Smoking in Pregnancy Effect on Baby Girl : धूम्रपान हे आरोग्यासाठी वाईट आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे; पण तरीही अनेक जण धूम्रपान करतात. आजकाल महिला आणि पुरुष सर्रास धूम्रपान करताना दिसतात. धूम्रपानामुळे महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धूम्रपानामुळे होणाऱ्या बाळाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. अनेक महिला गरोदर असताना धूम्रपान करतात; पण त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

“गरोदर असताना धूम्रपान करणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेल्या मुलींच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो,” असा निष्कर्ष आशियन जर्नल ऑफ एंड्रोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून समोर आला आहे. डेन्मार्क येथील आरहूस विद्यापीठातील एपिडेमियोलॉजी विभागाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉ. एल. बी. हाकोन्सेन यांच्यासह त्यांचे सहकारी अँड्रियाज अर्न्स, सेसिलिया होस्ट रामलाऊ-हॅनसेन यांनी हे संशोधन केले आहे.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

गर्भाशयात असताना धूम्रपानाच्या संपर्कात आलेल्या मुलींच्या आरोग्यावर कसा प्रभाव पडतो? हे जाणून घेणे हा या संशोधनाचा उद्देश होता. दरम्यान, आईने गरोदरपणात केलेल्या धूम्रपानाच्या संपर्कात तिच्या गर्भातील मुलगी आल्यास, पुढे तिला पहिली मासिक पाळी लवकर येण्याशी त्या धूम्रपानाचा संबंध आहे, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच आईने गरोदर असताना धूम्रपान केल्यास गर्भाशयातील हार्मोन्सवर (Intrauterine hormonal) परिणाम होऊ शकतो आणि बाळाचा जन्म लवकर होऊ शकतो. आईच्या गर्भात असताना धूम्रपानाच्या संपर्कात आलेल्या मुलींमध्ये गर्भधारणेची क्षमता कमी होऊ शकते, अशी माहितीही या संशोधनातून समोर आली आहे.

या संशोधनासाठी १९८८ ते १९८९ या कालावधीत डेन्मार्कमधील मिडवाइफरी प्रॅक्टिसमध्ये ३० व्या आठवड्याच्या प्रसूतीपूर्व तपासणीपूर्वी नोंदणी केलेल्या ९६५ गर्भवती महिलांची माहिती वापरली आहे. तसेच २००८ मध्ये त्यांच्या १९-२१ वर्षांच्या मुलींकडून पाठपुरावा करून जमा माहिती मिळवली आहे. गरोदर असताना महिलांनी पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत रोज किती सिगारेट ओढल्या, तसेच मुलींची मासिक पाळी केव्हा सुरू झाली ही माहिती संशोधनात लक्षात घेण्यात आली आहे.

हेही वाचा – टॅटू काढायचा आहे पण भीती वाटते का? टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला काही धोका आहे का?

संशोधनामध्ये पहिल्या तिमाहीत गरोदर महिलांनी केलेल्या धूम्रपानाच्या पातळीनुसार त्यांच्या मुलींना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले. पहिल्या गटात आईच्या गर्भात असताना धूम्रपानाच्या संपर्कात न आलेल्या मुलींचा समावेश करण्यात आला. दुसऱ्या गटात आईच्या पोटात असताना धूम्रपानाच्या कमी संपर्कात आलेल्या म्हणजेच दिवसाला शून्य ते नऊ सिगारेट ओढणाऱ्या महिलांच्या मुलींचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गटात गर्भाशयात असताना धूम्रपानाच्या जास्त संपर्कात आलेल्या म्हणजेच दिवसाला १० सिगारेट ओढणाऱ्या महिलांच्या मुलींचा समावेश केला गेला.

गर्भाशयात असताना धूम्रपानाच्या संपर्कात आलेल्या मुलींच्या मासिक पाळीच्या वयाबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. सर्वसाधारणपणे मुलींना पहिली पाळी साधारण १० ते १२ वयादरम्यान येते. आईच्या पोटात असताना धूम्रपानाच्या संपर्कात न आलेल्या मुलींच्या तुलनेत, ज्या महिलांनी गरोदर असताना १० पेक्षा कमी सिगारेट ओढल्या किंवा धूम्रपान बंद केले त्यांच्या मुलींना वयात येण्याच्या दोन-चार महिन्यांपूर्वी मासिक पाळी आली. तर ज्या महिलांनी गरोदर असताना दररोज १० पेक्षा जास्त किंवा समान प्रमाणात सिगारेट ओढल्या, त्यांच्या मुलींना वयात येण्याच्या अनुक्रमे चार व ६.५ महिन्यांपूर्वी मासिक पाळी आली.

