वाढते वजन ही एक सामान्य समस्या झाली आहे. सगळे जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लोक नानाविध घरगुती उपायसुद्धा वापरताना दिसतात. तुम्हाला माहीत आहेच की, वजनवाढीच्या समस्येला चुकीची आहारशैली, झोपेची चुकीची वेळ आणि आपल्याच काही वाईट व अनारोग्यकारक सवयी कारणीभूत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वांत प्रसिद्ध पेय बनलं आहे. ग्रीन टीमध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून, त्यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते. ग्रीन टीमुळे चयापचय सुधारते, पचन चांगल्या प्रकारे होऊन वजन कमी होण्यासही मदत होते. ग्रीन टी पिण्याचे प्रमाण, तसेच वेळ यांबाबत योग्य काळजी घेतल्यास तुम्हाला ग्रीन टीचा भरपूर लाभ घेता येऊ शकतो. जेवल्यानंतर ग्रीन टी प्यायल्यास झपाट्याने वजन कमी होऊ शकते का, याच विषयावर मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या सल्लागार व आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम यांनी माहिती दिल्याचे वृत्त प्रतीक्षा कदम यांनी दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

(हे ही वाचा : भात खाल्ल्याने खरंच खोकला होऊ शकतो का? तज्ज्ञांनी सोडवला वाद )

डाॅक्टर म्हणतात, “मागील काही वर्षांपासून कित्येक जण हे आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी ग्रीन टी पिण्याला आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनविले आहे. ग्रीन टी हे आरोग्यदायी पेय आहे. ग्रीन टीमध्ये कॅफिन असते. ग्रीन टीमध्ये अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. हे पोषक घटक आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करतात. ग्रीन टीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये वजन कमी करण्यासोबतच हृदयविकार, त्वचेच्या समस्या आदी अनेक बाबींमध्ये ग्रीन टी फायदेशीर ठरते.”

जेवणानंतर लगेच ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास गती मिळते. या कल्पनेमागील विश्वास ग्रीन टीमधील कॅटेचिन नावाच्या उच्च सामग्रीमुळे मिळतो. विशेषत: एपिगॅलोकेटचिन गॅलेट (EGCG) व कॅफीन हे घटक चरबी जाळतात आणि चयापचय दर वाढवितात, असे मानले जाते. तथापि, या प्रक्रियेस वेळ लागतो. असे म्हटले जाते की, संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, ग्रीन टी पिण्याने लोकांचे वजन कमी होण्यास मदत होते; पण याबरोबरच व्यायाम आणि निरोगी आहार घेतला पाहिजे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, दीर्घकाळपर्यंत ग्रीन टी घेतल्याने त्याद्वारे कॅफिन व कॅटेचिन या दोन्ही घटकांमुळे चयापचय गती वाढू शकते. कॅटेचिनमुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. कॅटेचिन व कॅफिन दोन्ही घटक शरीर वापरत असलेली ऊर्जा वाढवू शकतात. २०१० मध्ये केलेल्या पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की, ग्रीन टी या आरोग्यपूरक पेयामध्ये कॅटेचिन किंवा कॅफिन आहे. या घटकांचा वजन कमी करणे आणि वजन व्यवस्थापन करणे यावर लहान, परंतु सकारात्मक प्रभाव पडतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does sipping green tea after meals really help in weight loss know from expert pdb