहा…

तुम्ही बनवत असणाऱ्या पदार्थांमधून तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतील याकडे लक्ष देणे महत्वाचे असते. यासोबतच तुमच्या आवडी-निवडीनुसार संतुलित आहारासाठी दह्याचा किती प्रमाणात वापर करायचा ते ठरवावे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does hung curd really good for your health what doctor says about it check it out dha
Show comments