हेही वाचा – टॅटूसाठी वापरली जाणारी शाई आणि सुई सुरक्षित आहे की नाही, हे कसे ओळखावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

गरोदर असताना महिलांनी सिगारेट ओढण्यामुळे त्यांच्या मुलींना वयात येण्याअगोदरच पहिली मासिक पाळी येऊ शकते.

गरोदरपणात आईने धूम्रपान केल्यामुळे मुलींमध्ये गर्भधारणेची क्षमता कमी होते. याबाबत आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुलींना वयात येण्यापूर्वीच पहिली मासिक पाळी येण्याच्या प्रवृत्तीचा दीर्घकालीन प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले गेले आहे.

या संशोधनाबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले, “गरोदर असताना महिलांनी धूम्रपान केल्यास त्यांच्या बाळाच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. या संशोधनातील निष्कर्ष खरे असण्याची शक्यता प्रबळ आहे. पण याबाबत आणखी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. गरोदर असताना धूम्रपान केल्यास महिलांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढते, अचानक बाळाचा मृत्यू होणे, कुपोषित बाळ जन्माला येणे किंवा वजन कमी वजन होणे असे विपरीत परिणाम होऊ शकतात.”

हेही वाचा – तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

धूम्रपानाचा आई आणि बाळाला कसा धोका निर्माण होऊ शकतो?

धूम्रपान, गर्भधारणा आणि बाळ याबाबत रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिलेल्या माहितीनुसार,
नऊ महिन्यांनंतर जन्माला आल्यानंतर बाळ खूप लहान (वजनाने कमी) जन्माला येऊ शकते. धूम्रपानामुळे बाळाची जन्मापूर्वीची वाढ मंदावते.
बाळाचा जन्म खूप लवकर होऊ शकतो (अकाली जन्म). अकाली जन्मलेल्या बाळांना अनेकदा आरोग्य समस्या असतात.
धूम्रपानामुळे बाळाची फुप्फुसे आणि मेंदू यांना हानी पोहोचू शकते. मग हे नुकसान बालपणापासून आणि किशोरवयीन वर्षांपर्यंत टिकू शकते.
धूम्रपानामुळे गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान असामान्य रक्तस्राव होण्याचा धोका दुपटीने वाढतो. ही बाब आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात टाकते.
धूम्रपानामुळे बाळाला जन्मजात दोषांचा धोका वाढतो; ज्यामध्ये फाटलेला ओठ, फाटलेली टाळू किंवा दोन्हीचा समावेश होतो.
गरोदरपणात धूम्रपान करणाऱ्या मातांच्या बाळांना आणि जन्मानंतर सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आलेल्या बाळांना-एसआयडीएसचा (SIDS) धोका जास्त असतो. सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (SIDS) म्हणजे एक वर्षापेक्षा लहान बाळाचा अचानक मृत्यू होऊ शकतो.

धूम्रपान सोडण्यामुळेआईला आणि बाळाला कशी मदत होऊ शकते?

रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गरोदर होण्यापूर्वी धूम्रपान सोडणे ही सर्वोत्तम वेळ आहे. गरोदरपणात कधीही धूम्रपान सोडणे हे तुमच्या बाळाला आयुष्याची चांगली सुरुवात करण्यात मदत करू शकते. तुम्ही गरोदर असताना किंवा गरोदर राहण्याचा प्रयत्न करताना धूम्रपान सोडण्याच्या सर्वोत्तम मार्ग जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
आईने ध्रूमपान सोडल्यानंतर एका दिवसानंतरही बाळाला भरपूर ऑक्सिनज मिळतो.
धूम्रपान सोडल्यामुळेच बाळाची चांगली वाढ होते.
धूम्रपान सोडल्यामुळे बाळाचा जन्म खूप लवकर होण्याची शक्यता कमी आहे.
धूम्रपान सोडल्यास आईकडे अधिक ऊर्जा असेल आणि बाळ अधिक सहजतेने श्वास घेऊ शकते.
धूम्रपान सोडल्यामुळे आईला हृदयविकार, पक्षाघात, फुप्फुसाचा कर्करोग, फुप्फुसाचे आजार आणि धूम्रपानाशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता कमी असेल.