तुमच्यापैकी अनेकांना मांसाहार खूप आवडत असेल, तुम्ही हॉटेलमध्ये किंवा घरी विविध पद्धतीने तयार केलेले मांस आवडीने खात असाल. परंतु, तुम्ही खाता ते मांस तुमच्या शरीरासाठी कितपत योग्य आहे. तसेच लाल मांस रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते का? या मांसाचे सेवन करताना काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे का आणि या मांसामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, मधुमेह आणि लठ्ठपणाच्या समस्यांचा धोका उद्भवतो का? याबाबतची सविस्तर माहिती इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली आहे. ती जाणून घेऊया.

डॉ. सुरंजित चॅटर्जी म्हणाले, माझे अनेक रुग्ण मला नेहमी विचारतात की, “बकरीचे मांस इतर लाल मांसासारखे नसते, का?” यावेळी त्यांना मी सांगतो की, हा फक्त एक लाल मांसाचा आरोग्यदायी प्रकार आहे, परंतु सर्व लाल मांस सारखेच असते. दीर्घकाळापासून, गोमांस, डुकराचे मांस आणि मेंढी, अशा प्राण्यांच्या मांसाला लोक लाल मांस म्हणतात, ते जळजळ, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामाशी संबंधित असल्यामुळे त्याचा समावेश न खाण्याच्या पदार्थांच्या यादीत केला जातो. परंतु, माहितीपूर्ण आणि योग्य आहारातील निवड करण्यासाठी याचा नेमका संबंध समजून घेणे आवश्यक आहे.

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?

हेही वाचा- सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? सँडविच खाण्यामुळे वजन वाढते का? जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ…..

लाल मांस आणि जळजळ

लाल मांस विशेषत: उच्च तापमानात शिजवले जाते. त्यात अशी काही संयुगे असतात, जे शरीरात दाहक प्रतिक्रिया निर्माण करतात. प्रगत ग्लायकेशन एंड उत्पादने (AGEs) उच्च-उष्णतेच्या स्वयंपाकाच्या पद्धतीमध्ये तयार होतात, ज्यामध्ये ग्रिलिंग, तळणे किंवा भाजणे यांचा समावेश असतो. AGEs शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ वाढण्याशी संबंधित आहेत, ते जुनाट रोग उद्भवण्यास मदत करतात.

शिवाय लाल मांसामध्ये सॅच्युरेडेट चरबीचे (साठून राहणारी) प्रमाण जास्त असते, ज्याचा संबंध जळजळीशी असतो. सॅच्युरेडेट चरबी शरीरातील दाहकता सक्रिय करू शकते, ज्यामुळे सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (CRP) आणि इंटरल्यूकिन – ६ यांसारख्या दाहक मार्करमध्ये वाढ होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत जळजळ ही हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि विशिष्ट कर्करोगांसह विविध परिस्थितींसाठी ज्ञात असलेला धोकादायक घटक आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लाल मांसामध्ये अशी काही पोषक तत्वे असतात, जी तुमच्या आतड्यात ट्रायमेथिलामाइन-एन-ऑक्साइड (TMAO) तयार करतात. यामुळे तुमच्या धमन्या कडक होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने प्रक्रिया केलेले मांस गट १ चे कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे. याचा अर्थ असा की, ते कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. याबाबतचे काही ठोस पुरावे आहेत. परंतु, याचा धोका जास्त आणि सतत वापराशी संबंधित आहे.

हेही वाचा –विराट कोहलीच्या आहारात ९० टक्के उकडलेले पदार्थ! तज्ज्ञ सांगतात, तेल, मसाल्याचा वापर बंद करावा का? उलट.. 

कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य : लाल मांस विरुद्ध बकरीचे मांस

लाल मांसाचे सेवन आणि हृदयाचे आरोग्य यांच्यातील संबंध प्रामुख्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीवरील त्याच्या प्रभावाभोवती फिरतो. लाल मांस सॅच्युरेडेट चरबीने समृद्ध आहे, जे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. LDL कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी हृदयरोग आणि स्ट्रोकसाठीचा धोकादायक घटक आहे. गोमांस किंवा डुकराच्या तुलनेत बकरीचे मांस हे कमी सॅच्युरेडेट चरबीयुक्त असल्यामुळे त्याला आरोग्यदायी पर्याय मानले जाते, पण तरीही त्या मांसामध्येही कोलेस्ट्रॉल असतेच. त्यामुळे तुम्हाला त्याचा वापर सावधगिरीने आणि मध्यम प्रमाणात करावा लागू शकतो.

तर आहारातील कोलेस्ट्रॉलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा असू शकतो. काही व्यक्तींना आहाराच्या सेवनामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत लक्षणीय वाढ होऊ शकते, तर काही लोकांवर त्याचा तितकासा परिणाम होत नाही. पण, तरीही या मांसाचा हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम ठरवण्यासाठी संयम आणि एकूण आहार पद्धती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

हेम लोहाची भूमिका

लाल मांसामध्ये हेम लोह असते, जे वनस्पती-आधारित स्त्रोतांमध्ये आढळणाऱ्या नॉन-हेम लोहाच्या तुलनेत हे शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषले जाते. परंतु, हेम लोहाचे जास्त सेवन ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ वाढण्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि विशिष्ट कर्करोग उद्भवण्यास मदत करू शकते.

मर्यादित वापर कसा करावा

मांस खाणं पूर्णपणे टाळणे आवश्यक नसले तरी आपल्या देशातील लोकांमधील हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका लक्षात घेता मांसाच्या सेवनावर संयम ठेवणं आणि योग्य निवड करणं हे महत्त्वाचं आहे. तसेच ते बनविण्याची पद्धतदेखील योग्य असली पाहिजे. ज्यामध्ये मांसाचे पातळ तुकडे करून ते शिजवताना अशा पद्धतीचा वापर करा, ज्यामुळे AGE ची निर्मिती कमी होईल. म्हणजे ग्रिलिंग किंवा तळण्याऐवजी उकळणे किंवा वाफवणे अशा पद्धतीचा अवलंब करणे योग्य ठरू शकते. याव्यतिरिक्त मासे, कोंबडी, शेंगा आणि नट यांसारख्या इतर प्रथिन स्त्रोतांसह मांसाचे सेवन संतुलित करणे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Story img Loader